14 जून राशीफळ : आज पुष्ययोग, ‘या’ 7 राशींना होणार धनलाभ, इतरांसाठी असा आहे सोमवार

मेष
horoscope 14 june 2021 : दिवस धावपळ आणि व्यस्ततेचा आहे. प्रवास शक्यतो टाळा, आरोग्यात चढ-उतार होऊ शकतो, गर्दीची ठिकाणे टाळा. व्यवसायात छोटी चूक महागात पडेल, सतर्क रहा. विद्यार्थ्यांनी गांभिर्याने अभ्यास करावा, तरच यश मिळेल. पैशांसंबंधी कामे काहीही करून पूर्ण कराल. आर्थिक स्थिती मजबूती होईल.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

वृषभ
horoscope 14 june 2021 : दिवस अनुकूल परिणामांचा आहे. सकाळी शारीरीक आणि मानसिक मेहनत जास्त करावी लागेल, तरच यश मिळेल. सायंकाळी थकवा जाणवेल. कामासाठी खर्च कराल. सायंकाळी मंगलकार्यात सहभागी व्हाल. मोठ्या व्यक्तीची भेट होईल, लाभ मिळेल.

मिथुन
आजूबाजूचे वातावरण सुखद राहील. घर आणि कार्यक्षेत्रातील कामांबाबत गंभीर रहाल, अर्धवट कामे पूर्ण कराल, धनप्राप्तीसाठी प्रतिक्षा करावी लागेल, मेहनत करत रहा. दाम्पत्य जीवन सामान्य राहील. थकव्यामुळे आळस राहील. नाती बिघडू शकतात. वाणी मधुर ठेवा.

कर्क
अर्धवट कामे पूर्ण करण्यास वेळ मिळेल. व्यापारात घाई करू नका, काम बिघडू शकते. नोकरीत महत्वाच्या कामासाठी मोठी सुटी घेण्याचा विचार कराल. कौटुंबिक आणि धार्मिक कामात प्रसिद्धी मिळेल. कार्यक्षेत्रात आपल्या चुकीचा राग दुसर्‍यावर काढल्याने वाद होऊ शकतो. सावध रहा. सायंकाळ आई-वडीलांसोबत घालवाल.

सिंह
बहुतांश दिवस शांततेत जाईल. मेहनतीचे फळ उशीराने मिळेल. ऑफिसमधील सहकार्‍यांना जास्त काम मिळेल, सायंकाळपर्यंत सर्व काम संपवाल. सामाजिक क्षेत्रात उत्पन्नाची नवीन साधने मिळतील. काही कौटुंबिक समस्या त्रास देऊ शकतात. सायंकाळी मित्रांना घरी जेवायला बोलवू शकता.

कन्या
दिवस गोंधळाचा आहे. घरात तणाव निर्माण होऊ शकतो, ज्याचा परिणाम बिझनेसवर होईल. व्यवसाय सुधारण्याची संधी मिळेल. आरोग्याची समस्या त्रास देईल, डोकेदुखी, पोटदुखी त्रास देईल. अनावश्यक खर्च होईल. जमीन, मालमत्तेची कामे घाईत करू नका.

तुळ
मेहनतीने जास्त परिणाम मिळतील. व्यवस्थेत जास्त मेहनत केली असेल तर जास्त लाभ होईल. भाऊ किंवा बहिणीच्या विवाहाचा प्रस्ताव प्रबळ होईल. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाचा मार्ग खुला होईल. प्रवास टाळा, वाहन खराब होऊ शकते. परदेशात राहणार्‍या नातेवाईकांकडून शुभवार्ता समजू शकते. सायंकाळी आईसोबत वाद होऊ शकतो.

वृश्चिक
ठोस परिणाम मिळतील. कौटुंबिक जीवनात विषमतेची जाणीव होईल. रोजगार मिळेल. प्रेम जीवनात तणाव असेल. उत्पन्न आणि खर्चात संतुलन ठेवा. संततीला फिरायला घेऊन जाल. धार्मिक क्षेत्रात दान कराल. प्रवास करताना सावध रहा, मौल्यवान वस्तू चोरी होऊ शकते किंवा हरवू शकते.

धनु
आजचा दिवस काही खास नाही, परंतु रोजची कामे सुरू राहतील.
दिवस सावकाश जाईल. रखडलेली कामे तशीच राहतील.
पैसे उधार घेणे सुद्धा अवघड होईल. आर्थिक स्थिती मध्यम राहील.
कुटुंबातील एखाद्या सदस्याची तब्येत बिघडू शकते. सतर्क रहा.
नोकरीत मैत्रिणीच्या सहकार्याने धनप्राप्ती होईल.

मकर
दिवस धावपळीचा आहे. नोकरी, व्यवसायात लाभ होईल, परंतु लाभ ओळखावा लागेल.
कौटुंबिक व्यवसायासाठी वडील, भाऊ यांच्या सल्ल्याची आवश्यकता असेल.
जोडीदाराशी वैचारिक मतभेद होईल.
संततीच्या भविष्याचे प्लॅनिंग कराल. मित्राला मदत करावी लागेल.

कुंभ
दिवस प्रतिकूल आहे. बेरोजगारांना रोजगार मिळेल.
व्यापारात गुंतवणूक विचारपूर्वक करा, नुकसान होऊ शकते.
धनलाभासाठी एखाद्याला गोंजारावे लागेल. सासरच्या बाजूने धनलाभ होईल.
रखडलेले काम मित्राच्या मदतीने पूर्ण होईल.

मीन
दिवस संमिश्र परिणामांचा आहे. कार्यक्षेत्रात आर्थिक मंदीचा सामना करावा लागेल. विक्री होईल, पण उत्पन्न त्रास देऊ शकते. एखाद्या ओळखीच्या व्यक्तीच्या वागण्याने नाराज व्हाल. सायंकाळी थकव्यामुळे अस्वस्थ वाटेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. सासरच्या बाजूकडील व्यक्तीला उशार देताना विचार करा, नाते बिघडू शकते.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

‘भाजप सोबतच्या युती सरकारमध्ये शिवसेनेला दिली गेली ‘गुलामा’सारखी वागणूक’