9 जून राशीफळ : ‘या’ 5 राशींना होणार धनलाभ, ग्रह-नक्षत्राची मिळेल पूर्ण साथ, इतरांसाठी असा आहे बुधवार

मेष
horoscope 09 june 2021 : दिवस संमिश्र आहे. चंचलता असेल, व्यापारातील कामे आणि निर्णयाकडे दुर्लक्ष झाल्याने नुकसान होऊ शकते. आर्थिक दृष्टिकोणातून दिवस उत्तम आहे. मालमत्तेत गुंतवणुकीसाठी दिवस उत्तम आहे. मामाच्या बाजूकडून धनलाभ होईल. नोकरीत चांगले पद मिळेल. वाणी मधुर ठेवा, यश मिळेल.

वृषभ
स्थिती प्रतिकुल राहील. व्यापारात पैशावरून वाद होईल, वाणी मधुर ठेवा, अन्यथा नुकसान होऊ शकते. सरकारी नोकरीत पदोन्नती होईल. घरातील वाद टाळा. आई-वडीलांसाठी आवश्यक वस्तू खरेदी कराल. कार्यक्षेत्रात सहकारी त्रास देतील, पण शांत रहा, वरिष्ठांशी वाद होऊ शकतो.

मिथुन
दिवस शुभ आणि सन्मानप्राप्तीचा आहे. सामाजिक क्षेत्रात स्पर्धा वाढेल. सासरकडील व्यक्तीला उधार देताना विचार करा, नाते बिघडू शकते. नोकरी आणि व्यवसायात सहकार्य मिळेल. कुटुंबात तणाव वाढेल. सायंकाळी कला, संगीताचा आनंद घ्याल.

कर्क
निष्काळजीपणामुळे त्रास होऊ शकतो. कार्यक्षेत्रात निष्काळजीपणाचा फायदा शत्रु घेतील. सायंकाळी जोडीदाराला बाहेर घेऊन जाल. प्रवास करावा लागेल, सावध रहा, वस्तू चोरीला जाऊ शकते.

सिंह
कार्यक्षेत्रात व्यस्तता राहील. कामे पूर्ण करण्यासाठी आळस सोडा. अन्यथा नुकसान होईल. रखडलेले काम पूर्ण होईल. घरात मंगलकार्य होऊ शकतो. आजार त्रास देऊ शकतो, खाण्या-पिण्याची काळजी घ्या. नवीन मित्र होतील. ज्याचा भविष्यात लाभ होईल.

कन्या
व्यापारात अचानक धनलाभ होईल. रखडलेली कामे पूर्ण होतील. कुणाकडून पैसे उधार घेऊ नका, त्रास होईल. सरकारी कामे अर्धवट राहतील, ती वेळीच पूर्ण करा. सासरकडील एखाद्या व्यक्तीशी संबंध दुरावतील, विचारपूर्वक बोला.

तुळ
रोजगार मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. मन प्रसन्न होईल. कुटुंबात विवाहावर चर्चा होईल. ज्येष्ठ सदस्य नाराज होऊ शकतात, काळजी घ्या. वडीलांना आपली एखादी समस्या सांगू शकता, ज्यामुळे ते मदत करतील.

वृश्चिक
ठोस परिणामांचा दिवस आहे. ओळखीच्या व्यक्तीच्या सहकार्यातून लाभ होईल. कुटुंबातील सदस्य नवी मागणी करतील. खर्च विचारपूर्वक करा. विवाहाचे चांगले प्रस्ताव येतील. विद्यार्थ्याच्या उच्च शिक्षणातील अडथळे दूर होतील. सायंकाळी अध्यात्माकडे ओढा वाढेल.

धनु
दिवस व्यस्तता आणि धावपळीचा आहे.
जुनी कामे करण्याचा विचार कराल.
कुटुंबाच्या जबाबदार्‍या पूर्ण कराल.
सायंकाळी कुटुंबातील छोट्यांशी मजामस्ती कराल.
रखडलेल्या कामांसबंधी जोडीदाराचा सल्ला घेण्याची आवश्यकता असेल.

मकर
व्यापार, नोकरीत मेहनतीप्रमाणे यश न मिळाल्याने मन नाराज होईल.
संततीकडून शुभवार्ता समजेल, आनंद होईल. स्वतःसाठी खरेदी कराल.
व्यापारात गुंतवणूक टाळा. सामाजिक क्षेत्रात नवीन संधी मिळतील.
जनसमर्थन वाढेल. घरातील एखाद्या सदस्याचे आरोग्य बिघडेल, काळजी घ्या.

कुंभ
व्यापारात प्रगतीचे नवे मार्ग खुले होतील. नोकरी आणि घरात रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. हातात लाभ नुकसानीत बदलू शकतो. कार्यक्षेत्रात जादा जबाबदारी येईल. कुटुंबातील ज्येष्ठांचा सल्ला घ्याल. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाचे मार्ग खुले होतील. स्पर्धेची तयारी करत असाल तर यश मिळेल.

मीन
व्यापारात मनासारखे परिणाम मिळणार नाहीत, अस्वस्थ व्हाल. उत्पन्नाच्या तुलनेत खर्च जास्त होईल. कुटुंबातील सदस्याच्या सहकार्याने व्यापारात नवीन उर्जा येईल. एखाद्याकडून पैसे उधार घेऊ शकता. राजकारणात वाढत्या जनसमर्थनाचा लाभ घ्याल. संपत्ती व्यावसायात विचारपूर्वक गुंतवणूक करा. हानी होऊ शकते.

हे देखील वाचा

कामाची गोष्ट ! Aadhaar चं मोबाइल अँप देईल 35 पेक्षा जास्त सुविधा; UIDAI नं लाँच केलं mAadhaar चं नवं ‘व्हर्जन’, जाणून घ्या

धक्कादायक ! भाजप नेत्याचे मॉडेलसोबतचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल, प्रचंड खळबळ

 

तुरुंगातील ‘या’ अभिनेत्यांवरुन दोन अभिनेत्रीमध्ये रंगल Twitter war, ती म्हणाली – ‘तुला का मिर्ची लागली?

तसेच फेसबुक पेज ला लाईक करा

 

ट्विटर ला देखील फॉलो करा