12 जून राशीफळ : ‘या’ 6 राशींना होणार फायदा, नोकरी-व्यापार आणि आर्थिक क्षेत्रात मिळेल यश, इतरांसाठी असा आहे शनिवार

मेष
horoscope 12 june 2021 | दिवस खुप चांगला आहे. व्यापार आणि नोकरीत मनाचे ऐकाल, लाभ होईल. दिवसाचा उत्तरार्ध अनुकूल आहे, महत्वाचे निर्णय दुपारनंतर घ्या. कुटुंबात सुखप्राप्ती होईल. उत्पन्न वाढेल. कुटुंबात एकी राहील. सायंकाळी मित्रांसोबत पार्टी कराल. कार्यक्षेत्रासाठी दिवस उत्तम आहे.

वृषभ
दिवस सामान्य फलदायक आहे. आरोग्याकडे लक्ष द्या. कमजोरी जाणवेल, मानसिक ताण राहील. कामात विलंबानंतर यश मिळेल. जोडीदारासोबत सुखद वेळ घालवाल. कुटुंबात आनंद राहील. कुटुंबासोबत दिवस हसत-खेळत घालवाल.

मिथुन
दिवस चांगला आहे. सामाजिक कार्यात लाभ होईल. कार्यक्षमता वाढेल. ऊर्जेमुळे इच्छा पूर्ण होतील, कौतूक होईल. दाम्पत्य जीवन सुखी राहील. दुपारनंतर स्थिती बदलेल, उत्पन्न वाढेल. कुटुंबासोबत वेळ घालवाल आणि चांगल्या भोजनाचा आनंद घ्याल.

कर्क
दिवस मध्यम फलदायक आहे. व्यवसायाला गती देण्यासाठी मेहनत कराल. लाभ होईल. कुटुंबाला वेळ द्याल. मानसिकदृष्ट्या व्यस्तता जाणवेल, थकवा वाटेल. खर्च जास्त राहील. विवाहाचे चांगले प्रस्ताव येतील. कार्यक्षेत्रात चांगले परिणाम मिळतील. दाम्पत्य जीवन थोडे नीरस राहील.

सिंह
दिवस चांगला आहे. धनप्राप्ती होईल. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाचा मार्ग खुला होईल. कलाक्षेत्रात लाभ होईल. ओळख निर्माण होईल. संततीचे सहकार्य मिळेल. प्रेमसंबंधात सहमतीने पुढे जाल. प्रेमविवाह होऊ शकतो. सायंकाळचा वेळ घरातील लहानांसोबत मजामस्तीत घालवाल. दिवस थोड चढ-उताराचा आहे.

कन्या
दिवस चांगले संकेत देत आहे. सूक्ष्म दृष्टी आणि दूरदर्शीपणाचे कौतूक होईल.भाऊ-बहिणीसोबतचा वाद समाप्त होईल. कौटुंबिक जीवन शांत राहील. आई-वडीलांचे आरोग्य बिघडू शकते. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. दाम्पत्य जीवन सुखी राहील. संततीची जबाबदारी पार पाडाल. घरातील खर्चाकडे लक्ष द्याल. प्रवास होईल.

तुळ
दिवस चांगला आहे. वडीलांच्या तब्येतीकडे लक्ष द्या. सरकारी नोकरीत पदोन्नती मिळेल. दूरच्या संबंधातून यश मिळेल. एखादी अशी व्यक्ती जीवनात येईल जिच्यामुळे यश मिळेल. आर्थिक बाबतीत दिवस चांगला आहे. कौटुंबिक जीवन कमजोर राहील. प्रेमसंबंधात यश मिळेल. संततीचे काम पाहून आनंद होईल.

वृश्चिक
दिवस सामान्य फलदायक आहे. एखाद्या गोष्टीवरून रागावू शकता. मानसिक दबावात राहाल. यासाठी आज कोणताही निर्णय घेऊ नका. उत्पन्न लक्षात घेऊन खर्च करा. उत्पन्नात थोडी घसरण होऊ शकते. भाग्याच्या कमतरतेमुळे दिवस कमजोर राहील. कार्यक्षेत्रात यश मिळेल. इतर क्षेत्रात मेहनत करावी लागेल. दाम्पत्य जीवन चांगले राहील. प्रेमसंबंधासाठी दिवस सुंदर प्रकारे व्यतीत होईल. विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणीला तोंड द्यावे लागेल.

धनु
दिवस मध्यम फलदायक आहे. व्यापारात नवीन पाऊल उचलाल, लाभ होईल. दाम्पत्य जीवनातील तणाव समाप्त होईल. प्रेम वाढेल. प्रिय व्यक्तीमुळे लाभ होईल. सायंकाळी घरातील ज्येष्ठांशी चर्चा कराल. संततीची कामात प्रगती होईल. ऊर्जा राहील. विरोधकांवर मात कराल.

मकर
दिवस सामान्य फलदायक आहे. धैर्य राखा. आई-वडीलांची सेवा कराल.
संयमामुळे कार्यक्षेत्रात स्थिती चांगली राहील. तुमच्या बाजूने चांगली गोष्ट घडेल.
जोडीदार फिरायला जाण्याचे प्लॅनिंग करेल. दाम्पत्य जीवनात अभूतपूर्व आनंद वाढेल.

कुंभ
दिवस चांगला आहे. आनंदी रहाल. सर्वांसोबत प्रेमाने वागाल.
प्रेमजीवनासाठी दिवस आनंदादायक आहे. मित्रांसाबत वेळ घालवाल. पैशांची आवक होईल. कार्यक्षेत्रात मन कमी लागेल. ऑफिसमधून सुटी घेऊ शकता.
आजचा दिवस मजा करण्याचा आणि फिरण्याचा आहे.
रखडलेले काम पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल.

मीन
दिवस सामान्य फलदायक आहे. भागीदारीतील व्यापारात लाभ मिळेल.
घरात तणावासह एखाद्या योजनेवर चर्चा होईल. कार्यक्षेत्रात स्थिती तुमच्या बाजूने असेल.
अति कामामुळे थकवा दाणवेल. दुपारनंतर कामात यश मिळेल.
मन आनंदी होईल. सायंकाळी जोडीदारासोबत बाहेर जाल.
उत्पन्न वाढेल. आनंद होईल.

हे देखील वाचा

‘महाविकास’मध्ये ‘तणाव’; राष्ट्रवादीचं मिशन 2024 तर काँग्रेसचा स्वबळाचा नारा

Burglary in Pune | आंबेगाव पठार परिसरात भरदिवसा घरफोडी; 10 लाखाचा ऐवज लंपास

मुंबई -पुणे द्रुतगती महामार्गावर टेम्पो कंटेनरचा अपघातात एकाचा मृत्यू

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा