17 जून राशिफळ : ‘या’ 4 राशींचे चमकणार नशीब, ग्रह-नक्षत्रांचे संकेत, इतरांसाठी असा आहे गुरुवार

मेष
horoscope 17 june 2021 | संमिश्र परिणामांचा दिवस आहे. ऑफिसमध्ये खुप काम असेल, घरासाठी वेळ देता येणार नाही. आई नाराज होईल. सासरकडून धनलाभ होईल. राजकारणात चांगले यश मिळेल. व्यापारात गुंतागुंतीचे प्रकरण सोडवाल. घरातील सदस्यांकडून अपेक्षा ठेवू नका, वाईट वाटेल.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

वृषभ
दिवस धावपळीचा आहे. व्यवसायात गुंतवणूक करू शकता, लाभ होईल. नोकरीत वाद टाळा, पदोन्नतीवर परिणाम होईल. भागीदारीतील व्यवसायाठी चांगला काळ आहे. संततीच्या भविष्यासाठी गुंतवणूक कराल. विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील अडथळे दूर होतील.

मिथुन
काही बाबतीत हाती निराशा येऊ शकते. कायदेशीर वाद आणखी रखडू शकतो, नाराज व्हाल. कुटुंबात वैचारिक मतभेद होतील. मित्रांकडून मदत घ्याल.
सायंकाळी भावांशी महत्वाच्या विषयावर चर्चा कराल. सामाजिक क्षेत्रात स्पर्धा वाढेल.

कर्क
नवी उर्जा जाणवेल. प्रत्येक कामासाठी उत्साह राहील, ती वेळेत पूर्ण कराल. रखडलेली कामे पूर्ण कराल. व्यापारात अचानक धनप्राप्ती होईल.
कुटुंबातील सदस्यांच्या महत्वाकांक्षा पूर्ण कराल.
मित्रांपासून सावध रहा, तुमचा फायदा घेऊ शकतात. सायंकाळी थकवा जाणवू शकतो.

सिंह
दिवस दाम्पत्य जीवनासाठी आनंदाचा आहे. जोडीदाराला वेळ द्याल. प्रेम वाढेल. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत मिळतील. ऑफिसमधील काम इमानदारीने कराल, अधिकारी खुश होतील.
जोडीदार किंवा संतती एखादी मागणी करू शकतात.
आज जोडीदाराची आपल्या कुटुंबियांशी भेट घडवून आणू शकता.

कन्या
कार्यक्षेत्रात पात्रता विकसित केल्याने लाभ होईल. उत्पन्नाची नवीन साधने प्राप्त होतील. चतुर बुद्धीमुळे व्यापारातील सर्व कामे वेळेपूर्वीच पूर्ण कराल. लाभ होईल.
व्यवसाय किंवा नोकरीत सहकार्‍याचे बोलणे वाईट वाटले असेल तरी ते जाहीर करू नका, मनात ठेवा, कारण काम प्रभावित होऊ शकते. निर्णय विचारपूर्वक घ्या.

तुळ
दिवस मेहनतीचा आहे. प्रत्येक कामासाठी जास्त मेहनत करावी लागेल. आळस केलात तर कामे बिघडू शकतात. उत्पन्नाचे नवीन स्त्रात मिळाल्याने आर्थिक स्थिती सुधारले. तणाव दूर होईल.
रचनात्मक कामाची संधी मिळेल.
वाईट काळ सुरूअसेल तर समजा हा त्याचा हा शेवट आहे. संततीच्या विवाहाला संमती द्याल. विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणाची संधी आहे.

वृश्चिक
दिवस मध्यम आहे. सरकारी नोकरीत पदोन्नती मिळेल. व्यवसायात मैत्रिणीकडून धनलाभ होईल. रखडलेले पैसे मिळतील. उत्पन्नापेक्षा खर्च होईल. विचारपूर्वक खरेदी करा.
व्यवसायातील गुंतागुतीची समस्या एखाद्या वरिष्ठ सदस्याच्या सल्ल्याने समाप्त होईल.

धनु
आनंदाचा दिवस आहे. प्रेम संबंधात कोणतेही आश्वासन देऊ नका, कारण ते पूर्ण केले नाही तर नात्यात दरी वाढेल. व्यापार्‍यांना रोखीची कमतरता जाणवेल.
विद्यार्थ्यांना आव्हानाचा दिवस आहे.
भाऊ किंवा बहिणीच्या विवाहातील बाधा दूर होईल.

मकर
दिवस मध्यम फलदायक आहे. जे काम करण्याचा विचार कराल त्यामध्ये संभ्रम राहील. मन एकाग्र करून पुढे जावे लागेल. प्रेम जीवनात नवी उर्जा संचार करेल.
कार्यक्षेत्रात जुन्या गोष्टींकडे लक्ष न देता काही नवीन करण्याचा विचार करा.
व्यापारासाठी मित्राची मदत घ्याल. सायंकाळी मित्रांसोबत पार्टीला जाऊ शकता.

कुंभ
दिवस संमिश्र परिणामांचा आहे. नोकरीत कार्यालयात काही महत्वाची जबाबदारी मिळेल, सतर्क रहा, विरोधक त्रास देतील. मेहनतीने कामात यशस्वी व्हाल. भविष्याची चिंता सोड, समोच्या कामासाठी मेहनत करा.
आई-वडीलांची सेवा कराल.

मीन
काही तरी विशेष करण्याचा दिवस आहे. विद्यार्थ्यांना स्पर्धेत भाग घेण्याची संधी मिळेल, यश मिळेल. बिजनेससाठी लोकांचा सल्ला घ्याल, अनुभवी लोकांमुळे यश मिळेल.
आर्थिक स्थिती मजबूत होईल. सायंकाळी जोडीदारासोबत फिरायला जाऊ शकता.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

Web Title :   horoscope today aaj che rashifal horoscope 17 june 2021