16 एप्रिल राशिफळ : आज सौभाग्य योग, 5 राशींसाठी खुप खास दिवस, होऊ शकते धनप्राप्ती, इतरांसाठी असा आहे शुक्रवार

मेष
आजचा दिवस ठोस परिणाम घेऊन आला आहे. कार्यक्षेत्रात यश मिळवण्यासाठी जास्त मेहनत करा. आर्थिक बाबतीत दिवस तुमच्या बाजूने राहील. व्यावसायात लाभाची स्थिती राहील. सायंकाळी पाहुण्यांच्या आगमणाने खर्च वाढेल. कुटुंबात एखादे मंगलकार्य होऊ शकते, ज्यामध्ये सर्वजण सहभागी होतील. राजकारणात विरोधक समस्या निर्माण करू शकतात. विद्यार्थ्यांसाठी परीक्षेसंदर्भात आवश्यक माहिती मिळू शकते.

वृषभ
आजचा दिवस संमिश्र आहे. काही काळापासून असलेल्या समस्यांमधून सुटका होईल. महत्वाच्या कामासाठी प्रवास करावा लागेल. कला आणि साहित्यात मान आणि प्रतिष्ठा वाढेल. कार्यक्षेत्रात एखाद्या ज्येष्ठाच्या सहकार्याने प्रगती होईल. भाग्याच्या अनुकूलतेमुळे नोकरी किंवा व्यवसायात प्रगती झाल्याने मन प्रसन्न होईल. सायंकाळपासून रात्रीपर्यंत पुण्य कार्यासाठी खर्च कराल. संततीसाठी आज भेट खरेदी करू शकता.

मिथुन
आजचा दिवस उत्तम यशदायक आहे. बुद्धी आणि कार्यकुशलतेने ज्या क्षेत्रात प्रयत्न कराल, त्यामध्ये यश मिळेल. सायंकाळी एखादा मित्र किंवा नातेवाईकाचे आगमन होईल. मनोरंजनात काही वेळ घालवाल. काही आवश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी पैसे खर्च कराल, परंतु उत्पन्न आणि खर्च यांचे संतुलन ठेवा, अन्यथा भविष्यात समस्या निर्माण होऊ शकते. राजकारणात मागील काही दिवसांपासून गोंधळाची स्थिती आहे, आज ती संपेल.

कर्क
आज सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात प्रगतीचे योग आहेत. विनाकारण खर्च करण्याऐवजी खर्चात कपात करावी लागेल, अन्यथा त्रास होऊ शकतो. तुमच्या संधीबाबत कुणालाही सांगू नका, अन्यथा नंतर त्रास होऊ शकतो. व्यापारात जर काही अडथळा येत असेल तर तो वडीलांच्या सल्ल्याने संपेल. जोडीदारासाठी आज एखादे सरप्राईज प्लॅन करू शकता. संततीच्या भविष्याची थोडी चिंता सतावू शकते.

सिंह
भाऊ-बहिणीच्या विषयासंबंधी काही समस्या होऊ शकते. कार्यंक्षेत्रात काही बदल होऊ शकतात. कौटुंबिक जीवनात काही वाद होऊ शकतात, यासाठी धैर्याने काम घ्या. कोणत्याही कामात घाई करू नका, अन्यथा नुकसान होऊ शकते. बिझनेसमध्ये चढ-उतार होईल. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. सायंकाळी जवळचा किंवा लांबचा प्रवास करण्याचे योग आहेत. धार्मिक कामात रुची वाढेल. जुन्या आठवणींमुळे मन आनंदी राहील. विद्यार्थ्यांच्या अभ्यासातील अडचणी दूर करण्यासाठी शिक्षकांचे सहकार्य मिळेल.

कन्या
आजचा दिवस संमिश्र आहे. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात तणावाची स्थिती राहील. विद्यार्थ्यांना सुद्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. वीजेच्या उपकरणांशी खेळ करू नका, अन्यथा नुकसान होऊ शकते. जर योग्य गुंतवणूक करण्याची इच्छा असेल तर विचारपूर्वक करा, अन्यथा भविष्यात जोखिम स्वीकारावी लागेल. कुटुंबात संपत्तीवरून तणाव होऊ शकतो. सायंकाळी घरातील ज्येष्ठ सदस्यांशी या मुद्द्यावर चर्चा करू शकता.

तुळ
आजचा दिवस उत्तम यशदायक आहे. आज धाडसात वाढ होण्याचे योग आहेत. कार्यक्षेत्रात यश मिळेल. अचल संपत्तीच्या व्यापारात लाभ होईल. मार्केटिंग सेल्सशी संबंधीत लोकांना यश मिळवण्यासाठी जास्त मेहनत करावी लागेल. काही नवीन करार होऊ शकतात. जर नवीन योजनेवर काम सुरू करणार असाल तर त्यासाठी दिवस उत्तम आहे. एखादा कायदेशीर वाद मोठ्या कालावधीपासून सुरू असेल तर आज त्यामध्ये विजय मिळू शकतो. सासरच्या बाजूच्या एखाद्या व्यक्तीला पैसे उधार द्यायचे असतील तर परत येण्याची शक्यता खुप कमी आहे.

वृश्चिक
आजचा दिवस तुमच्यासाठी विशेष परिणामांचा आहे. संतती संबंधी सुखद माहिती मिळू शकते. प्रभाव आणि किर्तीत वाढ होईल. एखादी जुनी समस्या सुटू शकते. राजकारण आणि सामाजिक क्षेत्रात मेहनत करण्याची आवश्यकता आहे. शत्रु कमजोर राहील. कार्यक्षेत्रात काही तणाव असू शकतो, परंतु त्याकडे जास्त लक्ष देऊ नका. आरोग्यात घसरण होऊ शकते, यासाठी सतर्क राहा. संततीला एखाद्या कोर्सला प्रवेश मिळवून देण्यासाठी व्यस्त राहाल.

धनु
आजचा दिवस ठोस परिणाम घेऊन आला आहे. नोकरीत तुमच्यावर खोटा आरोप होऊ शकतो, यासाठी सतर्क राहिले पाहिजे. सायंकाळपासून रात्रीपर्यंत धार्मिक यात्रेचे योग आहेत, परंतु प्रवासाला जाण्यापूर्वी आवश्यक कागदपत्र तपासूण घ्या. कुटुंबात आज एखादा वाद होऊ शकतो, परंतु रागावर नियंत्रण ठेवा आणि वाणी सौम्य असू द्या, अन्यथा नात्यात दरी पडू शकते. व्यवसायात लाभाचे योग आहेत. संतती बाबत आज शुभवार्ता ऐकायला मिळू शकते.

मकर
आजचा दिवस व्यवस्था आणि प्रगती घेऊन आला आहे. विद्यार्थ्यांसाठी काळ चांगला आहे. शिक्षणाच्या क्षेत्रात प्रगती झाल्याने समाजात मानसन्मान मिळेल. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात नवीन संपर्क होतील, ज्यामुळे जन समर्थन वाढेल. जर नोकरीत असाल तर कोणत्याही सदस्याशी विचारपूर्वक बोला, अन्यथा तुमचे बोलणे त्याला वाईट वाटू शकते. सासरच्या बाजूने सन्मान मिळेल. संततीच्या आरोग्याबाबत चिंता असू शकते.

कुंभ
आज पैशाच्या व्यवहारात सावधगिरी बाळगा. कौटुंबिक कामे करण्यासाठी धावपळ करावी लागेल. नव्या लोकांशी संपर्क होईल, ज्यातून दूरगामी फायदा मिळू शकतो. कार्यकुशलतेने दुसर्‍यांना प्रभावित कराल. सायंकाळी विशेष कामासाठी जाण्याने मनात उत्साह राहील. जोडीदारासाठी एखादी भेट खरेदी करू शकता. जास्त खर्चामुळे आज कर्ज घ्यावे लागू शकते. कार्यकुशलतेने दुसर्‍यांना प्रभावित कराल. अडकलेले पैसे आज मिळतील. आईच्या आरोग्याबाबत सतर्क राहा.

मीन
आजचा दिवस ठोस परिणाम घेवून आला आहे. मनात भक्तीभावाचा विकास होईल. व्यवसायात विरोधक डोकेदुखी बनतील. दूर राहणार्‍या भाऊ-बहिणीशी संपर्क होऊ शकतो. परदेशाशी व्यापार करणार्‍यांना शुभवार्ता मिळू शकते. रात्री एखाद्या मंगलकार्यात सहभागी होऊ शकता. आयात आणि निर्यातीशी संबंधीत लोकांना आज फायदा होईल. एखाद्या ज्ञानी आणि अनुभवी व्यक्तीच्या सल्ल्याने बिझनेसमध्ये भरपूर लाभ होईल.