19 मे राशीफळ : ‘या’ 3 राशीच्या जातकांनी रहावे सावध, आरोग्य बिघडण्याची शक्यता, इतरांसाठी असा आहे बुधवार

मेष
दिवस परोपकारात जाईल. दुसर्‍यांना मदत करून समाधान लाभेल. रात्री जोडीदाराची तब्येत बिघडल्याने चिंता वाटेल. कार्यक्षेत्रात मनासारखे परिवर्तन होईल, सहकार्‍यांचा मूड खराब होईल, पण वर्तणूक चांगली ठेवा, सर्व ठिक होईल. सायंकाळी घरातील छोट्या मुलांसोबत मजामस्ती कराल.

वृषभ
दिवस सुखद आहे. दुपारपर्यंत शुभवार्ता समजेल. विवाहाचे उत्तम प्रस्ताव येतील. रात्री मंगलकार्यात सहभागी व्हाल. मानसन्मान वाढेल. सासरकडून धनलाभ होईल. रखडलेले काम पूर्ण करण्यासाठी वेळ काढाल. नोकरीत पार्टटाइम कामासाठी दिवस उत्तम.

मिथुन
संमिश्र दिवस आहे. मौल्यवान वस्तु किंवा संपत्तीची इच्छा पूर्ण होईल. व्यस्त रहाल. पण जोडीदारासाठी वेळ काढाल. संततीच्या भविष्यासाठी महत्वाचा निर्णय घेऊ शकता. सायंकाळी मित्रांसोबत पार्टी कराल.

कर्क
संमिश्र परिणामांचा दिवस आहे. अचानक मोठ्या प्रमाणात पैसा आल्याने आनंद वाढेल. महत्वाचा निर्णय घ्यावा लागेल, तो विचारपूर्वक घ्या, अन्यथा पश्चाताप होईल. व्यवसायाच्या योजनांना गती मिळेल. मान, प्रतिष्ठा वाढेल.

सिंह
राजकारणात अपेक्षित यश मिळेल. सामाजिक क्षेत्र मजबूत होईल. खर्च करावा लागेल. खाण्या-पिण्याकडे विशेष लक्ष द्या. अन्यथा आरोग्य घसरू शकते. रखडलेली कामे होतील. संततीच्या विवाहातील अडचणी दूर होतील.

कन्या
नकारात्मक परिणाम मिळतील. उलट परिस्थिती निर्माण झाल्यास रागावर नियंत्रण ठेवावे लागेल, अन्यथा नुकसान होईल. घरातील तणाव दूर होईल. कामात तत्परतेने लाभ मिळेल. मंगलकार्यात सहभागी व्हाल. भागीदाराच्या व्यवसायात लाभ मिळेल.

तुळ
सामाजिक क्षेत्र मजबूत होईल. प्रसिद्धी वाढेल. विशेष सन्मान मिळेल. मित्रांची संख्या वाढेल. धावपळ करावी लागेल. आरोग्य घसरू शकते. सावध रहा. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. व्यापारात उत्पन्नाचे नवीन स्त्रात मिळतील. देशाटन सुखद आणि लाभदायक ठरेल.

वृश्चिक
आज आर्थिक स्थिती मजबूत राहील, कारण मोठ्या कालावधीपासून अडकलेले पैसे भावाच्या मदतीने मिळतील. व्यापारात सुद्धा नवीन डील फायनल होईल. सायंकाळी प्रियव्यक्तींची भेट होईल. नोकरीत किंवा शेजार्‍यांशी वाद झाल्यास वाणीवर संयम ठेवा, अन्यथा विपरीत स्थितीला तोंड द्यावे लागेल.

धनु
खर्चाचा दिवस आहे. गृह उपयोगी वस्तु आणि दैनिक गरजांसाठी पैसे खर्च कराल. पण खर्चावर नियंत्रण ठेवा. पैशाचा व्यवहार करताना सावध रहा. नोकरीत सावध रहा, शत्रु षडयंत्र रचू शकतो. एखाद्या कर्मचार्‍यामुळे तणावा वाढू शकतो.

मकर
व्यवसायाठी दिवस उत्तम. प्रगती होईल. वाहन चालवताना सावध रहा, वाहन खराब होऊ शकते, खर्च वाढेल. आर्थिक स्थिती पहिल्यापेक्षा चांगली होईल. भविष्याची चिंता कमी होईल. व्यवस्था परिवर्तनाची योजना यशस्वी होईल. विद्यार्थ्यांना यश मिळेल.

कुंभ
व्यस्तता आणि धावपळीचा दिवस आहे. जोडीदाराला शारीरीक त्रास होऊ शकतो. धावपळ करावी लागेल. खर्च होऊ शकतो. संपत्ती खरेदी-विक्रीत सर्वबाजू तपासून पहा. फसवणूक होऊ शकते. आई-वडीलांचे सहकार्य मिळेल. रखडलेली कामे पूर्ण होतील. नोकरीत जास्त मेहनत करावी लागेल.

मीन
दिवस उत्तम फलदायक आहे. दाम्पत्य जीवनात आनंद असेल. आई-वडीलांच्या सेवेतून यश मिळेल. व्यापारासाठी प्रवास करावा लागेल, यातून उत्तम लाभ होईल. आनंद वाढेल. विद्यार्थ्यांचा मानसिक, बौद्धिक भार हलका होईल. सायंकाळी मित्रांसोबत फिरायला जाल, यातून महत्वाची माहिती मिळेल.