30 नोव्हेंबर राशिफळ : 7 राशीवाल्यांसाठी ‘शुभ’ असेल महिन्याचा शेवटचा दिवस, ‘असा’ आहे सोमवार

मेष
आजचा दिवस अनुकूल आहे. आज आत्मविश्वास दाखवाल. कामात पूर्ण लक्ष दिल्यास, चांगले परिणाम मिळतील. प्रेम भावना निर्माण होईल, जी प्रेम संबंधात मदत करेल. प्रिय व्यक्तीशी चांगले बोलाल. त्यांचे मन मोहित कराल. वैवाहिक जीवनात प्रेम वाढेल. कामात मेहनतीचे चांगले परिणाम मिळतील. धर्माप्रती विश्वास वाढेल. धनलाभ होईल. कुटुंबाचा एखादा खास प्रश्न सोडवण्यासाठी वेळ द्याल.

वृषभ
आजचा दिवस अनुकूल आहे. आरोग्याच्या समस्येमुळे त्रस्त होऊ शकता. आजारी पडण्याची शक्यता. वाहन काळजीपूर्वक चालवा, इजा होण्याची शक्यता आहे. भाग्य प्रबळ राहील. कामात यश मिळेल. कामात चांगले परिणाम मिळतील. पैशाच्या मागे धावण्याऐवजी कुटुंबावर लक्ष केंद्रित करणे चांगले राहील. मानसिकदृष्ट्या आनंदी आणि बळकट व्हाल. वैवाहिक जीवनात जोडीदाराशी ट्यूनिंग चांगले राहील. प्रेमसंबंध सामान्य राहिल्याने चेहर्‍यावर हास्य राहील.

मिथुन
आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. खर्चात जी वाढ झाली होती ती कमी होऊ शकते. उत्पन्न वाढीने समाधान मिळेल. वैवाहिक जीवनात तणाव वाढेल. जोडीदार समजून घेण्याचा प्रयत्न करेल. व्यवसायात चांगले यश मिळेल. आरोग्य खराब होऊ शकते. लव्ह लाइफसाठी दिवस उत्तम आहे. रोमान्सची संधी मिळेल. नोकरीत जास्त मेहनतीनेच काम चांगले होईल. आज एखादे कर्ज घेऊ शकता.

कर्क
तुमच्यासाठी आजचा दिवस मध्यम आहे. उत्पन्न वाढेल. उत्पन्नाची नवीन साधने सापडतील. व्यवसाय देखील वाढेल. कामात कार्यक्षमतेवर अवलंबून रहावे लागेल. विरोधकांवर विजय मिळवाल. कोर्ट कचेरीची प्रकरणे तुमच्या फायद्याची ठरतील. खर्चही जास्त होईल. लव्ह लाइफसाठी दिवस चांगला आहे. वैवाहिक जीवन सुखी होईल. कौटुंबिक वातावरण समाधान देईल. घरगुती कामांमध्ये अधिक व्यस्त राहाल. घरगुती खर्च कराल.

सिंह
आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल राहील. कामाला पूजा समजून पूर्ण लक्ष द्याल, यामुळे चांगले परिणाम मिळतील. व्यापारात धनलाभ होईल, पण बिझनेस पार्टनरकडून एखादी समस्य होऊ शकते. प्रेमसंबंधासाठी दिनमान सामान्य आहे. कोणतीही गोष्टी जास्त ताणून धरू नका. कुटुंबातील वातावरण चांगले राहील. वैवाहिक जीवनात आनंददायी परिणाम मिळतील. कौटुंबात मोठ्यांचे सहकार्य मिळेल. व्यापारात एखाद्या नवीन कराराला अंतिम रूप द्याल.

कन्या
आजचा दिवस तुमच्यासाठी सामान्य आहे. कुटुंबात एखादे खास काम होईल, ज्यामुळे लोकांचे येणे-जाणे वाढेल. कुटुंबात उत्साहाचे वातावरण राहील. परंतु एखाद्या गोष्टीवरून त्रासाची स्थिती होऊ शकते, म्हणून सावधगिरी बाळगा. मालमत्तेच्या वादात अडकू नका. कामात मेहनतच उपयोगी येईल, आज काम करण्याचा दिवस आहे. वैवाहिक जीवनासाठी दिवस चांगला आहे. प्रेमसंबंधासाठी दिवस सामान्य आहे. आरोग्याची काळजी घ्या. निष्काळजीपणा केल्यास आजारी पडू शकता.

तुळ
आजचा दिवस चांगला आहे. आव्हाने दूर करण्यातच दिवस निघून जाईल. खूप व्यस्त रहाल. दूरच्या प्रवासाला जाऊ शकता. तीर्थयात्रेचा सुद्धा योग आहे. धार्मिक आचरण कराल. मनात एखाद्या गोष्टीवरून संभ्रम असेल. वैवाहिक जीवनात रोमान्सची संधी मिळेल. कामात नोकरीचे योग बनू शकतात. लव्ह लाइफसाठी दिवस चांगला आहे. प्रिय व्यक्तीसाठी भेटवस्तू आणू शकता आणि तिला कुठेतरी फिरण्यासाठी घेऊन जाऊ शकता. कौटुंबिक वातावरण ठीक राहील. प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी कुटूंबाशी चर्चा करू शकता.

वृश्चिक
आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. दुपारनंतर आरोग्य कमजोर होऊ शकते, म्हणून आरोग्याची काळजी घ्या. सासरच्यांशी वाद होऊ शकतो. वाहन काळजीपूर्वक चालवणे आवश्यक आहे, अन्यथा एखादा अपघात होऊ शकतो. कौटुंबिक वातावरण साथ देईल. शिक्षणात चांगले परिणाम मिळतील. प्रेमसंबंधासाठी चांगला दिवस आहे. प्रवासासाठी दिवस चांगला नाही. कामात चांगले परिणाम मिळतील. वैवाहिक जीवनात थोडे सावध राहा. जोडीदाराशी भांडण होणार नाही, असा प्रयत्न करा.

धनु
आजचा दिवस चांगला आहे. नोकरदारांना चांगले परिणाम मिळतील. जुने कर्ज परतफेड केल्याने दिलासा मिळेल. वैवाहिक जीवनात थोडा ताण येऊ शकतो. आरोग्य बळकट होईल. कामात सहकार्‍यांच्या वागण्याचा आनंद मिळेल आणि यामुळे आत्मविश्वास वाढेल. लव्ह लाईफसाठी दिवस चांगला आहे. रोमान्सची संधी मिळेल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. राग दूर ठेवल्यास सर्व काही चांगले होईल.

मकर
आजचा दिवस मध्यम आहे. लव्ह लाईफमध्ये चांगले परिणाम मिळतील. प्रिय व्यक्तीला सोबत घेऊन कुठेतरी फिरायला जाल. खर्च खूप जास्त होईल. कौटुंबिक वातावरण आनंद देईल. कुटुंबाकडे लक्ष द्याल. एखादी नवीन वस्तू खरेदी करून आणू शकता. वैवाहिक जीवन चांगले राहील. कामासाठी दिवस खूप चांगला आहे. आर्थिक स्थितीकडे लक्ष द्यावे लागेल. कोणालाही कर्ज देणे टाळा. बँक कर्जाची परतफेड करू शकता.

कुंभ
आजचा दिवस अनुकूल आहे. कुटुंबाचे संपूर्ण सहकार्य मिळेल. कुटुंबाच्या घरगुती खर्चावर लक्ष द्याल. उत्पन्न वाढल्यामुळे मन प्रसन्न होईल. वैवाहिक जीवनासाठी दिवस चांगला आहे. पण अभिमानात येऊन कटू बोलू नका, अन्यथा जोडीदार दु:खी होऊ शकतो. कामात चांगले परिणाम मिळतील. व्यवसाय वेग घेईल. प्रेमसंबंधासाठी दिवस आनंदाचा आहे. प्रिय व्यक्ती तुमच्या मनाला आनंद देणारे काहीतरी बोलेल.

मीन
आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. कामाकडे लक्ष देणे आवश्यक आहे. कुणीतरी तुमच्या कमजोरीचा फायदा घेऊ शकतो. धनलाभाचे प्रबळ योग आहेत. लांबचा प्रवास करू शकता किंवा परदेशात जाऊ शकता. विरोधकांपासून सावध राहा. प्रेमसंबंधासाठी दिवस कमजोर आहे. वैवाहिक जीवनासाठी चांगला दिवस आहे. आरोग्य बळकट होईल. एखाद्या जुन्या मित्राला भेटल्याने आनंद होईल. काही नवीन लोकांशी ओळखी होतील. आज स्वत:साठी काहीतरी खरेदी करण्याची इच्छा होईल.