11 जून राशीफळ : आज मिथुन राशीत चंद्र, 5 राशींमध्ये आनंद, इतरांसाठी असा आहे शुक्रवार

मेष
horoscope 11 june 2021 : दिवस महत्वकांक्षेची पूर्तता करणारा आहे. व्यापारासाठी केलेला प्रवास लाभदायक ठरेल, पण प्रवासाची तयारी करा. सायंकाळी योजनापूर्तीचा लाभ होईल. घरी पाहुण्यांचे आगमन होईल. खर्चावर नियंत्रण ठेवा. एखाद्या मित्राकडून लाभ होऊ शकतो.
वृषभ
संमिश्र परिणामांचा दिवस आहे. विरोधक सक्रिय दिसतील, पण यशस्वी होणार नाहीत. कार्यक्षेत्रात अधिकार्याशी तर व्यापारात व्यापार्याशी वाद होऊ शकतो, पण वाणी मधुर ठेवा, संबंध बिघडू शकतात. दाम्पत्य जीवनात प्रेम वाढेल. समाजात मान-सन्मान वाढेल. प्रसिद्धी मिळेल.
मिथुन
दिवस संमिश्र आहे. नोकरी निमित्त घरातील सदस्याला बाहेर जावे लागेल, मन अस्वस्थ होईल. व्यापारात दुपारनंतर नवीन कामाची रूपरेषा तयार होईल. सायंकाळी मंगल कार्यात सहभागी व्हाल. मोठ्या लोकांच्या भेटी होतील. संततीला शारीरीक त्रास होऊ शकतो, यासाठी सतर्क रहा.
कर्क
प्रगतीचे नवे मार्ग खुले होतील. भागीदारीच्या व्यापारात उत्तम लाभ होईल, आर्थिक स्थिती मजबूत होईल. नोकरीत पदोन्नती होऊ शकते, मानसिक शांती मिळेल. जास्त मेहनतीमुळे थकवा जाणवेल, सावध रहा. सायंकाळी वडील किवां भावासोबत व्यापारावर चर्चा होईल.
सिंह
दिवस संमिश्र आहे. समाजात प्रतिमा चांगली होईल. कुटुंबातील अडथळा दूर होईल. सरकारी नोकरीत पदभार वाढेल. कायदेशीर वाद संपेल. आजूबाजूला होणार्या वादापासून दूर रहा, वाद कायदेशीर होऊ शकतो. विवाहाचे उत्तम प्रस्ताव येतील.
कन्या
संमिश्र परिणामांचा दिवस आहे. समाजात मान, प्रतिष्ठा वाढेल. सायंकाळपासून रात्रीपर्यंत एखाद्या जुन्या मित्रासोबत चर्चा कराल. मन प्रसन्न होईल. घरात मंगलकार्यावर चर्चा होईल. कुटुंबाच्या जबाबदार्या वाढतील.
तुळ
सांसारिक सुख वाढेल. जोडीदाराचे सहकार्य आणि सान्निध्य मिळेल. राजकारणात यश मिळेल. सायंकाळपासून रात्रीपर्यंत मौल्यवान वस्तू चोरी होणे किंवा हरवण्याची शक्यता आहे. प्रवासाला जाताना आवश्यक कागदपत्र तपासून जा. विवाहसंबंधी समस्या दूर होतील, कुटुंबातील सदस्य अस्वस्थ होतील.
वृश्चिक
दिवस परोपकारात व्यतीत होईल. जास्तीत जास्त वेळ दुसर्यांना मदत करण्यात जाईल. पण लोक गैरअर्थ काढणार नाहीत याची काळजी घ्या, तुमची मदत स्वार्थासाठी आहे असे त्यांना वाटू शकते. स्वतासाठी सुद्धा वेळ काढा. व्यापाराची गती वाढवण्यासाठी कुणाशी तरी चर्चा करा. ऑफिसमध्ये अधिकारात वाढ होईल. यामुळे सहकार्यांचा मूड खराब होईल.
–
धनु
दिवस चारही बाजूने शांततेचा राहील. वागणे मधुर ठेवा, नाती बिघडू शकतात. भाऊ-बहिणीचे भरपूर सहकार्य मिळेल. जोडीदाराशी वाद होऊ शकतो. संततीच्या विवाहावर शिक्कामोर्तब होऊ शकते. प्रिय व्यक्तीला मदत केल्याने काही त्रासाचा सामना करावा लागू शकतो.
मकर
दिवस उत्तम लाभ प्राप्तीचा आहे. व्यापारात नवीन डील पूर्ण होईल.
धनवृद्धी होईल. जोडीदार किंवा संततीची तब्येत अचानक बिघडल्याने टेन्शन वाढू शकते,
यात पैसे खर्च होतील. गाडी चालवताना टेन्शन दूर ठेवा, अपघात होऊ शकतो.
मित्रांच्या खास योजनेचा भाग व्हाल, पण लक्ष द्या. व्यापारातील जोखीम लाभ देऊ शकते.
कुंभ
दिवस व्यस्ततेचा आणि धावपळीचा राहील.
भाऊ किंवा जोडीदाराच्या महत्वाच्या कामासाठी धावपळ करावी लागेल.
संध्याकाळी थकवा जाणवेल. ऑफिसात एखाद्या सहकार्याशी वाद सुरूअसेल तर तो आज फायदा घेऊ शकतो तुमची चाडी करूशकतो.
सावध रहा. सासरकडून सन्मान मिळेल. सामाजिक पद, प्रतिष्ठा वाढेल.
मीन
दिवस उत्तम फलदायक आहे. संततीकडून आनंद वाढवणारी बातमी समजू शकते.
रोजगाराची उत्तम संधी मिळेल. जीवनात पुढे जाता येईल. कार्यक्षेत्रात मान, प्रतिष्ठा वाढेल.
नोकरीत जास्त कार्यभार सोपवला जाईल, मेहनत करून वेळेत काम पूर्ण कराल.
सायंकाळी घरातील छोट्या मुलांसोबत मजामस्ती कराल.