3 ऑगस्ट राशिफळ : श्रावणातील हा सोमवार ‘या’ 5 राशींसाठी ‘अतिशय खास’, ‘लाभ’ मिळण्याचे ‘संकेत’

पोलीसनामा ऑनलाइन

मेष
आजचा दिवस चांगला आहे. कार्यक्षेत्रात यश मिळेल. नव्या विचारांनी कामाला सुरूवात कराल, ज्यामुळे चांगले परिणाम मिळतील. कुटुंबासाठी चांगला दिवस आहे. आईकडून खूप प्रेम मिळेल, आणि तिचा सल्ला तुमच्या उपयोगी येईल. दिवस आनंदाने घालवाल. आरोग्याची काळजी घ्या.

वृषभ
आजचा दिवस चांगला आहे. भाग्याची चांगली साथ मिळेल. वैयक्तिक प्रयत्नांना यश मिळेल. नशीब चमकेल. फिरण्याची संधी मिळेल. मन प्रसन्न होईल. नवीन उर्जेसह दिवस घालवाल. प्रेमासाठी आजचा दिवस खूप सकारात्मक आहे. प्रिय व्यक्तीसोबत आनंदाचे क्षण घालवाल. तब्येत सुधारेल.

मिथुन
आजचा दिवस फलदायी आहे. आरोग्य कमजोर राहील. खर्च जास्त होईल. वैवाहिक जीवनात तणाव राहील, जोडीदाराचे आरोग्य त्रासदायक ठरेल. कामात यश मिळेल. विरोधकांवर वर्चस्व गाजवाल. स्पर्धा परीक्षेसाठी चांगला दिवस आहे.

कर्क
आजचा दिवस उत्तम आहे. जोडीदारावरील प्रेमात आणि आकर्षणात वाढ होईल. व्यवसायात चांगले परिणाम मिळतील. खर्च किंचित वाढेल. आराम मिळेल. कौटुंबिक जीवन आनंददायी राहील. कामासाठी चांगला काळ आहे.

सिंह
आजचा दिवस थोडा कमजोर आहे. तब्येत बिघडलेली राहील, कामात उशीर होईल. मेहनतीला फळ मिळण्यास उशीर लागेल. प्रेमसंबंधासाठी दिवस फारसा अनुकूल नाही. प्रिय व्यक्तीचे मन वळविण्यात कोणतीही कसर सोडू नका. नोकरीत बदलीचे योग आहेत. मालमत्तेच्या बाबतीत दिवस अनुकूल आहे.

कन्या
आजचा दिवस चांगला आहे. प्रेमसंबंधात रोमँटिक क्षण घालविण्याची संधी मिळेल. शिक्षणामध्ये यश मिळेल. संततीला सूख मिळेल. कामात चांगले परिणाम मिळतील. मेहनतीला यश येईल. तब्येत सुधारेल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील.

तुळ
आजचा दिवस उत्तम आहे. कुटुंबात चांगला काळ घालवाल. घरगुती खर्च होईल. आजचा दिवस कुटुंबासाठी उत्तम आहे. भावंडांना एखादी समस्या असू शकते. मानसिक त्रास होईल. कामासाठी दिवस अनुकूल आहे.

वृश्चिक
आजचा दिवस चांगला आहे. प्रवासात जाणे चांगले ठरेल, छोटा प्रवास कराल, जो मानसिक आनंदही देईल आणि खास व्यक्तीला भेटण्याची संधी मिळेल. खर्च कमी होईल आणि उत्पन्न वाढेल, ज्यामुळे आत्मविश्वास वाढेल. प्रेमसंबंधात यश मिळेल. कार्यक्षेत्रासाठी दिवस चांगला आहे. सहकारी देखील सोबत असतील.

धनु
आजचा दिवस चांगला आहे. बोलण्यात गोडवा वाढेल आणि एखादा फंक्शनला जाऊ शकता. चांगले भोजन सेवन केल्याने मन तृप्त होईल. आरोग्य थोडे कमजोर राहील. खर्च जास्त होईल, पण उत्पन्नही वाढेल. अचानक एखादी चांगली बातमी मिळेल. ज्यामुळे दिवस चांगला होईल.

मकर
आजचा दिवस सामान्य आहे. काळजीपूर्वक विचार करा. कारण खर्च वाढेल. सुविधांवर खर्च कराल. स्वतःकडे अधिक लक्ष द्याल. स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न कराल. व्यक्तिमत्त्वात बदल करण्यासाठी काही नवीन कपडे किंवा दागिने खरेदी करू शकता. कौटुंबिक जीवन खूप चांगले राहील. मालमत्तेचा फायदा होईल. प्रेमसंबंधात यश मिळेल. वैवाहिक जीवनसाठी उत्तम दिवस आहे. मुलांकडूनही आनंद मिळेल.

कुंभ
आजचा दिवस चांगला आहे. आरोग्य आणि संपत्ती या दोन आघाड्यांवर लक्ष केंद्रित करावे लागेल. आरोग्य कमजोर राहू शकते. काही अडचणी येतील. मानसिक ताण देखील येऊ शकतो. खर्चही खूप जास्त असेल. काही खर्च आवश्यक वाटेल, परंतु येणार्‍या काळात त्रास होऊ शकतो, म्हणून ताबा ठेवा. कार्यालयातील आपले वर्चस्व कायम राहील.

मीन
आजचा दिवस उत्तम आहे. भाग्याची पूर्ण साथ मिळेल. केलेले प्रयत्न प्रगतीची दिशा खुली करतील. उत्पन्न वाढेल. कलात्मक कामात मन रमेल. अभिनयाच्या क्षेत्रात फायदा होईल. उत्पन्न वाढेल. प्रेमसंबंधात भाग्यवान ठराल. वैवाहिक जीवनात जोडीदार कामात सहकार्य करेल. कौटुंबिक जीवन शांततामय राहील.