19 एप्रिल राशीफळ : सोमवारी वृषभ, कर्क आणि कन्यासह 6 राशींना मिळतील उत्तम परिणाम, नोकरी-व्यापारात होईल प्रगती

मेष
आजचा दिवस संमिश्र आहे. एखादा पाहुणा आल्याने आनंद होईल कारण त्याच्यापासून लाभ होईल. भागीदारीत व्यवसाय असेल तर पार्टनरपासून आज सावध रहा, अन्यथा तो नुकसान करू शकतो. आईसाठी भेटवस्तू खरेदी कराल. मामाच्या बाजूने धनलाभ होईल. सामाजिक क्षेत्रात प्रसिद्धी वाढेल. मित्र वाढतील. सायंकाळचा वेळ जोडीदारासोबत बाहेर फिरण्यात घालवाल.

वृषभ
आजचा दिवस प्रगतीदायक आहे. प्रेमसंबंधात तणाव असू शकतो. तरीसुद्धा नात्यात गोडवा ठेवा आणि चर्चेतून सर्व गोष्टी सायंकाळपर्यंत सोडवाल. आर्थिकस्थिती मजबूत होईल. एखाद्या मित्राला मदत कराल. उत्पन्न आणि खर्च याकडे लक्ष ठेवा. व्यापारात नवीन लाभ हातात येतील, ज्यांची मोठ्या कालावधीपासून वाट पहात होतात. नवीन घर, दुकान खरेदी करू शकता. भावाच्या आरोग्याबाबत सावध रहा कारण घसरण होऊ शकते.

मिथुन
आपल्या प्रतिमे प्रमाणे काम करा आणि अनैतिक हालचालींपासून दूर रहा. अन्यथा नुकसान होईल. बँक लोन किंवा उधार घेतले असेल तर त्यामधून मुक्त व्हाल. पैसा वाढेल. नोकरीत ऑफिसच्या कामात घाई करू नका, यामुळे अधिकार्‍यांशी संबंध खराब होतील. भागीदारीच्या व्यापारात लाभ होईल. जमीन, मालमत्तेमध्ये गुंतवणुक उत्तम ठरेल.

कर्क
आज प्रगतीची पायरी चढाल. एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या मदतीने अडकलेले पैसे मिळतील. सरकारी काम पूर्ण होईल. राजकीय लोकांशी संबंध वाढतील. सामाजिक क्षेत्राची कक्षा वाढेल. मात्र प्रयत्न कमी करू नका. सुरू केलेल्या कामात फायदा होईल. प्रसिद्धी वाढेल. सायंकाळी मित्रांसोबत आनंदात रहाल. एखाद्या गैसमजामुळे कामात विघ्न येऊ शकते.

सिंह
आज यशाचे नवीन मार्ग खुले होतील. व्यापारात नवीन काम करण्याची संधी मिळेल. भागीदारीच्या व्यापारात पार्टनरच्या सल्ल्याने नवीन उत्साह येईल. याचा भविष्यात लाभ होईल. एखादी मोठी डील फायनल होऊ शकते, ज्यामुळे पैसा वाढेल. आईच्या आरोग्याबाबत सावध रहा. बाहेरचे खाणे टाळा. सायंकाळी भावासोबत चर्चा कराल.

कन्या
आज चारही बाजूला आनंद असेल, ज्यामुळे मन प्रसन्न राहील. चेहर्‍यावर उत्तम तेज असेल. मोठ्या कालावधीपासून रखडलेली कामे मार्गी लागतील. पैसे चारपट वाढवण्याचा प्रयत्न कराल. कौटुंबिक तणाव समाप्त होईल. सासरच्या बाजूने एखाद्या व्यक्तीशी वाद होईल. परदेशाशी व्यापार करत असलेल्या लोकांना आज शुभवार्ता समजेल.

तुळ
आजचा दिवस उत्तम यशदायक आहे. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाचा मार्ग प्रशस्त होईल. महत्वाचा निर्णय घ्यायचा असेल तर विचारपूर्वक घ्या, अन्यथा भविष्यात नुकसान होऊ शकते. नेतृत्व क्षमता वाढेल. व्यापारातील समस्या संपतील. कार्यक्षेत्रात जोडीदाराचा सल्ला उपयोगी पडेल. घरातील रखडलेली कामे आज पूर्ण करा.

वृश्चिक
आजचा दिवस काहीसा निराशाजनक आहे. विद्यार्थ्यांना जास्त एकाग्रतेने परीक्षेची तयारी करावी लागेल. भावाला शारीरीक त्रास होऊ शकतो. घरात तणावाची स्थिती निर्माण होऊ शकते. वाणीवर नियंत्रण ठेवा. सायंकाळी वडीलांच्या सल्ल्याने घरातील तणाव कमी होईल. विवाहासाठी इच्छूक जातकांसाठी चांगले प्रस्ताव येतील. वडील आणि आईला तिर्थस्थानची यात्रा घडवाल.

धनु
आजचा दिवस ठोस परिणामांचा आहे. घरातील सर्व जबाबदार्‍या पूर्ण कराल. विवाहासाठी इच्छूक जातकांना चांगले प्रस्ताव येतील. नोकरीत प्रमोशन मिळेल. पण वाणीत गोडवा ठेवावा लागेल. कर्जातून मुक्त होऊ शकता. घराच्या सजावटीसाठी खरेदी करू शकता. संततीच्या शिक्षणासंबंधी काही कागदपत्र पूर्ण करण्यासाठी धावपळ करावी लागेल.

मकर
आजचा दिवस प्रगतीचा आहे. व्यवसायाच्या प्रगतीसाठी जास्त प्रयत्न कराल. नवीन धोरण बनवाल, ज्यामध्ये यश मिळेल. सासरच्या बाजूच्या एखाद्या व्यक्तीला पैसे द्यायचे असतील तर विचारपूर्वक द्या, नात्यात दरी निर्माण होऊ शकते. विद्यार्थी एखाद्या नव्या कोर्ससाठी प्रवेश घेतील. जोडीदाराला आज पोटाशी संबंधीत समस्या होऊ शकते, ज्यामुळे धावपळ करावी लागेल. कौटुंबिक संपत्तीचे एखादे प्रकरण कायदेशीर असेल तर त्यामध्ये विजय मिळू शकतो.

कुंभ
आजचा दिवस संमिश्र आहे. प्रेमसंबंधात मान-सन्मान वाढेल, नाते कायम स्वरूपी नात्यात बदलाल. धार्मिक कार्यात सहकार्य केल्याने नाव होईल. नवीन व्यापारासाठी दिवस चांगला आहे. सायंकाळी देवदर्शनाला जाऊ शकता. वाहन खरेदीचा विचार करत असाल तर वेळ चांगली आहे. शेजार्‍यांशी वाद झाला तर तो सोडवण्याचा प्रयत्न करा, अन्यथा कायदेशीर होऊ शकतो. जोडीदाराचे भरपूर सहकार्य मिळेल.

मीन
आजचा दिवस संमिश्र आहे. तुमचे हरवलेले घर, अडकलेले पैसे परत मिळू शकतात, ज्यामुळे मन आनंदी होईल. नवीन व्यापार सुरू करण्यासाठी उत्तम काळ आहे. भाग्याची साथ लाभेल. व्यापारात नवीन स्त्रोत विकसित होतील. वडीलांच्या आरोग्याची काळजी घ्या. डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्या. गुंतवणूक करायची असेल तर जोडीदाराचा सल्ला आवश्य घ्या. आई-वडीलांचे आशीर्वाद तसेच मार्गदर्शनाने लाभ प्राप्त होईल.