13 मे राशीफळ : कर्क, तूळ, वृश्चिकसह ‘या’ 5 राशींसाठी दिवस अवघड, इतरांसाठी असा आहे गुरुवार

मेष
चढ-उतारांचा दिवस, सांभाळून वाटचाल करा. विवाहाचे चांगले प्रस्ताव येतील. भावाच्या आरोग्याची थोडी चिंता असू शकते. सायंकाळी शेजार्‍यांशी वाद टाळा, रागावर नियंत्रण ठेवा, वाद कायदेशिर होऊ शकतो. व्यापारात चढ-उतार राहील, वडीलांचा सल्ला घ्या. विद्यार्थ्यांना गुरुंचा आशीर्वाद मिळेल.

वृषभ
प्रगतीचे नवे मार्ग खुले होतील. अचानक एखादे छोटे काम झाल्याने भाग्यातील अडथळे दूर होतील. पैसा आल्याने रस्ते मोकळे होतील, आर्थिक स्थिती चांगली होईल. घरातील जबाबदार्‍या पूर्ण कराल. प्रियव्यक्तीची घरातील सदस्यांशी भेट घडवून आणू शकता. भागीदारीच्या व्यापारात जोडीदाराचा सल्ला आवश्यक ठरेल.

मिथुन
संमिश्र दिवस आहे. काम करण्याच्या नवीन पद्धतीने लाभ होऊ शकतो. नवीन डील पूर्ण करण्यासाठी काही लोकांच्या भेटी घ्याल. सायंकाळी अडकलेले पैसे मिळतील. तसेच घरी पाहुण्यांचे आगमन होईल. नोकरीत वरिष्ठांचे लक्ष तुमच्याकडे गेल्याने लाभ मिळू शकतो.

कर्क
धावपळीचा दिवस आहे. संततीच्या विवाहातील अडचणी दूर करण्यासाठी धावपळ होईल, यानंतर निर्णयाजवळ पोहोचू शकता. उद्योगात कर्मचार्‍यांच्या हालचालींवर लक्ष ठेवा, कारण ते आरामाच्या मूडमध्ये असतील, पैशाच्या बाबतीत सुद्धा सावध रहा, मोठे नुकसान होऊ शकते. घरात मोठी जबाबदारी पार पाडू शकता, जोडीदाराची साथ लाभेल.

सिंह
दिवस विशेष आहे. प्रगतीचे नवे मार्ग खुले होतील. व्यापारासाठी नवीन धोरण ठरवाल. प्रत्येक क्षेत्रात वर्चस्व कायम राहील. कौतुक होईल. राजकारणात प्रसिद्धी मिळेल. मित्र वाढतील. ऑफिसमध्ये मैत्रिणीच्या सहकार्याने धनलाभ होईल. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाचे दरवाजे खुले होतील. सासरकडून सन्मान मिळेल.

कन्या
दिवस खुप व्यस्ततेत जाईल. व्यापारात नव्या डीलवर चर्चा होईल, काही फायनल होतील. नोकरीत जबबादारीचे काम सोपवले जाईल, परंतु कोणताही विचार न करता कर्तव्य पाडा, अधिकारी खुश होतील. रखडलेले काम पूर्ण होईल. पार्टीचे आयोजन कराल. सायंकाळी घरातील लहान मुलांसोबत मजामस्ती कराल.

तुळ
इतर दिवसांच्या तुलनेत दिवस काही अडचणींचा असेल. सकाळीपासूच आजूबाजूचे वातावरण अस्वस्थ करणारे असेल. कुटुंबात एखादा वाद होऊ शकतो, ज्यामुळे अशांतता राहील. व्यापारात नवीन डील पूर्ण करू शकता, ज्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल. संततीच्या विवाहातील अडथळे दूर होतील. नोकरीत शत्रु त्रास देण्याचा प्रयत्न करतील.

वृश्चिक
दिवस थोडा निराशाजनक आहे. कारण आज ज्या कामात हात टाकल त्यामध्ये यश उशीरा मिळेल, ज्यामुळे निराशा येऊ शकते. इच्छा नसतानाही अनेकदा तुम्ही अशा स्थितीत फसता जिथून बाहेर पडणे अवघड असते. व्यापारात अशीच काहीशी स्थिती राहील, जी त्रास देऊ शकते. कुणाकडूनही उधार घेऊ नका, परत करणे अवघड होईल. व्यापारातील निर्णय काही काळासाठी पुढे ढकला. प्रेमसंबंधात नवीन उर्जेचा संचार होईल.

धनु
व्यापारासाठी दिवस हलका-फुलका आहे, चुकूनही शेयर बाजार किंवा जुगारात पैसे लावू नका, पैसे बुडू शकतात, समस्या वाढतील. भागीदारीतील व्यापारासाठी दिवस उत्तम आहे. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. संततीच्या भविष्यासंबंधी निर्णय अतिशय विचारपूर्वक घ्या. सायंकाळी मित्रांसोबत मजामस्ती कराल.

मकर
दिवस संमिश्र आहे. उर्जा आणि उत्साह राहील. नोकरीत सुटी असूनही रखडलेली कामे पूर्ण कराल. व्यापारात कर्मचार्‍यांशी प्रेमाने वागलात तर फायदा होईल, कामाचे आऊटपूट जास्त मिळेल. संपत्तीच्या वादात यश मिळेल. सामाजिक कार्यात रुची वाढेल.

कुंभ
व्यस्तता आणि धावपळीचा दिवस आहे, ज्यामुळे थकवा जाणवेल, आरोग्याकडे जास्त लक्ष देण्याची आवश्यकता आहे. मानसिक आरोग्य ठिक असेल तर समस्या कमी होतील, अन्यथा व्यवसाय आणि घरात काही चुकीचे निर्णय घेऊ शकता. व्यापारात नवीन कल्पना उत्पन्न वाढवतील. खर्च आणि उत्पन्ना संतुलन ठेवा.

मीन
दिवस उत्तम फलदायक आहे. उत्पन्न वाढवण्याचे अनेक मार्ग दिसतील, परंतु त्यापैकी काही चुकीचे सुद्धा असू शकतात. योग्य मार्ग निवडून पुढे जावे लागेल आणि आर्थिक स्थिती मजबूत करावी लागेल. इमानदारीने वाटचाल केल्यास यश मिळेल. सहकारी किंवा जोडीदाराशी मतभेद होऊ शकतात. बुद्धीचा वापर करून घेतलेल्या निर्णयातच पुढे जा.