5 ऑगस्ट राशिफळ : जाणून घ्या ‘बुधवारी’ काय म्हणत आहेत तुमचे ‘ग्रह’

पोलीसनामा ऑनलाइन

मेष
आज सर्व लक्ष उत्पन्नावर केंद्रित कराल. आजचा दिवस चांगला आहे. कामात व्यस्त रहाल. कुटुंबाची काळजी घ्याल. वैवाहिक जीवन तणावपूर्ण राहील. प्रेमसंबंधात आनंद राहील. परस्पर संबंध दृढ होतील. आरोग्य सामान्य राहील.

वृषभ
कामावर पूर्ण फोकस राहील. दिवस चांगला जाईल. उत्पन्न वाढेल, ज्यामुळे मनाला आनंद मिळेल, आरोग्य स्थिर राहील. पूजाअर्चनेत मन लागेल, घरात आनंद राहील. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. प्रेमसंबंधात मनात अनेक इच्छा असतील आणि प्रिय व्यक्तीस आनंदी ठेवण्याचे प्रयत्न यशस्वी होतील.

मिथुन
स्वत:च्या इच्छा वाढत आहेत. स्वतःवर खर्च कराल. नवीन मोबाइल खरेदी करू शकता. काम मनावर घ्याल. वैवाहिक जीवनात चढ-उतार राहील. वैवाहिक जीवनात काही नवीन बदल आणण्याचा प्रयत्न कराल, जीवनात आनंद येईल. प्रेमसंबंधात प्रेमाने परिपूर्ण रहाल. मनात प्रेमभावना येईल. नाती मजबूत होतील.

कर्क
आरोग्याची काळजी घ्या. जास्त खाऊ नका आणि शुद्ध पाणी प्या. काळजी घेतल्यास आरोग्य ठीक होईल. वैवाहिक जीवनात चढ-उतार येतील. प्रेमसंबंधासाठी चांगला दिवस आहे. लाँग ड्राईव्हवर जाण्याची संधी मिळू शकते. प्रेमसंबंधात नात्यात खूप सकारात्मक असेल. कामासाठी दिनमान सामान्य आहे.

सिंह
आज खूप दूर जाण्याचा प्रयत्न कराल. परदेशी कंपनीत नोकरीसाठी अर्ज करू शकता. यशाची शक्यता आहे. उत्पन्न वाढेल. हलका खर्चही होईल. प्रेमसंबंधात जीवन सामान्य राहील. वैवाहिक जीवन न्यायी राहील. कामात योजना यशस्वी होतील. उत्पन्न वाढेल. तुमचा आदरही वाढेल.

कन्या
आजचा दिवस थोडा कमजोर आहे. कोणतीही मोठी कामे हातात घेऊ नका. आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतो. चिंतेपासून दूर रहाण्याचा प्रयत्न करा. वैवाहिक जीवनात इतरांच्या हस्तक्षेपामुळे समस्या उद्भवू शकतात. प्रेमसंबंधात चढउतार होतील. कामात मन रमेल, त्याचे चांगले परिणामही मिळतील.

तुळ
दिवस चांगला बनविणे तुमच्या हातात आहे. जास्त मेहनत कराल. प्रेमसंबंधात सुखी व्हाल. वैवाहिक जीवनाचा आनंद लुटाल. कामात शहाणपण आणि बुद्धिमत्तेमुळे चांगले परिणाम मिळतील. आरोग्य चांगले राहील. दिवस चांगला जाईल.

वृश्चिक
आजचा दिवस चांगला आहे. घराकडे आणि मुलांवर लक्ष केंद्रित कराल, जेणेकरून नात्यात जवळीक वाढेल. कामासाठी दिनमान ठीक आहे. भाग्याची साथ मिळाल्याने अनेक कामे मार्गी लागतील. आरोग्य चांगले राहील, मनोबल चांगले असेल. उत्पन्नात वाढ होईल. प्रेमसंबंध सामान्य परिणामासह पुढे जातील. वैवाहिक जीवनात प्रेम आणि समजूतदारपणा दिसून येईल.

धनु
आरोग्यात चढ-उतार होईल. धार्मिक विचार मनात येतील. एखाद्या मंदिरात जाल. कामासाठी दिनमान कमजोर आहे. चढ-उतार येतील. कामावर लक्ष द्या. वैवाहिक जीवन ठीक राहील. नात्यात प्रेम वाढेल. प्रेमसंबंधात प्रिय व्यक्ती अशा गोष्टी बोलेल ज्या तुम्हालाकदाचित माहित नसतील.

मकर
आजचा दिवस चांगला जाईल. उत्पन्न वाढेल, ज्यामुळे आर्थिक स्थिती देखील सुधारेल. मन आनंदित होईल. कुटुंबात आनंद होईल. कौटुंबिक जीवन आनंदी असेल. प्रेमसंबंधात आनंद उघडपणे घ्याल. विरोधकांपासून सावध राहा. खाणे-पिणे नियमित ठेवा, अन्यथा आरोग्य बिघडू शकते. कामासाठी दिनमान चांगले आहे. नोकरीत तुमची बाजू अधिक मजबूत होईल.

कुंभ
आजचा दिवस चांगला आहे, फक्त आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. अनावश्यक खर्च टाळा. उत्पन्न चांगले मिळेल. धार्मिक कार्यातही खर्च होईल. कुटुंबाच्या गरजा भागवाल. सर्जनशील विचारामुळे वैवाहिक जीवन अधिक मजबूत होईल. जोडीदाराला आनंदी ठेवण्यासाठी काही मार्ग शोधाल. प्रेमसंबंधासाठी दिवस रोमँटिक असेल. कामासाठी दिनामान मजबूत आहे.

मीन
आरोग्यामध्ये चढउतार होईल. खर्चही जास्त होईल, म्हणून सावधगिरीने दिवसाची सुरुवात करा. घरात मन रमेल. काहीतरी नवीन खरेदी करू शकता. ज्यामुळे घरात आनंद राहील. कामात खूप व्यस्त राहाल. वैवाहिक जीवन सामान्य राहील. कामात अधिक व्यस्त राहाल. प्रेमसंबंधात मनापासून प्रिय व्यक्तीस आनंदित ठेवाल. नाते चांगले होईल.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like