4 मे राशीफळ : ‘या’ 5 राशिवाल्यांच्या हातात येईल पैसा, नोकरी-व्यापारात होईल लाभ, इतरांसाठी असा आहे मंगळवार

0
40
horoscope today aaj che rashifal horoscope 04 may 2021
File photo

मेष
आजचा दिवस व्यस्तता आणि धावपळीचा आहे. आज कर्ज घेऊ नका, फेडणे अशक्य होईल. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. रात्रीचा वेळ मजेत घालवाल. शासनाकडून सन्मान मिळू शकतो. मोठ्या कालावधीनंतर एखाद्या मित्राची भेट झाल्याने मन आनंदी होईल. काही नवे मित्र सुद्धा होतील.

वृषभ
आजचा दिवस संमिश्र आहे. प्रवास करावा लागू शकतो, पण सावध रहा, दुखापतीची शक्यता आहे. एखाद्या कामासाठी खुल्या मनाने खर्च केल्यास भविष्यात लाभ होईल. निर्णय घेण्याची क्षमता लाभ देईल. जे निर्णय घ्याल त्यामध्ये यश मिळेल. रखडलेली कामे पूर्ण होतील.

मिथुन
आज अनावश्यक खर्च होईल, पण हे टाळा. संततीकडून हर्षवर्धक बातमी समजेल. काही आजार असेल तर तो वाढू शकतो. सामाजिक कार्यात उपस्थित राहाल. एखाद्याच्या मदतीने अचानक लाभ होईल. सायंकाळपासूनचा वेळ भजन-कीर्तनात घालवाल.

कर्क
आजचा दिवस व्यापारासाठी उत्तम आहे. एखादी डिल फायनल होऊ शकते. आईच्या माहेरातून प्रेम मिळेल. स्वतःसाठी पैसा खर्च कराल. आई-वडिलांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. मेहनतीचे फळ प्राप्त होईल, ज्यामुळे मन आनंदी होईल.

सिंह
आजचा दिवस संमिश्र फलदायक आहे. डोळ्यांच्या संबंधीत त्रास असेल तर सुधारणा होईल. सासरच्या एखाद्या व्यक्तीशी वाद होईल. परंतु वाणी मधुर ठेवा, अन्यथा नाते बिघडू शकते. तणाव येऊ शकतो, ज्यामुळे गोंधळू शकता. आई-वडीलांच्या आशीर्वादाने दिलासा मिळेल. रूसलेल्या जोडीदाराची समजू काढावी लागेल.

कन्या
आज निर्भिड भावना राहील. धाडसाने कठिण कामे यशस्वी कराल. जोडीदाराला शारीरीक त्रास होऊ शकतो. लोकांना मदत कराल, पण लोक याचा गैर अर्थ काढतील. व्यापारात धनलाभ होईल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. वादात पडू नका. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यश मिळेल. संपत्ती खरेदीसाठी उत्तम दिवस आहे.

तुळ
आजचा दिवस मंगलमय आहे. अधिकार आणि संपत्तीत वाढ होईल. नवीन कामात गुंतवणुकीसाठी दिवस चांगला आहे. लोकांना केलेल्या मदतीचा चुकीचा अर्थ लावला जाईल. सासरकडून मान सन्मान मिळेल. अडकलेले पैसे भावाच्या मदतीने मिळू शकतात.

वृश्चिक
आज मनशांती लाभेल. व्यापारातील प्रयत्न यशस्वी होतील. मन शांत राहील. काही वाद सुरू असेल तर त्यामध्ये यश मिळण्यासाठी प्रतिक्षा करावी लागेल. भाऊ किंवा बहिणीच्या विवाहाचा प्रस्ताव मंजूर होईल. व्यापारातील अडचणी दूर करण्यासाठी वडीलांचा सल्ला घ्याल, ज्यामुळे लाभ होईल.

धनु
आजचा दिवस परोपकारात जाईल. दान-पुण्य आणि परोपकाराची भावना वाढेल. सासरकडून धनलाभ होऊ शकतो. सायंकाळी पोट, वायु समस्या त्रास देऊ शकतात. बाहेरचे खाणे-पिणे टाळा. रखडलेल्या कामासाठी वेळ काढा. नोकरी करणार्‍यांना प्रमोशन मिळू शकते.

मकर
आजचा दिवस संमिश्र परिणामांचा आहे. बहुमूल्य वस्तु मिळतील. अनावश्यक खर्च समोर येतील, जे करावेच लागतील. मान सन्मान मिळेल. रखडलेली कामे पूर्ण होतील. नवीन काम सुरू करू शकता, भविष्यात लाभ होईल. सायंकाळी आई-वडिलांची सेवा कराल. संततीचे चांगले कार्य पाहून आत्मविश्वास वाढेल.

कुंभ
आजचा दिवस संमिश्र आहे. व्यापारात वाढेल. घेतलेल्या निर्णयाचा भविष्यात भरपूर लाभ होईल. कुटुंबियांकडून विश्वासघात होऊ शकतो. जुना मित्र भेटू शकतो. मन प्रसन्न होईल. व्यापारासाठी प्रवास करावा लागू शकतो. संसारिक सुखाच्या साधनांत वाढ होईल, यासाठी खर्च कराल.

मीन
आजचा दिवस उत्तम फलदायक आहे. मोठ्या काळापासून अर्धवट असलेले एखादे काम पूर्ण कराल. मुलगा किंवा मुलीच्या विवाहाचा निर्णय घ्याल. मित्रांच्या संख्येत वाढ होईल. रात्री मित्रांसोबत वेळ मजेत घालवाल. सामाजिक सन्मान मिळू शकता, ज्यामुळे मनोबल वाढेल. राजकारणात प्रसिद्धी वाढेल.