16 जून राशिफळ : ‘या’ 6 राशींसाठी दिवस खास, लाभ होईल, इतरांसाठी असा आहे बुधवार

मेष
horoscope 16 june 2021 : दिवस मध्यम फलदायक आहे. कामांना विलंब झाल्याने चिंता वाटेल, पण कामे होतील. रखडलेले पैसे मिळतील. आरोग्याच्या बाबतीत समाधानी आणि मानसिकदृष्ट्या आनंदी दिसाल. जोडीदाराशी जवळीक वाढेल. भाऊ-बहिणीशी संबंध सुधारतील. संततीकडून शुभवार्ता समजेल.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

वृषभ
संमिश्र परिणामांचा दिवस आहे. नोकरीसाठी दिवस उत्तम आहे, संधी मिळेल. मित्रांमुळे लाभ होईल. असे काम कराल ज्यामध्ये कुटुंबाच्या सहकार्याची आवश्यकता असेल, ते साथ देतील. नोकरीत पदोन्नती मिळेल. विवाहाचे उत्तम प्रस्ताव येतील.

मिथुन
दिवस प्रगतीच्या शुभयोगाचा आहे. कार्यक्षेत्रातील वातावरण सुधारेल. आरोग्य चांगले राहील. प्रगतीमधील बाधा दूर होतील. रोजच्या गरजांसाठी पैसे खर्च कराल. जोडीदारासाठी भेटवस्तू आणाल. आवश्यक कामात बिनधास्त गुंतवणूक करा. भविष्यात लाभ होईल.

कर्क
दिवस प्रगतीचे नवे मार्ग खुले करेल. व्यवसाय नवीन वळण घेईल, लाभ होईल. आई-वडीलांसोबत काहीवेळ घालवाल. भाऊ-बहिणीसोबतचे संबंध सुधारतील. सायंकाळी मित्रांसोबत पार्टी कराल. भेटीगाठींमुळे लाभ होईल. सरकारी नोकरीत पगारवाढ होईल.

सिंह
दिवस उत्तम फलदायक आहे. व्यापारात रिस्क आवश्य घ्या. फायद्याचा सौदा होईल. महिला आणि विद्यार्थ्यांना प्रोजेक्टमध्ये यश मिळेल. गुंतवणुक करताना आणि जमीन मालमत्तेचा व्यवहार करताना कागदपत्र व्यवस्थित तपासा, अडचणी येऊ शकता.

कन्या
दिवस खास आहे. सुटी घेऊन फिरायला जाण्याचा प्लॅन करू शकता. थकवा दूर होईल. रखडलेली कामे पूर्ण होतील, मित्रांचे सहकार्य मिळेल. काही गरजांसाठी पैसे खर्च कराल. स्वतावरदेखील खर्च करण्याचा विचार कराल, परंतु उत्पन्न पाहून विचार बदलू शकता.

तुळ
कुटुंबाच्या आनंदाच्या बाबतीत दिवस चांगला आहे. घरातील काही सदस्यांची आनंदाची बातमी समजेल. आनंदाचे वातावरण राहील. सायंकाळी पार्टी कराल. विवाहावर शिक्कामोर्तब होईल. संततीची चिंता राहील. सावध रहा.

वृश्चिक
चांगले परिणाम मिळतील. एखादी कल्पना वापरून व्यापारातील कामे केली तर भरपूर लाभ मिळेल. सहकार्‍याशी वाद होईल. वाणी आणि रागावर नियंत्रण ठेवा. दाम्पत्य जीवनात गोडवा राहील. एखाद्याने घेतलेला निर्णय वरदान ठरेल. प्रवासाला जाणे शक्यतो टाळा, दुखापत होण्याची शक्यता आहे.

धनु
संमिश्र परिणामांचा दिवस आहे. कोणतेही काम आनंदाने कराल, यश मिळेल.
कुटुंबात मंगलकार्याचे आयोजन होईल. विवाह पक्का होईल.
काही वस्तूंची खरेदी कराल. स्वच्छतेकडे लक्ष द्या, आरोग्य बिघडू शकते.
रोजगार मिळू शकतो.

मकर
दिवस भाग्याला अनुकूल परिणाम देईल. भागीदारीतील व्यवसायात लाभ होईल.
घरातील सदस्यांच्या गरजांची पूर्तता कराल. मानसिक तणाव कमी होईल.
व्यापारात जोडीदाराचा सल्ला आवश्यक असेल.
संपत्ती खरेदीसाठी दिवस उत्तम आहे.

कुंभ
दिवसभर मूड चांगला राहील. जोडीदारासोबत काही वेळ घालवाल.
संततीच्या भविष्याची चिंता राहील. सतर्क राहा. डोळे, कान उघडे ठेवा.
संततीवर लक्ष ठेवा. घरातील वाद संपेल. परदेशात राहणार्‍या नातेवाईकांकडून शुभवार्ता समजेल.

मीन
दिवस थोडा चिंतेचा आहे. काही मानसिक चिता त्रास देऊ शकतात.
कुणावरही विश्वास ठेवताना विचार करा, फसवणूक होऊ शकते.
व्यापारातील डील विचारपूर्वक करा, नुकसान होऊ शकते.
उत्पन्नाच्या तुलनेत खर्च जास्त होईल. सायंकाळी आपल्या कुटुंबासोबत धार्मिक प्रवास करू शकता.
Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

Web Title : horoscope today aaj che rashifal horoscope 16 june 2021

हे देखील वाचा

Ayodhya Shri Ram Janmabhoomi land scam । राम मंदिरासाठी खरेदी केलेल्या जमीन व्यवहारात घोटाळा ? अजित पवार म्हणाले..