6 मे राशीफळ : ‘या’ 4 राशींसाठी चांगली नाही ग्रहांची स्थिती, धनहानीचे संकेत, इतरांसाठी असा आहे गुरुवार

मेष
आजचा दिवस यशदायक आहे. कणीतरी समस्या निर्माण करू शकते, विचारपूर्वक काम करा. सायंकाळ घरातील लहान मुलांसोबत घालवाल. संततीच्या भविष्यासाठी धावपळ करावी लागेल. कार्यक्षेत्रात सहाकार्य मिळेल. रात्री घरातील लोकांसोबत चर्चा कराल. त्यांच्याकडून सल्ला घ्याल.

वृषभ
आजचा दिवस संमिश्र परिणामांचा आहे. व्यवसायात चांगली खबर मिळेल. जमीनीच्या खरेदीत कायगदपत्र तपासून घ्या, पश्चाताप होऊ शकतो. मोठ्या प्रमाणात पैसा मिळण्यात उशीर होऊ शकतो. नोकरीत काही अडचणी भासतील, परंतु वरिष्ठांच्या मदतीने त्या दूर होतील.

मिथुन
आजचा दिवस चढ-उतारांचा आहे, यामुळे दिवस अस्ताव्यस्थ असेल. विद्यार्थ्यांना नवीन कोर्सच्या प्रवेशासाठी चांगला दिवस आहे. नोकरी, व्यवसायाच्या कामात गंभीर व्हाल, परंतु मन थोडे अस्वस्थ राहील. हरवलेली वस्तू सापडेल. शुभवार्ता समजेल, नात्यातील दूरावा दूर होईल.

कर्क
आजचा दिवस रंगीबेरंगी असेल. मित्राला मदत करा, ज्यासाठी रूटीनमध्ये बदल करावा लागेल. नवीन कामात अडथळा येईल, काही वेळानंतर सर्व कामे होतील. सामाजिक क्षेत्रात अडचणी येतील, अस्वस्थ रहाल. संततीची प्रगती पाहून मन प्रसन्न होईल, त्याच्या भविष्याची चिंता कमी होईल.

सिंह
आजचा दिवस संमिश्र परिणामांचा आहे. कोणत्याही कामात संभ्रमाची स्थिती निर्माण होईल, पण एखादे काम पूर्ण केले तर विजय आवश्य होईल. व्यापार्‍यांच्या कामाईत वाढ होईल, खर्च होईल. घरात सकारात्मक वातावरण राहील. संपत्तीचे प्रकरण अधिकार्‍याच्या मदतीने मार्गी लागेल, यश मिळेल.

कन्या
आज मजामस्ती करत काम करण्याचा मूड असेल. रचनात्मक कामाची संधी मिळेल. तुमच्यातील प्रतिभा बाहेर येईल. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत मिळतील. व्यवसायात निर्णय विचारपूर्वक घ्या, अन्यथा भविष्यात समस्या निर्माण होईल. नोकरीत सहकारी मदत करतील. कुटुंबात काही शत्रु बनू शकतात, ज्यामुळे आईसोबत वाद होऊ शकतो.

तुळ
आजचा दिवस व्यस्ततेचा आणि धावपळीचा आहे. कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांशी भविष्याच्या योजनांवर चर्चा कराल. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. पूर्वीच्या कामांमुळे सन्मान मिळेल. सासरच्या बाजूकडून लाभ होईल. प्रेमसंबंधात तडजोड करावी लागेल. नोकरीत वेळेत काम करून शत्रुला हैराण कराल. अधिकारी कौतूक करतील.

वृश्चिक
आजचा दिवस उत्तम फलदायक आहे. सामाजिक क्षेत्र वाढेल. समाजासाठी काम कराल, मनशांती मिळेल. मित्रांची संख्या वाढेल. आई-वडीलांच्या सेवेची संधी मिळेल, त्यांच्या सहकार्याने कौटुंबिक व्यापारात यश मिळेल. ऑफिसचे वातावरण चांगले वाटणार नाही, धैर्याने काम करा. प्रेमसंबंध आनंदी राहतील.

धनु
आज वातावरण थोडे गंभीर राहील. विवाहाचे चांगले प्रस्ताव येतील. विद्यार्थ्यांना आपली पात्रता जाणून घेण्याची संधी मिळेल. वडीलांशी वाद होऊ शकतो, ज्यामुळे घरचे वातावरण थोड तणावाचे होऊ शकते. व्यापारात काम कमी, पण धनलाभ जास्त होईल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. सायंकाळी जोडीदारास बाहेर फिरायला घेऊन जाल.

मकर
आजचा दिवस फलदायक आहे. मेहनतीएवढे फळ मिळेल, पण मेहनतीत कसर ठेवू नका. व्यापारासाठी प्रवास करावा लागेल. परदेशाशी व्यापारात शुभवार्ता मिळेल. संततीच्या विवाहातील अडचणींबाबत वडीलांचा सल्ला घ्याल. सायंकाळी कुटुंबासह देवदर्शनसाठी जाऊ शकता.

कुंभ
आजचा दिवस आर्थिकदृष्ट्या निराशाजनक आहे. धैर्य, संयमाने ऑफिसमधील समस्यांचा यशस्वीपणे सामना कराल. प्रेमसंबंधासाठी दिवस उत्तम. विवेक बुद्धीने व्यापारात नाविन्य आणण्याचा प्रयत्न कराल. विद्यार्थ्यांना अर्धवट लक्ष्य पूर्ण करण्यासाठी शिक्षकांची आवश्यकता असेल. रखडलेली कामे पूर्ण करण्यास तत्पर रहाल.

मीन
दिवस उत्तम फलदायक आहे. व्यापारात डील फायनल करताना टेन्शन घेऊ नका. खर्चावर नियंत्रण ठेवणे कठिण वाटेल, पण थोडी सक्ती दाखवल्यास शक्य आहे. सायंकाळी बाहेरील लोक समस्या घेवून येतील. तुमच्या मार्गदर्शनाने लोकांना लाभ होईल. सामाजिक कक्षा वाढेल. रात्रीचा वेळ आई-वडीलांच्या सेवेत घालवाल.