7 मे राशीफळ : ‘या’ 5 राशींना मिळतील शुभ परिणाम, भाग्याची मिळेल साथ, इतरांसाठी असा आहे शुक्रवार

मेष
आजचा दिवस महत्वाकांक्षांच्या पूर्ततेचा आहे. व्यवसायात धनलाभ होईल पण विलंबाने. प्रेमसंबंधात नवी उर्जा येईल. कुटुंबातील वातावरण छोट्या गोष्टीवरून बिघडेल, पण सायंकाळी ठिक होईल. विद्यार्थ्यांना यश मिळेल. नवीन व्यवसायासाठी दिवस चांगला. सायंकाळी मित्रांसोबत पार्टी करू शकता.

वृषभ
आजचा दिवस संमिश्र आहे. भावांशी ताळमेळ कमी राहील. विचारांच्या उलट काम केल्याने वाद होऊ शकतो. आरोग्य आणि दाम्पत्य जीवनात चढ-उतार राहील. आर्थिक स्थिती जास्त मेहनतीनंतर चांगली होईल. उत्पन्न वाढेल. व्यापारासाठी केलेला प्रवास लाभदायक ठरेल. भावाच्या विवाहाची चिंता सतावू शकते.

मिथुन
आजचा दिवस ठोस परिणामांचा आहे. व्यस्तता असून प्रेमसंबंधासाठी वेळ काढाल. कार्यक्षेत्रातील वातावरणात मनासारखी सुधारणा होईल. सहकार्‍यांची साथ मिळाल्याने प्रोजेक्ट वेळेत पूर्ण होईल. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा. रोजच्या गरजांसाठी पैसे खर्च कराल. आर्थिक स्थितीवर भार येईल. मजबूती येण्यासाठी विचारपूर्वक पैसे खर्च करा.

कर्क
आजचा दिवस विचारांपेक्षा उलट असेल. विचार एक कराल, आणि होईल दुसरेच. व्यासायातील निर्णय उत्तम ठरेल. व्यापार्‍यांना नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळेल. नोकरीत करियरच्या प्रस्तावावर सर्वबाजूने विचार करा. बहिण-भावांसोबत वेळ चांगला जाईल. नाते मजबूत होईल. प्रेमसंबंधात प्रेम, सन्मान मिळेल. जुन्या योजनांतून लाभ मिळेल.

सिंह
आजचा दिवस उत्तम यशदायक आहे, परंतु वाणी आणि वर्तणुकीवर नियंत्रण ठेवा. व्यापारात जोखीम घेतल्यास लाभ होईल. ऑफिसमध्ये अधिकार्‍यांशी संबंध सुधारतील. राजकारणासाठी वेळ चांगली आहे. उत्पन्न आणि खर्चात संतुलन ठेवा. अन्यथा आर्थिक स्थिती चिंता सतावू शकते.

कन्या
आजचा दिवस संमिश्र परिणामांचा आहे. भावांशी मर्यादित संबंध ठेवेण चांगले राहील. घरातील वातावरण सामान्य राहील. आरोग्य थोडे नरम राहील. ऑफिसमध्ये अर्धवट असलेली कामे पूर्ण करा. आईसाठी भेटवस्तू खरेदी कराल. भागीदारीच्या व्यवसायात उत्तम लाभ होईल.

तुळ
आजचा दिवस संमिश्र आहे. संततीचे चांगले काम पाहून आनंद होईल. कार्यक्षेत्रात गुंतवणूक केल्याने स्थिती नियंत्रणात येईल. चांगला लाभ होईल. अनेक दिवसांपासूनची आर्थिक तंगी कमी होईल. मात्र, धनलाभ अंशता होईल. संततीच्या शिक्षणासाठी पैसे खर्च होतील. नवीन प्रॉपर्टी खरेदीसाठी दिवस उत्तम आहे.

वृश्चिक
आजचा दिवस संमिश्र आहे. व्यवसायात पूर्वीचे निर्णय सार्थकी लागतील, लाभ होईल. भागीदारीच्या व्यापारात लाभ होईल. दाम्पत्य जीवनात मधुरता येईल. परोपकारात पैसे खर्च होतील. सामाजिक कक्षा वाढेल. भाऊ लाभदायक ठरतील. मात्र, तुम्ही केलेल्या आर्थिक सहार्याचा दुरूपयोग होऊ शकतो. संततीच्या विवाहाची चर्चा कराल.

धनु
आजचा दिवस संमिश्र परिणामांचा आहे. कुटुंबात मंगलकार्य आयोजित केले जाईल. विवाहाच्या प्रस्तावर चर्चा होईल. जोडीदाराकडून भेट मिळू शकते. प्रेमसंबंधात नवीन उत्साह जाणवेल. एखादा आजार असेल तर आज त्रास वाढेल. आर्थिक स्थितीच्या मजबूतीसाठी व्यापारात नवीन बदल करू शकता.

मकर
आजचा दिवस उत्तम फलदायक आहे. मित्रासोबत असलेला तणाव संपेल. भावाच्या सहाकार्याने कौटुंबिक बिझनेसमधील समस्या संपतील. आर्थिक बाजू उत्तम आहे, व्यापारात लाभ होईल. शत्रुला कमजोर समजू नका, त्रास होऊ शकतो. विद्यार्थ्यांना स्पर्धेत सुखद निकाल मिळेल. सामाजिक क्षेत्रात प्रसिद्धी वाढेल. नवीन मित्र होतील.

कुंभ
आजचा दिवस विजय देणारा आहे. परंतु सदुपयोग करून घ्या. सासरच्या बाजूशी संबंध मधुर होतील. सहकार्य लाभेल. राजकीय पक्षाकडून नवीन सौदा होईल. वडीलांच्या मार्गदर्शनाने कार्यक्षेत्रातील समस्या सुटतील. राजकारणात चांगले जनसमर्थन मिळेल. नोकरीत कामात लक्ष द्या, शत्रु चुगली करू शकतो.

मीन
आजचा दिवस ठोस फलदायक आहे. एखाद्या कामासाठी उत्साहित असाल, जे दुपारनंतर पूर्ण होईल. व्यापारातील कामात तातडीने निर्णय घ्या, अन्यथा संधीचे योग्य फळ मिळणार नाही. वडीलांच्या आरोग्यासाठी अस्वस्थ रहाल, बाहेरचे खाणे टाळा. रखडलेले काम मित्राच्या सहकार्याने पूर्ण होईल. पाहुण्यांचे आगमन होईल.