18 जून राशीफळ : ‘या’ 5 राशीवाल्यांना होणार धनलाभ, नोकरी-व्यापारात प्रगतीचे संकेत, इतरांसाठी असा आहे शुक्रवार

मेष
horoscope 18 june 2021 | दिवस व्यस्ततेचा आहे. कायदेशीर वादात मधुरता ठेवा. आळसामुळे रखडलेल्या कामांकडे दुर्लक्ष करू नका. घरातील सदस्यांना वेळ देऊ शकणार नाही, ज्यामुळे ते नाराज होतील. आईची तब्येत बिघडू शकते, यासाठी सावध रहा.

वृषभ
विनाकारण चिंता कराल. कुटुंबातील सदस्यांची चिंता राहील.
मान प्रतिष्ठा वाढेल. संततीशी वाद होऊ शकतो, सावध रहा.
जर तुमची चूक असेल तर मान्य करा.
घरात प्रिय व्यक्तीचे आगमन होऊ शकते.

मिथुन
कौटुंबिक सुखात वाढ होईल. घरातील वाद संपेल. कुटुंबातील एखाद्या सदस्याला नोकरी लागू शकते, वातावरण आनंदी राहील. पार्टी कराल.
प्रवासाला जाताना विचापूर्वक जा, वस्तू चोरी होण्याची आणि हरवण्याची भीती आहे.

कर्क
दिवस सामान्य आहे. कामात काही समस्यांचा सामना करावा लागेल, पण यश मिळेल. विचार न करता सर्व कामे पुढे न्यावी लागतील. संततीच्या भविष्यासाठी प्रवास करावा लागेल, यश मिळेल.
वडीलांची तब्येत बिघडू शकते. डॉक्टरांचा सल्ला घ्या.

सिंह
संमिश्र परिणामांचा दिवस आहे. व्यापार किंवा नोकरीत व्यवहार टाळा, नुकसान होऊ शकते. भागीदारीच्या व्यापारात यश मिळेल.
विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळेल. संततीला चांगले कार्य करताना पाहून आनंद होईल.

कन्या
काहीतरी वेगळे करण्याची इच्छा होईल, यश मिळेल. नोकरीत वाणीवर नियंत्रण ठेवा, अन्यथा अधिकार्‍यांशी वाद होऊ शकतो, पदोन्नती आणि वेतनवाढीत बाधा येऊ शकते, वाणी मधूर ठेवा.
कुटुंबात कुणाशी तरी वाद होऊ शकतो, सावध रहा. सायंकाळी आई-वडीलांची सेवा कराल.

तुळ

धाडसात वाढ होईल. चेहर्‍यावर वेगळे तेज दिसेल, शत्रु आपोआप नष्ट होतील. व्यापारात एखादी डील पूर्ण होईल, भविष्यात लाभ होईल.
आर्थिक दृष्टिकोणातून जे काम कराल त्यामध्ये यश मिळेल.
प्रॉपर्टीत गुंतवणूक लाभदायक ठरेल.

वृश्चिक
दिवस चारही बाजूने प्रगतीचा आहे. कोणत्याही कामात हात टाकालात तरी यश मिळेल. कुणाकडून उधार घ्यायचे असेल तर सहज मिळेल.
जोडीदारासाठी भेटवस्तू खरेदी कराल. कुटुंबातील सदस्य तुमचा मान सन्मान राखतील.

धनु
आज शत्रुंपासून सावध रहा, व्यापार आणि घर दोन्ही ठिकाणी शत्रु त्रास देतील, त्याच्या षंडयंत्राचा भाग बनू नका, बुद्धीचा वापर करून दूर व्हा. संततीकडून चिंता होऊ शकते.
आरोग्याबाबत सावध रहा. सायंकाळी मित्रांसोबत फिरायला जाल.

मकर
दिवस चांगला आहे. व्यापारात बुद्धी आणि विवेकाने निर्णय घेतल्यास यश मिळेल. मित्राच्या मदतीसाठी पुढे यावे लागेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील.
प्रवासाला जाताना सावध रहा, दुखापत होण्याची शक्यता आहे.

कुंभ
दिवस आर्थिक दृष्टिकोणातून उत्तम आहे. सरकारी नोकरीत प्रमोशन मिळेल. कार्यक्षेत्रात अधिकारी आणि वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. पद प्रतिष्ठा वाढेल. विशेष सन्मानाने गौरव होईल.
मान सन्मान वाढेल. सायंकाळी प्रिय व्यक्तीचे दर्शन होईल.

मीन
दिवस शुभ परिणामांचा आहे. जुन्या भांडणातून सुटका होईल, निश्वास सोडाल. भेट, सन्मान मिळू शकतो. एखादे कार्य पूर्ण झाल्याने मन प्रसन्न राहील. मित्रांशी संबंध मधुर राहतील.
लोकांच्या भेटी होतील, मैत्री वाढेल. वाणी मधुर ठेवा.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Title : shoroscope today aaj che rashifal horoscope 18 june 2021