10 मे राशीफळ : पैशांच्या बाबतीत ‘या’ 4 राशींसाठी दिवस उत्तम, इतरांसाठी असा आहे सोमवार

मेष
भाग्याच्या दृष्टीकोनातून दिवस उत्तम. आर्थिक सहायतेसाठी मित्र, नातेवाईक पुढे येतील. जवळच्या माणसामुळे गोंधळ उडू शकतो. कार्यक्षेत्रात व्यस्तता राहील. महत्वाचा निर्णय घेताना वडीलांचा सल्ला घ्या, तरच यश मिळेल. सायंकाळी मित्रांसोबत मजामस्ती कराल.

वृषभ
संमिश्र परिणामांचा दिवस आहे. विद्यार्थ्यांना स्पर्धेत यश मिळेल. व्यवसायात जास्त मेहनतीची गरज आहे. प्रेमसंबंधात नवी ऊर्जा मिळेल. नोकरीच्या समस्या सोडवण्यात दिवस जाईल. नोकरी पदोन्नती मिळू शकते. सासरकडील मतभेद संपतील.

मिथुन
प्रगतीचे नवे मार्ग खुले होतील. दुसर्‍यांच्या भावना जाणून घेवून वाटचाल करा. कार्यक्षेत्रात टीम वर्कद्वारे कठीण काम यशस्वी कराल. सायंकाळ घरातील सदस्यांसोबत भविष्यावर चर्चा करण्यात घालवाल. नोकरीत अधिकार्‍यांशी वाद घालू नका. नुकसान होऊ शकते. उच्च शिक्षणाचा मार्ग प्रशस्त होईल.

कर्क
स्वताला सिद्ध करण्याची संधी मिळेल, ती ओळखून यशस्वी होण्याची जबाबदारी असेल. घरातील लोकांसोबत काही वेळ घालवाल. व्यापारातील लाभाच्या योजनांकडे लक्ष द्या, न तपासता सही करू नका. दैनिक गरजांसाठी काही पैसे खर्च होतील. आईच्या आरोग्याबाबत सतर्क रहा, त्यांच्या खाण्या-पिण्याची काळजी घ्या.

सिंह
आनंदाचा दिवस आहे. प्रत्येक कामात जोडीदाराची साथ आवश्यक असेल. सासरच्या बाजूकडून भेट, मानसन्मान मिळेल. वाद-विवादात विजय होईल. कुटुंबासाठी दिवस सुखदायक आहे. भाऊ-बहिण सुख-दु:ख सांगतील. विद्याथ्यांना सिनियरच्या सल्ल्याची आवश्यकता असेल. सायंकाळी आई-वडीलांची सेवा कराल.

कन्या
प्रगतीचे नवे मार्ग खुले होतील. जबाबदारी वाढेल, त्रस्त होण्याएवेजी त्या पूर्ण करा, सायंकाळपर्यंत सर्व जबाबदार्‍या पूर्ण कराल, कौतूक होईल. जोडीदाराला बाहेर फिरायला घेऊन जाल, त्यांच्यासाठी भेटवस्तू घ्याल. सायंकाळी घरातील लोकांशी महत्वाच्या विषयावर चर्चा कराल.

तुळ
उत्तम फलदायक दिवस आहे. जुनी कर्ज चुकवण्यात यशस्वी व्हाल. खर्च करताना खिशाचा विचार करा, अन्यथा आर्थिक स्थिती धोक्यात येऊ शकते. प्रेमसंबंधात नवीन उर्जेचा संचार होईल. संततीसाठी काही नवीन योजना बनवाल, ज्यामध्ये जोडीदाराची साथ लाभेल. आईच्या तब्येतीत थोडी घसरण होऊ शकते.

वृश्चिक
व्यस्तता, धावपळीचा दिवस आहे. व्यवसायासाठी चांगला दिवस आहे. भागीदारीच्या व्यापारात लाभ होईल. पैशाचा व्यवहार विचारपूर्वक करा. व्यापारात नवीन डील फायनल होऊ शकते, ज्यासाठी मोठी प्रतीक्षा केली होती. भाऊ किंवा बहिणीच्या विवाहातील अडथळे ज्येष्ठांच्या सल्ल्याने दूर होतील. सायंकाळी घरातील लहान मुलांसोबत मजामस्ती कराल.

धनु
संमिश्र दिवस आहे. ऑफिसमध्ये काही नवीन अधिकार मिळतील, जास्त मेहनत करावी लागेल, तेव्हाच कामे पूर्ण होतील. घरगुती खर्च कराल. कुणाशी संबंध वाढवायचे असतील तर एकदा आवश्य विचार करा. अडकलेले पैसे प्राप्त होतील. भागीदारीच्या व्यवसायात लाभ होईल.

मकर
नवी उर्जा देणारा दिवस आहे. कार्यक्षमता वाढेल, कामाची ठिकाणी चांगले काम कराल. दाम्पत्य जीवनातील तणाव संपेल. जोडीदाराची साथ मिळेल. नोकरीत प्रमोशन किंवा सॅलरी वाढू शकते. या दरम्यान रागावर नियंत्रण ठेवा, अन्यथा काम बिघडू शकते. जमीन खरेदी करताना सर्व माहिती घ्या, फसवणूक होऊ शकते.

कुंभ
संमिश्र परिणामांचा दिवस आहे. दुपारपर्यंत व्यापारात छोटे लाभ भरपूर होतील. आर्थिक स्थिती मजबूत होईल. व्यापारात नवीन आव्हानांचा सामना करावा लागेल. व्यापारात लक्ष्यप्राप्तीत यश मिळेल. प्रवासाला गेला तर इश्वराचे ध्यान करून जा, अन्यथा आवडती वस्तू चोरी होण्याची भीती आहे. घरात बोलताना वाणीवर संयम ठेवा, नात्यात दरी पडू शकते.

मीन
आजचा दिवस सामान्य आहे. स्वत:त रममरण व्हाल. कुणाची पर्वा करणार नाही, यासाठी शत्रु त्रास देऊ शकतो, मात्र तो काहीही करू शकणार नाही. जमीन, मालमत्तेसंबंधी लाभ होऊ शकतो. कुटुंबातील एखादी व्यक्ती आजारी असेल तर दुर्लक्ष करू नका, डॉक्टरकडे जा, कारण छोटा आजारपण मोठा होऊ शकतो. सामाजिक कार्यात भाग घ्याल. प्रेमसंबंधात निराशा हाती येईल.