18 मे राशीफळ : ‘या’ 5 राशींना होणार धनलाभ, नोकरी-व्यापारात प्रगतीचे संकेत, इतरांसाठी असा आहे मंगळवार

मेष
दिवस अडथळ्यांचा असू शकतो. एखादे रखडलेले काम सायंकाळी पूर्ण होईल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. संततीकडून निराशाजनक बातमी ऐकायला मिळेल, यामुळे कामात मन लागणार नाही. पण लक्ष द्या, इतरांपासून दूर रहा. शत्रु फायदा घेऊ शकतात. रात्रीचा वेळ कुटुंबासोबत घालवाल.

वृषभ
दिवस समाधानाचा आणि शांततेचा राहील. संततीच्या भविष्याची चिंता कमी होईल. राजकारणात प्रयत्न यशस्वी होतील. मित्रांची संख्या वाढेल. रात्री काही नावडत्या व्यक्ती भेटल्याने त्रास होईल. जमीन, मालमत्तेचे सरकारी काम रखडलेल असेल तर त्यामध्ये यश मिळेल.

मिथुन
दिवस संमिश्र आहे. व्यापारासाठी प्रवास करावा लागेल. प्रवासात सावध रहा, मौल्यवान वस्तू चोरी होऊ शकते. विद्यार्थ्यांना परिक्षेत यश मिळेल. रात्री कुटुंबासह मंगलकार्यात सहभागी व्हाल. मनशांती मिळेल. संततीला यश मिळेल.

कर्क
दिवस उत्तम फलदायक आहे. संपत्ती खरेदीसाठी दिवस उत्तम. व्यापारात नवीन तंत्रज्ञानाचा वापर केल्यास भविष्यात लाभ होईल. कार्यक्षेत्रात उत्तम संधी मिळेल. प्रतिष्ठेत वाढ होईल. नोकरीत सांभाळून रहा. शत्रु त्रास देऊ शकतो. धैर्य राखा.

सिंह
दिवस प्रगतीचे नवे मार्ग खुले करेल. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा होईल. व्यापारात उत्पन्नाचे नवीन स्त्रोत मिळतील. घरात वाद होऊ शकतो, पण सायंकाळी भावांच्या मदतीने हा वाद संपेल. व्यापारात डील फायनल होईल. भरपूर पैसा मिळेल. नोकरीत दुसरीकडून ऑफर येऊ शकते. शरीरात एखादा रोग असेल तर तो त्रास देऊ शकतो.

कन्या
ठोस परिणामांचा दिवस आहे. संततीकडून सुखद बातमी समजेल. चांगल्या कामात पैसे खर्च होतील. कीर्ती वाढेल. रोजगारात अनपेक्षित यश मिळेल. दुपारनंतर एखाद्या कायदेशी वाद, खटला जिंकू शकता. मनोबल वाढेल. सायंकाळी कुटुंबातील लहान मुलांसोबत मजामस्ती कराल. जोडीदाराची साथ लाभेल.

तुळ
दिवस व्यस्ततेचा आणि धावपळीचा असेल. चारही बाजूचे वातावरण सुखमय राहील. घरात आनंद असेल. भाग्याची साथ लाभेल. कर्ज घेण्यासाठी दिवस उत्तम. बिझनेसमध्ये भावाचा सल्ला आवश्यक. सायंकाळी आईशी वाद होऊ शकतो, वाणीवर नियंत्रण ठेवा. जवळचा किंवा लांबचा प्रवास करावा लागेल.

वृश्चिक
आज सांभाळून रहा, आरोग्यात घसरण होऊ शकते. असे झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. व्यवसायाकडे लक्ष द्यावे लागेल. प्रेमजीवनासाठी वेळ काढाल. जोडीदारासाठी भेटवस्तू खरेदी करू शकता. सासरच्या एखाद्या व्यक्तीला उधार देऊ नका, परत येण्याची शक्यता कमी आहे.

धनु
दिवस सुखाचा आहे. विरोधक सुद्धा कौतूक करतील. तरीही सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. रखडलेले काम पूर्ण होईल. पार्टीचे आयोजन कराल. सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेण्याची संधी मिळेल. सासरच्या बाजूकडून पैसा मिळू शकतो. गुंतवणूक करून यश मिळवू शकता.

मकर
दिवस खुप खास आहे. कौटुंबिक आणि आर्थिक बाबतीत यश मिळेल. उपजिविकेच्या क्षेत्रात उत्तम संधी मिळेल. ऑफिसमध्ये सर्वप्रकारच्या सहकार्याने लाभ होईल. रात्री एखाद्या प्रियव्यक्तीची भेट होईल. सायंकाळी आई-वडीलांची सेवा कराल. भावासोबत पार्टटाईम व्यवसाय केल्यास लाभ मिळेल.

कुंभ
प्रगतीचे नवीन मार्ग खुले होतील. मित्रांच्या सल्ल्याने व्यापारात लाभ होईल. भागीदारीच्या व्यापारात भरपूर यश मिळेल. संततीच्या बाबतीत थोडे अस्वस्थ असू शकता. वडीलांच्या आरोग्याबाबत सतर्क रहा, त्यांच्या हाता-पायांमध्ये वेदनेची समस्या वाढू शकते.

मीन
दिवस थोडा चिंतेत व्यतीत होईल. संततीच्या परीक्षेबाबत एखादा मोठा निर्णय घ्यावा लागेल, ज्यामध्ये जोडीदाराचा सल्ला आवश्यक असेल. प्रवासात सावध रहा, मौल्यवान वस्तू हरवण्याची शक्यता आहे. मेहुण्याला पैसे उधार द्यायचे असतील तर विचार करून द्या, यामुळे संबंध बिघडू शकतात. दाम्पत्य जीवनातील अडथळा दूर होईल.