17 मे राशीफळ : कुणाच्या हाती लागेल यश, कुणाच्या भाग्यात समस्या, जाणून घ्या तुमच्यासाठी कसा आहे सोमवार

 

मेष
दिवस मध्यम फलदायक आहे. भावांच्या सहकार्याने व्यापारात लाभ होईल. सायंकाळी मंगल कार्यात सहभागी व्हाल. सामाजिक क्षेत्र, नोकरी, सर्वच क्षेत्रात काही ना काही लाभ आवश्य होईल. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. राजकारणात यश मिळेल. विद्यार्थ्यांना यशासाठी जास्त मेहनत करावी लागेल.

वृषभ
दिवस ठोस परिणामांचा आहे. रखडलेली कामे पूर्ण होतील. आळस सोडावा लागेल. व्यापारात नव्या योजनांतून लाभ मिळेल. ऑफिसमध्ये वातावरण अनुकूल असेल. सहकारी सहकार्य करतील. घरात मंगलकार्य होईल. विवाहातील अडचणी दूर होतील.

मिथुन
घरात वातावरण आनंदमय राहील. लव्ह मॅरेजसाठी वेळ अनुकूल नाही. प्रियव्यक्तीला घरातील लोकांची भेट घडवायची असेल तर ती टाळा. कर्ज घेणे टाळा. मित्र, नातेवाईकांशी संबंध चांगले राहतील. स्वतासह घरातील लोकांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. व्यापारात वाढीसाठी नवी योजना सुचेल.

कर्क
नोकरी, व्यवसायात प्रगती होईल. जे काम करण्याचा विचार कराल त्यामध्ये यश मिळेल, म्हणून आवडीचे काम करा. ऑफिसमध्ये वाद होऊ शकतो, सावध रहा, कामावर लक्ष केंद्रीत करा. प्रमोशन रखडू शकते. घरातील लोकांशी चर्चा कराल. आई-वडीलांची सेवा कराल.

सिंह
दिवस उत्तम फलदायक आहे. कार्यक्षेत्रात अचानक धनलाभ होईल. रोजच्या गरजांसाठी पैसे खर्च कराल. खर्चावर नियंत्रण ठेवा. रचनात्मकता प्रभावित होईल. घरातील वातावरण गोड राहील. सायंकाळी भावांशी महत्वाच्या विषयावर चर्चा कराल.

कन्या
दिवस त्रासदायक आहे. यापूर्वी व्यापारात जो निष्काळजीपणा केला आहे, तो आज त्रासदायक ठरेल. नोकरीत रागावर नियंत्रण ठेवा, वाणी मधुर ठेवा, अन्यथा कामे बिघडतील. व्यापारात प्रयत्न करूनही यश न मिळाल्याने निराशा जाणवेल. खर्च वाढल्याने चणचण जाणवेल. दुपारनंतर स्थिती बदलेल.

तुळ
दिवस व्यस्ततेचा आणि धावपळीचा आहे. व्यापारात घरातील रखडलेली कामे पूर्ण करण्याचा विचार कराल. कुटुंबातील वाद संपुष्टात येईल. संपत्ती खरेदीसाठी दिवस उत्तम. जमीन मालमत्तेच्या प्रकरणात त्रास होऊ शकतो. मित्र उपयोगी पडतील.

वृश्चिक
वागण्यात मधुरता आणावी लागेल, तरच यश मिळेल. अन्यथा घरातील लोक नाराज होतील. वडीलांचा सल्ला आवश्यक आहे. व्यापारात द्विधा मनस्थितीमुळे निर्णय घेणे कठीण होईल. संधी हातातून जाईल. एखाद्याशी वाद होऊ शकतो, यासाठी वाणीवर संयम ठेवा. संततीच्या नोकरीसाठी प्रवास करू शकता. सामाजिक क्षेत्रात प्रसिद्ध लाभेल.

धनु
शुभ परिणाम मिळतील. व्यापारात जोखीम घेतल्यास भविष्यासाठी फायदा होईल. कौटुंबिक संपत्तीच्या प्रकरणात दुपारनंतर विजय होईल. नोकरीत नवीन संधी मिळेल. नोकरी आणि व्यापारात नाविन्य आणल्यास भविष्यात लाभ होईल. सायंकाळी शेजार्‍यांशी वाद टाळा, वाढू देऊ नका.

मकर
दिवस संमिश्र आहे. भागीदारीच्या व्यापारात लाभ होईल. व्यापारात अनेक कामे आल्याने व्यस्तता वाढेल. धैर्याने काम करा. यश मिळेल. घरासाठी घेतलेल्या निर्णयाने सुख आणि शांती मिळेल. विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाची आवश्यकत असेल. घरातील कामे उरकण्यासाठी संधी मिळेल. संततीसंबंधी मोठा निर्णय घ्याल.

कुंभ
सकाळी नकारात्मक विचार मनात येतील. यामुळे होत असलेली कामे बिघडू शकतात. नोकरीत अधिकार्‍यांसोबत सतर्क राहून काम करा, अन्यथा भविष्यातील लाभापासून वंचित रहाल. घाईत कोणतेही काम करू नका, निर्णय घेऊ नका. सर्व कामे विचारपूर्वक करा. आरोग्याविषयी समस्या होईल, काळजी घ्या. बाहेरचे खाणे टाळा.

मीन
दिवस शुभ फलदायक आहे. विद्यार्थ्यांन एकाग्रता कायम ठेवावी लागेल. रोजगाराची संधी मिळेल. घरातील समस्या सोडवण्यात यश येईल. परदेशाशी व्यापारात चांगली बातमी ऐकायला मिळेल. प्रेमजीवनात नवीन उर्जेचा संचार होईल.