8 मे राशिफळ : ग्रहांच्या शुभ दशेचा या 6 राशींना होणार लाभ, खिशात येईल पैसा, इतरांसाठी असा आहे शनिवार

मेष
आजचा दिवस व्यापारासाठी अनुकूल आहे. कार्यक्षेत्रात लाभाचे अनेक सौदे होती. पण त्यांचा संपूर्ण लाभ घेऊ शकणार नाही. घरातील लोक जास्त विश्वास ठेवतील, कामाकडे दुर्लक्ष केल्याने दुखावतील. वागण्यात सौम्यता ठेवली तर कुणाकडूनही काम करून घ्याल. मित्रांसोबत सायंकाळी फिरायला जाल. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाचा मार्ग मिळेल.

वृषभ
संमिश्र परिणामंचा दिवस आहे. व्यापारात लाभासाठी जास्त मेहनत करावी लागेल. नवीन योजनांवर काम करा. नोकरीत अधिकार्‍यांची वाद होऊ शकतो, जे नुकसानकारक ठरेल, रागावर नियंत्रण ठेवा. सायंकाळी सामाजिक संबंधातून लाभ होईल. नविन योजनांना बळ मिळेल. नोकरीत लक्ष देऊन काम करा, अन्यथा त्रास होईल.

मिथुन
संमिश्र दिवस आहे. सकाळपासूनच छोटे लाभ होतील. मात्र मेहनत सुरूच ठेवा. वडीलांच्या सहकार्याने कौटुंबिक बिझनेसमध्ये काही मुद्दे मार्गी लागतील. घरात एखादी अशुभ माहिती मिळाल्याने तणाव होऊ शकतो. नोकरीत शत्रु त्रास देण्याचा प्रयत्न करतील, पण अपयशी ठरतील. सायंकाळी मित्र आणि कुटुंबासोबत रहाल.

कर्क
आर्थिक प्रगतीसाठी दिवस चांगला. भावांच्या सहकार्याने रखडलेली कामे पूर्ण होतील. व्यापारातून छोटे लाभ होत राहतील, पण मेहनत करत रहा. घरात जी गोष्ट लपवण्याचा प्रयत्न कराल तीच तक्रारीचे कारण ठरेल. सायंकाळी सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. रखडलेले काम सहज पूर्ण होईल.

सिंह
मनात संयम आणि संतोष राहील. कार्यक्षेत्रात विरोधकांकडे लक्ष न देता तुमचे काम करा, मोठे यश मिळेल. अनोळखी व्यक्तीशी व्यवहार करू नका, पैसे अडकू शकतात. उत्पन्न कमी आणि खर्च जास्त झाल्याने आर्थिक संतुलन बिघडेल. सायंकाळी सामाजिक जबाबदारी वाढेल. जोडीदाराची साथ लाभेल. संततीचे काम पाहून आनंद होईल.

कन्या
उत्तम फलदायक दिवस आहे. व्यवसायात नवीन डीलमधून भरपूर लाभ होईल. विपरीत स्थितीत रागावर नियंत्रण ठेवा, वाणी सौम्य ठेवा. प्रेमसंबंध मुधर राहतील. ज्येष्ठांच्या मदतीने घरातील समस्या मार्गी लागतील. सायंकाळी अचानक धनलाभ होईल. सायंकाळी संततीच्या भविष्याची चिंता वाटू शकते.

तुळ
ठोस परिणामांचा दिवस आहे. संततीच्या समस्यांवर मार्ग न निघाल्याने मानसिक अशांती वाढेल. पूर्वी केलेल्या चुकीचा आज पश्चाताप होईल. परंतु स्थितीत सुधारणा केल्याने बरे वाटेल. नोकरी, व्यवसायाची स्थिती चांगली राहील. सासरकडून सन्मान मिळेल. मित्राच्या मदतीने पुढे जाल, यात पैसे खर्च होतील.

वृश्चिक
सार्वजनिक क्षेत्रात सन्मान मिळेल. सरकारी योजनेचा पूर्ण लाभ घ्याल. आई किंवा घरातील महिलांचे आरोग्य थोडे कमजोर राहील्याने वातावरण अस्ताव्यस्त राहील. उधारीचा व्यवहार करू नका, आर्थिक समस्या वाढू शकते. सायंकाळी निराशाजनक विचार टाळा. सकाळी रागावर नियंत्रण ठेवा. व्यापारातील योजनांसाठी पैसे खर्च कराल.

धनु
नवीन अनुभव घ्याल. जवळच्या व्यक्तींच्या मदतीने अडकलेले पैसे मिळतील. व्यापारात रोजच्या कामात टाळाटाळ करू नका. व्यापारात लाभाच्या अनेक संधी जवळ येता-येता रखडतील. पण तरीही एखाद्या सहकार्याने धनलाभ होईलच. विद्यार्थ्यांना शिक्षकांचा आशीर्वाद मिळेल.

मकर
संमिश्र दिवस आहे. सामाजिक क्षेत्रात सन्मान मिळेल. कार्यक्षेत्रात वरिष्ठांशी मतभेद होणार नाही याची काळजी घ्या, काम वेळेत करा. दुपारी पाहुण्याचे आगमन होईल. दाम्पत्य जीवन चांगले राहील. सामाजिक क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. सायंकाळी आईच्या तब्येतीची काळजी घ्या.

कुंभ
संमिश्र परिणामाचा दिवस आहे. चांगल्या राहणीमुळे सामाजात श्रीमंतांशी ओळखी वाढतील. वडीलांच्या मार्गदर्शनाने प्रत्येक क्षेत्रात लाभ मिळेल. भाऊ-बहिणीचे सहाकार्य मिळाल्याने मन प्रसन्न राहील. प्रवासात सामान चोरी होऊ शकते. सासरकडून पैसे मिळू शकतात. व्यापारात लाभाच्या नव्या संधी मिळतील, पण त्या ओळखा.

मीन
उत्तम फलदायक दिवस आहे. व्यापरात लाभाच्या अनेक संधी मिळतील, पण मनोरंजनात रुची असल्याने जास्त लक्ष देणार नाहीत. ज्यामुळे संधी निसटून जाईल. विद्यार्थ्यांना शुभवार्ता समजेल. सायंकाळी संततीसंबंधी समस्या सोडवण्यात व्यस्त असाल. व्यापारासाठी प्रवास करू शकता, पण सामान आणि आरोग्य दोघांची काळजी घ्या.