31 जुलै राशीफळ : शुक्रवारी ‘चमकणार’ ‘या’ 6 राशीवाल्यांचे ‘भाग्य’, जाणून घ्या तुमच्या राशीत काय आहे

पोलीसनामा ऑनलाइन

मेष
आजचा दिवस उत्तम आहे. कामात यश मिळेल. गुप्त मार्गाने पैसे येण्याची शक्यता आहे. आरोग्य थोडे कमजोर राहू शकते. चांगले जेवण सेवन करा, जेणेकरुन आरोग्य चांगले राहील. प्रिय व्यक्तीसह चांगला वेळ घालवाल. वैवाहिक जीवनात जोडीदार तुमच्या कार्यक्षेत्रात एखादे मोठे सहकार्य करू शकतो. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. आईचे पाठबळ मिळेल.

वृषभ
आजचा दिवस उलथा-पालथ होण्याचा आहे. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. पैशाचीही योग्य व्यवस्था करावी लागेल. दिवस दोघांसाठी कमजोर आहे. कामात चांगले परिणाम मिळतील. संततीकडून काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. प्रेमसंबंधासाठी दिवस उत्तम आहे, परंतु काही लोक तुमच्या विरोधात उभे राहू शकतात.

मिथुन
आजचा दिवस चांगला आहे. वैवाहिक जीवनात तणावाच्या दरम्यान प्रेमाचे दोन गोड शब्द देखील असतील. नात्यात जवळीक वाढेल. प्रेमसंबंधासाठी उत्तम दिवस आहे. कार्यक्षेत्रात देखील अनेक लोकांच्या सहकार्यातून तुम्ही एखादे चांगले काम करून दाखवाल, ज्यामुळे तुमची प्रशंसा होईल. व्यापाराच्या दृष्टीने आजचा दिवस खुप चांगला आहे. आरोग्य कमजोर राहील. विरोधकांवर मात कराल. मानसिक ताण जाणवेल.

कर्क
आजचा दिवस थोडा कमजोर आहे. कामात उशीर होईल. कुणालाही काहीही वाईट बोलू नका, जेणेकरून त्याचे मन दुखावले, आणि तुमचेच तुमच्याशी शत्रूसारखे वागतील. भाग्य कमजोर राहील. प्रत्येक काम यशस्वी करण्यासाठी जास्त मेहनत करावी लागेल. प्रेमसंबंधासाठी दिवस कमजोर आहे. आरोग्य देखील थोडे कमजोर होऊ शकते. कामात एखाद्या गोष्टीबद्दल मन अस्वस्थ होऊ शकते.

सिंह
आजचा दिवस चांगला आहे. उत्पन्नामध्येही वाढ होईल. खर्च कमी होईल. दिवस आनंदात घालवाल. प्रिय व्यक्तीसोबत वेळ घालवण्याची चांगली संधी मिळेल. कुटुंबातील एखाद्या वडिलधार्‍याचे आरोग्य बिघडेल. इच्छा पूर्ण होतील. कामात अजून खुप काही शिकणे बाकी आहे. विचारपूर्वक काम करावे लागेल.

कन्या
आजचा दिवस महत्त्वपूर्ण आहे. आजचा दिवस कार्यक्षेत्रात बरीचशी अनुकूलता घेऊन येईल. तुम्ही खूप रोमँटिक मूडमध्ये राहाल. कामात यश मिळेल. प्रिय व्यक्तीबरोबर फिरायला किंवा चित्रपट पाहण्यासाठी जाऊ शकता. काम चागल्या प्रकारे कराल. कौटुंबिक जीवनात अडचणी येतील. आई-वडीलांची तब्येत बिघडू शकते. काही लोकांना तुमच्या मालमत्तेवर वाद निर्माण करायचा आहे, त्यांच्यापासून सावध राहा.

तुळ
आजचा दिवस प्रगतीदायक आहे. छोट्या-छोट्या प्रवासातून नवे संबंध तयार कराल. कौटुंबिक जीवनात आनंद राहील. मित्र व नातेवाईकांशी संबंध वाढतील. सोबत काम करणार्‍यांशी चांगले वागल्याने कार्यक्षेत्रात यशस्वी व्हाल. प्रेमसंबंधात संमिश्र परिणाम मिळतील. वैवाहिक जीवनात जोडीदाराला शारीरिक समस्या त्रास देऊ शकतात. जोडीदाराच्या माध्यमातून एखादा लाभ होऊ शकतो.

वृश्चिक
पैशाच्या बाबतीत आजचा दिवस उत्तम आहे. मोठा धनलाभ होण्याचे योग बनू शकतात. सासरच्या लोकांकडूनही चांगली माहिती मिळेल ज्यामुळे मन आनंदित होईल. रागावर नियंत्रण ठेवल्यास, यश पायाशी येईल. कार्यक्षेत्रात स्थिती तुमच्या बाजूने असेल. कुटुंबातील लहानांकडून सूख मिळेल. वैवाहिक जीवनासाठी दिवस अनुकूल आहे. प्रेमसंबंधात प्रिय व्यक्ती तुमच्यावर प्रेम व्यक्त करेल. त्यातून तुम्हाला आनंद मिळेल.

धनु
आजचा दिवसात चढ-उतार जाणवतील. खर्च वाढेल, पण उत्पन्नही वाढेल. आरोग्य कमजोर होऊ शकते. मानसिक ताणातून मुक्त होण्याची वेळ आली आहे. वाहन काळजीपूर्वक चालवा, अपघात होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात काही गोष्टीत सुधारणा होईल. एकमेकांच्या जवळ येऊ शकता. कौटुंबिक जीवन चांगले राहील. प्रेमसंबंधात कडवटपणा येऊ शकतो.

मकर
आजचा दिवस थोडा कमजोर आहे. मानसिक ताण येईल. खर्चही जास्त होईल. उत्पन्नही अपेक्षेपेक्षा थोडे कमी होईल. जसजसा दिवस वाढत जाईल तसतशी स्थिती सुधारेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. स्वत:ची काळजी घ्या. मालमत्तेच्या बाबतीत फायदा होईल. कामात स्थिती पूर्णपणे तुमच्याकडे झुकलेली असेल. वैवाहिक जीवन आणि प्रेमसंबंध खुप चांगले राहतील.

कुंभ
आजचा दिवस चांगला आहे. कामात तुमचा प्रभाव असेल. बॉसशी संबंध सुधारतील. चांगले उत्पन्न होईल. व्यापारासाठी केलेल्या प्रवासात यश मिळेल. उत्पन्नाचा लाभ मिळेल. प्रेमाच्या बाबतीत भाग्यवान ठराल, भरपूर प्रेम मिळेल. वैवाहिक जीवनात जोडीदाराच्या माध्यमातून लाभ मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनात काही अडचणी येतील.

मीन
आजचा दिवस चांगला आहे. परंतु दिवस थोडा आव्हानात्मक असेल. बुद्धिमत्ता कामी येईल. पैशाच्या बाबतीत दिवस चांगला जाईल. वडिलांची तब्येत बिघडू शकते, पण तुमच्या तब्येतीत सुधारणा होईल. कौटुंबिक जीवनासाठी अनुकूल काळ आहे. प्रेमसंबंधात दिवस प्रेममय असेल. प्रिय व्यक्तीचा पूर्ण साथ मिळेल. वैवाहिक जीवनात एखाद्या तणावाचा सामना करावा लागू शकातो.