17 एप्रिल राशिफळ : आज वृषभ राशीत आहे चंद्र, या 4 राशीवाल्यांचे वाढेल उत्पन्न, इतरांसाठी असा आहे शनिवार

मेष
आजचा दिवस उत्तम यशदायक आहे. मोठ्या प्रमाणात आज हातात पैसा येईल, ज्यामुळे समाधान जाणवेल. भविष्याच्या चिंतेतून मुक्त व्हाल. सायंकाळी कुटुंबातील सदस्य आणि मित्रांविषयी उदार भूमिका ठेवा. कुटुंबातील लहान मुले आज काही मागणी करू शकतात. व्यवसायाची प्रगती पाहून मन आनंदी राहील. विलासी वातावरणाचा आनंद घ्याल. विद्यार्थ्यांना परीक्षेत उत्तम यश मिळेल. व्यापारासाठी प्रवास करावा लागू शकतो. कुटुंबाच्या एखाद्या सदस्याच्या आरोग्यात घसरण होऊ शकते.

वृषभ
आजचा दिवस संमिश्र परिणामांचा आहे. अनियमित खाणे-पिणे टाळा. आरोग्यात घसरण झाली असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. उत्पन्न जास्त आणि खर्च अधिक होईल, परंतु दोन्हीचे संतुलन ठेवा. सायंकाळपासून रात्रीपर्यंत एखाद्या सामाजिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. जोडीदाराचे भरपूर सहकार्य मिळेल. एखाद्या गोष्टीचा अतिरेक त्रासदायक ठरू शकतो. शत्रुने एखादा प्रस्ताव ठेवल्यास तो स्वीकारू नका. त्याला बळी पडू नका.

मिथुन
आजचा दिवस एक महत्वाची योजना पूर्ण करण्याचा आहे. कुटुंबात एखादा वाद निर्माण होऊ शकतो, परंतु तुम्ही या वादात पडू नका आणि व्यवस्थेत सुरू असलेल्या योजना तडीस नेण्यासाचा प्रयत्न करा, ज्यामध्ये भावाची मदत घ्यावी लागेल. आईसाठी एखादी भेटवस्तू आणू शकता. धनसंपत्तीसंबंधी एखादे प्रकरण सुरू असेल तर त्यामध्ये यश मिळेल. जमीन मालमत्तेत गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी दिवस उत्तम आहे. भविष्यात याचा भरपूर लाभ मिळेल.

कर्क
आजचा दिवस संमिश्र आहे. व्यापारासाठी प्रवास करावा लागू शकतो. बिझनेसच्या प्रगतीने कमी आनंदी दिसाल, ज्यासाठी एखाद्या अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेण्याचा विचार करू शकता. संततीच्या शिक्षणाबाबत तणाव असू शकतो, परंतु जोडीदाराच्या सहकार्याने तो सायंकाळपर्यंत संपेल. सायंकाळी वडीलांशी वाद होऊ शकतो, यासाठी विनाकारण वाद घालू नका. विद्यार्थ्यांना काही पुस्तकांची कमतरता भासू शकते.

सिंह
आजचा दिवस उत्तम फलदायक आहे. वैयक्तिक संबंध प्रेमपूर्ण आणि सहकार्याचे राहतील. आरोग्य चांगले असल्याने विविध कामामध्ये भाग घ्याल. कौटुंबिक बिझनेसमध्ये जोडीदाराच्या सल्ल्याची आवश्यकता असेल, ज्यामुळे भविष्यात भरपूर लाभ होईल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. कुटुंबातील एखादा सदस्य तुमच्यासाठी सरप्राईज प्लॅन करू शकतो. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाचा मार्ग प्रशस्त होईल.

कन्या
आजचा दिवस थोडा धावपळीचा राहील. कोणत्याही स्थितीचा अंदाज घेऊन मन आणि बुद्धीचा वापर निर्णय घ्यावा लागेल. गुंतवणुकीचा विचार असेल तर दिवस उत्तम आहे. भाग्याची भरपूर साथ मिळेल. उपजिविकेच्या क्षेत्रात कार्यरत लोकांना आज यश मिळेल. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या आरोग्यात घसरण झाल्याने धावपळ करावी लागू शकते. विद्यार्थ्यांना शिक्षकांचे आशीर्वाद मिळतील.

तुळ
जो व्यापार भागीदारीत केला होतात, त्यामधून आज भरपूर लाभ होईल, परंतु वैयक्तिक संबंधीत आज कुणीतरी फुट पाडण्याचा प्रयत्न करू शकतो. कुटुंबातील सर्व सदस्यांच्या जबाबदारी पार पाडण्यात यशस्वी व्हाल. सायंकाळ कुटुंबातील सदस्यांसोबत मनोरंजनाच्या कार्यक्रमात घालवाल. कौटुंबिक संपत्तीशी संबंधीत एखादा वाद सुरू असेल तर त्यामध्ये लाभ होईल. वडीलांच्या आरोग्याच्या बाबतीत सावध राहा.

वृश्चिक
आजचा दिवस उत्तम फलदायक आहे. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या त्रस्त असलात तरी काम धाडसाने पार पाडाल, त्यामध्ये यशप्राप्ती होईल. शत्रु कार्यक्षेत्रात त्रास देऊ शकतो, परंतु अस्वस्थ होऊ नका, तो तुमचे नुकसान करू शकणार नाही. प्रवासाला जाणार असाल तर त्यामध्ये यश मिळेल. नोकरीत प्रमोशन आणि सॅलरी इंक्रीमेंट होऊ शकते.

धनु
आजचा दिवस ठोस परिणाम घेऊन आला आहे, परंतु तरीसुद्धा आरोग्य आणि आर्थिक संसाधनांकडे थोडे जास्त लक्ष देण्याची आवश्यकता आहे. घरात एखादे मंगलकार्य होऊ शकते. कुटुंबात एखादा तणाव सुरू असेल तर तो आज कमी होईल. सायंकाळी जवळपास वादाची स्थिती निर्माण होऊ देऊ नका, अन्यथा नुकसान होऊ शकते. दुसर्‍या लोकांच्या कामासाठी जास्त वेळ आणि उर्जा वाया घालवू नका कारण असे लोक एका पाठोपाठ एक डिमांड सादर करू शकतात.

मकर
आजचा दिवस संमिश्र आहे. जीवनात एक महत्वपूर्ण परिवर्तन होण्याचा योग आहे, यामुळे तुम्हाला कठिण काळातून जावे लागू शकते, परंतु लक्षात ठेवा, रात्रीनंतर सकाळ होत असते, यासाठी धैर्य कायम ठेवा आणि सहजपणे पुढे जा. सामाजिक संबंधात सुद्धा यश मिळेल. जर एखाद्या बँकेकडून कर्ज घ्यायचे असेल तर कुटुंबातील सदस्यांचा सुद्धा विचार घ्या, कदाचित कर्ज घेण्याची वेळ येऊ शकणार नाही. जोडीदाराच्या आरोग्यात आज घसरण होऊ शकते. यासाठी सायंकाळी धावपळ होऊ शकते.

कुंभ
आजचा दिवस काहीसा तणावग्रस्त असू शकतो. परंतु तणावाला तुमच्यावर आरूढ होऊ देऊ नका. अंतर्मनाची हाक ऐका, कोणत्याही कामात अतिरेक नको, नुकसान होऊ शकते. कार्यक्षेत्रात सुद्धा अप्रत्यक्ष बदल होण्याची शक्यता आहे, ज्याचा भविष्यात लाभ होऊ शकतो. संततीच्या विवाहाला विलंब झाल्याने तणाव जाणवू शकतो. पैसे कुठे अडकले असतील तर आज मिळू शकतात.

मीन
आजचा दिवस उत्तम फलदायक आहे. व्यापारात जी आशा होती ती पूर्ण झाल्याने आनंदी व्हाल. नोकरीच्या शोधात असाल तर आज ती मिळू शकते. यासाठी दिवस उत्तम आहे. वैयक्तिक संबंधाच्या बाबतीत वादाची स्थिती निर्माण होऊ शकते, परंतु समजुतदारपणे ती सोडवू शकता. हट्ट सोडून नात्याला महत्व द्या. संततीला चांगले काम करताना पाहून मन आनंदी होईल. वडीलांच्या प्रकृतीबाबत सावध राहा. सासरच्या बाजूने धनलाभ होऊ शकतो.