29 जुलै राशिफळ : बुधवारी ‘या’ 6 राशींच्या ‘भाग्या’त होईल वाढ

पोलीसनामा ऑनलाइन

मेष
आजचा दिवस सामान्य फलदायी आहे. मानसिक चिंतेमुळे काही समस्या जाणवतील. आईची तब्येत बिघडू शकते. कुटुंबात तणाव वाढेल. कामासाठी दिवस सामान्य असेल. वैवाहिक जीवन चांगले राहील. प्रेमसंबंधात दिवस चांगला घालवाल.

वृषभ
आजचा दिवस चांगला आहे. वैवाहिक जीवनात प्रेम आणि रोमान्स वाढेल. मनाची कलात्मकता बाहेर काढाल आणि जोडीदाराला आनंदी करण्यासाठी एक चांगली योजना आखाल. प्रेमसंबंधासाठी काळ सामान्य आहे. कामात दिवस तुमच्या बाजूने राहील. आरोग्य बळकट होईल, त्याचा फायदा घ्या.

मिथुन
आजचा दिवस चढ-उतारांचा आहे. आरोग्य देखील कमजोर होऊ शकते, म्हणून काळजी घ्या. खर्च वाढेल. वैवाहिक जीवन सामान्य राहील. प्रेमसंबंधासाठी दिवस चांगला आहे. नात्यात हलकासा वाद होईल पण प्रेम अबाधित राहील, ज्यामुळे आनंदी व्हाल. कामासाठी दिवस मजबूत आहे.

कर्क
आजचा दिवस चांगला आहे. प्रेमसंबंधात आनंदी करण्यासाठी सर्व प्रयत्न कराल, त्यामध्ये यशस्वी व्हाल. प्रिय व्यक्तीला एखादी चांगली भेट देऊ शकता. वैवाहिक जीवनात थोडी चिंता राहील, तुमच्यामध्ये एखाद्या गोष्टीवरून भांडण होऊ शकते. कामासाठी दिवस सामान्य आहे. मेहनत कराल. खर्च जास्त होईल.

सिंह
आजचा दिवस चांगला आहे. कौटुंबिक जबाबदार्‍या पाडण्यात वेळ घालवाल. कामात दिवस चांगला जाईल. भरपूर मेहनत कराल आणि योग्य वेळी काम पूर्ण करण्यास आवडेल. उत्पन्न वाढेल. खर्च कमी होईल. आरोग्य थोडे कमजोर राहू शकते. विरोधकांमुळे त्रस्त होणाची आवश्यकता नाही, आपण त्यांच्यावर मात कराल. प्रेमसंबंध आनंदी ठेवाल.

कन्या
आजचा दिवस चांगला आहे. एखाद्या सुंदर कारणासाठी प्रवास कराल. एखाद्या मित्राला भेटण्याची संधी मिळू शकते. आपले काम यशस्वी कराल. वैवाहिक जीवन सामान्य राहील. प्रेमसंबंधात आव्हानांचा सामना करावा लागू शकतो.

तुळ
आजचा दिवस सामान्य आहे. गुपचूप एखादा खर्च कराल. कामासाठी दिवस चांगला आहे, परंतु तुमचा आत्मसन्मान हा अभिमान होऊ देऊ नका, अन्यथा अडचणींना सामोरे जावे लागेल. वैवाहिक जीवन सामान्य राहील. प्रेमसंबंधात आजचा दिवसाचा एन्जॉय कराल.

वृश्चिक
आजचा दिवस उत्तम आहे. व्यवसायात यश मिळेल. कामाला गती मिळेल. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. नात्यात शेरो शायरी प्रेम आणि रोमान्स देखील येऊ शकतो. प्रेमसंबंधासाठी दिनमान थोडे कमजोर आहे. आरोग्य बळकट राहील.

धनु
आजचा दिवस चढ-उतारांचा आहे. खर्च वाढेल. अनावश्यक खर्च करून शकता, म्हणून त्यांच्यापासून दूर राहा. वैवाहिक जीवन सामान्य राहील. प्रेमसंबंधात एखादा तणाव असू शकतो. कामासाठी दिनमान चांगले आहे. तुमच्या इन्क्रीमेंटचे योग आहेत. कौटुंबिक तणाव कमी करण्याचा प्रयत्न करा.

मकर
वैयक्तिक आयुष्यात एखादया समस्येचा सामना करावा लागू शकतो. कार्यक्षेत्रासाठी दिवस सामान्य आहे. नोकरी करणार्‍यांच्या कामात आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. आर्थिक क्षेत्रात लाभ होण्याची शक्यता आहे. दिलेले पैसे परत मिळू शकतात. प्रेमसंबंधासाठी दिवस आनंददायी आहे. प्रिय व्यक्ती तुमच्यावर खुश असेल. वैवाहिक जीवनासाठी दिवस संमिश्र आहे. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या.

कुंभ
आजचा दिवस सामान्य आहे. आरोग्यात चढ-उतार राहील, त्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. अन्यथा एक मोठा आजार उद्भवू शकतो. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. कामात मन लागेल, ज्यामुळे उत्पन्न वाढेल. प्रेमसंबंधात काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. वैवाहिक जीवनासाठी दिनमान चांगले आहे.

मीन
आजचा दिवस चांगला आहे. कामात यश मिळाल्यामुळे आनंद होईल. प्रत्येक गोष्टीत यश मिळेल. उत्पन्न वाढेल. कौटुंबिक जबाबदार्‍या पार पाडाल. प्रॉपर्टी खरेदी करण्याची कल्पना मनात येईल. वैवाहिक जीवन सामान्य राहील. प्रेमसंबंधात आनंद राहील, प्रिय व्यक्तीला काहीतरी चुकीचे बोलू शकते, जे तुम्हाला समजणार नाही, पण वाईट वाटेल.