2 जून राशीफळ : आज मंगळ ग्रहाचे राशी परिवर्तन, 5 राशींना अडचणी, रहा सावध; इतरांसाठी असा आहे बुधवार

0
140
horoscope today aaj Che rashifal horoscope 2 june 2021
File photo

मेष 
horoscope : दिवस संमिश्र आहे. सामाजिक क्षेत्रात सन्मान मिळेल. प्रसिद्धी मिळेल, नशीब चमकणार आहे. मित्रांसोबत प्रवासाला जाऊ शकता, सावधगिरी बाळगा, वस्तू चोरी होण्याची भीती आहे. नोकरीत मोठ्या अधिकार्‍यांशी वाद होऊ शकतो, यामुळे नुकसान होऊ शकते.

वृषभ
दिवस अडचणींचा आहे. घरात एखाद्या सदस्याच्या विवाहावर चर्चा होईल. कुटुंबाच्या नवीन योजनांकडे लक्ष द्याल, पैसे खर्च होतील. व्यापार्‍यांना जास्त मेहनत करावी लागेल, जी व्यर्थ ठरेल. सरकारी नोकरीत वरिष्ठ अधिकार्‍यांचा कोप होईल. संततीच्या बाबतीत गंभीर निर्णय घ्यावा लागेल. कर्ज घेण्यासाठी दिवस चांगला आहे.

मिथुन
दिवस विशेष लाभ देणारा आहे. नोकरी आणि व्यवसायातील समस्या सुटतील. सायंकाळ मित्र आणि कुटुंबियांसोबत आनंदा घालवाल. कुटुंबातील तणाव बाहेर येईल, चिंता वाढेल. आईच्या तब्येतीत घसरण होईल, सतर्क रहा, डॉक्टरांचा सल्ला घ्या. रोजगाराची संधी मिळेल.

कर्क
व्यापरातील योजनांना गती देण्यात व्यस्त रहाल, यामुळे जोडीदाराशी वाद होऊ शकतो, त्यांन समजवा. संततीचे कार्य पाहून आनंदी व्हाल. मित्र आणि नातेवाईकांची मदत करावी लागेल. सासरच्या बाजूकडील कुणालाही पैसे देताना विचारपूर्वक द्या, नात्यावर परिणाम होऊ शकतो.

सिंह
दिवस संमिश्र आहे. ऑफिस आणि व्यवसायात शत्रुपासून सावध रहा, प्रगती पाहून ते त्रास देतील. अनोळखी व्यक्तीशी व्यवहार विचारपूर्वक करा. व्यापारात डील पूर्ण होईल, यावेळी निर्णय डोळे, कान उघडे ठेवून घ्यावा लागेल. तरच लाभ होईल.

कन्या
दिवस अनुकूल आहे. विपरीत परिस्थितीत रागावर नियंत्रण ठेवा, काम बिघडू शकते. प्रेमजीवनात नवी उर्जा मिळेल. कुटुंबात शुभकार्यावर चर्चा होईल. सायंकाळी शेजार्‍यांशी वाद टाळा. कायदेशीर प्रकरणात आज विजय होईल.

तुळ
गोंधळाचा दिवस आहे. संपूर्ण दिवस गोंधळ-गडबडीत जाईल, व्यापारावर लक्ष राहणार नाही, नुकसान होईल. घरात तणाव होऊ शकतो, वडीलांचा सल्ला घेऊन तो दूर करा. सायंकाळी व्यापारातील समस्या सुटतील. विवाहाचे उत्तम प्रस्ताव येतील. भाऊ-बहिणीेचे सहकार्य मिळेल. विद्यार्थ्यांना गुरुजनांचा आशीर्वाद मिळेल.

वृश्चिक
एखाद्या विशेष योजनेच्या प्लॅनिंगमध्ये दिवस जाईल. घर आणि ऑफिसच्या कामात पूर्ण दिवस जाईल. नोकरीत अधिकार्‍यांशी चांगले ट्यूनिंग राहील. सरकारी संस्थेकडून लाभ मिळेल. संततीकडून शुभवार्ता समजेल. कामासाठी बनवलेल्या योजनेला गती द्याल. जोडीदाराशी वाद होऊ शकतो.

धनु
ग्रह चांगले आहेत. व्यापारात अचानक भरपूर धनलाभ होईल. व्यापारात रिसर्च करत असाल तर मोठा लाभ होईल. विद्यार्थ्यांच्या मार्गातील बाधा दूर होतील. व्यापारातील मेहनतीचा आज लाभ मिळेल. सासरकडून मान सन्मान मिळेल. सायंकाळचा वेळ आई-वडीलांसोबत घालवाल.

मकर
दिवस ठोस परिणामांचा आहे. दाम्पत्य जीवन चांगले राहील. संततीच्या भविष्यातील योजनांवर चर्चा कराल. कार्यक्षेत्रात वरिष्ठ अधिकार्‍यांशी वाद होऊ शकतो. रागावर नियंत्रण ठेवा. तरच प्रमोशन मिळू शकते. पाहुण्यांचे आगमन होईल. सायंकाळ घरातील लोकांसोबत आनंदात घालवाल.

कुंभ
दिवस उत्तम फलदायक आहे. उत्तरार्धात धनवृद्धी होईल. जोडीदाराला भेटवस्तू द्याल. आई-वडीलांशी संबंध मधूर होतील. वाहन, जमीन खरेदीसाठी दिवस उत्तम आहे. नोकरीत शत्रुंच्या त्रासाचा सामना करावा लागेल, सतर्क रहा. अधिकार्‍यांशी संबंध चांगले ठेवा.

मीन
संपूर्ण दिवस व्यस्तता आणि धावपळीत जाईल. इतरांच्या कामासाठी धावपळ कराल. समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. वडीलांचा सल्ला घेतला तर यश मिळेल. व्यस्तता आणि हवामानामुळे तब्येत बिघडू शकते. विद्यार्थ्यांना स्पर्धेत यश मिळेल.

 

Also Read This : 

 

Hair Care : आरोग्यासह सौंदर्याचीही विशेष काळजी घ्या

 

Lockdown कसा उठवायचा याबद्दल ICMR ने ठरवले निकष, म्हणाले…

 

‘हे’ पदार्थ मुलांना दररोज द्या, मेंदू संगणकापेक्षा वेगवान चालेल

 

बारामती : राष्ट्रवादीचे नेते रविराज तावरेंवर हल्ला कसा झाला ? इतिहासात पहिल्यांदाच घडलं ‘असं’

 

रताळे ‘या’ व्यक्तींसाठी हानिकारक, जाणून घ्या