20 एप्रिल राशीफळ : ‘या’ 3 राशीवाल्यांच्या जीवनात येईल समृद्धी, आर्थिकस्थिती होईल मजबूत, इतरांसाठी असा आहे मंगळवार

मेष
आजचा दिवस काही आव्हाने घेऊन येऊ शकतो. नोकरी शोधणार्‍यांना नवीन संधी मिळतील. कार्यक्षेत्रात शत्रु प्रबळ असतील, त्यांच्यामुळे काही अडचणी येऊ शकतात. व्यापारी वर्गासाठी वेळ अनुकूल आहे. गुंतवणुकीचा विचार करत असाल तर दिवस उत्तम नाही. व्यापारात विस्तारासाठी आज कुटुंबाशी चर्चा कराल, सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे तुमचे वैशिष्ट्य यश देईल. सायंकाळचा वेळ मित्रांसोबत चर्चेत घालवाल. संततीसाठी एखादी भेट खरेदी करू शकता.

वृषभ
आजचा दिवस संमिश्र आहे. राजकारणात चांगले जनसमर्थन मिळेल, ज्यामुळे मित्रांच्या संख्येत वाढ होईल. एखादे नवीन काम सुरू करण्यासाठी वेळ चांगली आहे. आईच्या आरोग्याकडे लक्ष द्या आणि त्यांना बाहेरचे खाऊ देऊ नका. आज दिवसातील सर्व कामे लवकर उरकून सायंकाळचा वेळ कुटुंबासोबत घालवाल, ज्यामुळे मानसिक शांतता मिळेल. वडीलांचे पूर्ण सहकार्य मिळेल आणि कुटुंबात मंगलकार्याची तयारी होईल. व्यवसायात हळुहळु यशाकडे पाऊल टाकाल.

मिथुन
आजचा दिवस थोडा निराशाजनक असू शकतो. जे लोग नोकरीच्या शोधात इकडे-तिकडे भटकत आहेत, त्यांना रोजगार मिळेल. बिझनेसच्या समस्या संपवण्यासाठी वडीलांचा सल्ला आवश्यक असेल आणि त्यांच्या मार्गदर्शनाने बिझनेस मोठा कराल. स्थायी संपत्तीत आज लाभ मिळेल. भाऊ-बहिणीशी महत्वाच्या गोष्टींवर चर्चा होईल. कार्यक्षेत्रात सर्व लोक आज मदतीसाठी पुढे येतील. जर मोठ्या कालावधीपासून एखाद्या वस्तूची कामना करत होतात तर ती आज प्राप्त झाल्याने मन आनंदी होईल.

कर्क
आजचा दिवस व्यापारात प्रगतीचा आहे. व्यापारात नवीन डिल फायनल होऊ शकते. ज्यामुळे मन आनंदी होईल. आर्थिकस्थिती मजबूत होईल. संततीच्या विवाहात येणार्‍या अडचणी एखाद्या व्यक्तीच्या मदतीने संपतील, ज्यामुळे कुटुंबातील सर्व लोक आनंदी होतील. सामाजिक कार्यात रूची वाढेल. विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासात वाढ होईल. मित्रांसोबत बाहेर फिरायला जाऊ शकता. सामाजिक कक्षा वाढेल.

सिंह
आजचा दिवस उत्तम फलदायक आहे. प्रत्येक पावलास यशाची पायरी चढाल. ऑफिसमध्ये वेळेपूर्वी काम पूर्ण केल्याने अधिकारी खुश होतील, यामुळे विरोधकांचे षडयंत्र अयशस्वी होईल. सायंकाळ कुटुंबासोबत घालवाल, महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा कराल. नातेवाईकांसोबत काही वाद असेल तर तो आज संपेल. संसारिक सुखाच्या साधनांवर खर्च कराल. उत्पन्न आणि खर्चाचे संतुलन ठेवावे लागेल. अन्यथा नुकसान होऊ शकते.

कन्या
आजचा दिवस संमिश्र आहे. परदेशाशी व्यापारात शुभवार्ता समजू शकते. बहिण-भावासाठी विवाहाचा प्रस्ताव प्रबळ होऊ शकतो. कुटुंबात मंगलकार्य होत असल्याने सर्व सदस्य व्यस्त दिसतील आणि मुले मजामस्ती करतील. कार्यक्षेत्रात प्रतिस्पर्धी डोकेदुखी बनतील. दाम्पत्य जीवनात सुखाची स्थिती जाणवेल. ज्येष्ठांची सेवा आणि दान-पुण्यात खर्च कराल. विद्यार्थ्यांसाठी शुभ दिवस आहे. एकाग्रतेने अभ्यास करा.

तुळ
आजचा दिवस संमिश्र आहे. संवेदनशील मुद्द्यांवर कुटुंबासोबत चर्चा कराल. प्रेमसंबंधात गोडवा राहील. कार्यक्षेत्रात गुप्तशत्रु आज सक्रिय राहतील आणि नुकसान करण्याचे सर्व प्रयत्न करतील. कामाच्या ठिकाणी मेहनत केल्यानंतर उत्पन्न कमी आणि खर्च जास्त होईल. व्यस्ततेमुळे घरात लक्ष न दिल्याने जोडीदार नाराजी व्यक्त करू शकतो, परंतु त्यांचे म्हणणे समजून घ्यावे लागेल.

वृश्चिक
आजचा दिवस उत्तम फलदायक राहील. विद्यार्थ्यांना शिक्षक आणि सहकार्‍यांचे सहकार्य मिळेल. भविष्यातील गोष्टींवर चर्चा कराल. नोकरदारांना दुसर्‍या ठिकाणाहून प्रस्ताव येऊ शकतो. कायपूर्तीसाठी आपले म्हणणे दुसर्‍यांपर्यंत पोहचवण्यात यशस्वी व्हाल. सरकारी धोरणांचा भरपूर लाभ मिळेल. एखादी महत्वाची व्यवस्था तुमच्या बाजूने फायनल होऊ शकते. सासरच्या बाजूच्या एखाद्या व्यक्तीशी मतभेद होऊ शकतो, परंतु जोडीदार तुमच्या बाजूने उभा राहील.

धनु
आजचा दिवस संमिश्र आहे. बिझनेससाठी महत्वाचा निर्णय घ्यायचा असेल तर विचारपूर्वक घ्या, अन्यथा भविष्यात हानी होऊ शकते. भावाच्या मदतीची आवश्यकता असेल. वडीलांशी वैचारिक मतभेद होऊ शकतो, परंतु त्यांचे म्हणणे ऐकून पुढे गेलात, तर भविष्यात लाभ होईल. संततीला चांगले काम करताना पाहून आनंद होईल. व्यवसायासाठी काही नवीन उपकरणे खरेदी करू शकता. सायंकाळी जोडीदाराला घेवून बाहेर फिरायला जाऊ शकता.

मकर
रोजगाराशी संबंधीत जातकांना मागील काही दिवसांपासून सुरू असलेली समस्या सुटेल. एखाद्या मोठ्या अधिकार्‍याच्या मदतीने जमीनीचे प्रकरण मार्गी लागेल. व्यस्तता असूनही दाम्पत्य जीवनासाठी वेळ काढाल. सासरच्या बाजूशी संबंध हळुहळु चांगले होऊ लागतील, परंतु व्यवहार टाळा. धार्मिकस्थळांचा प्रवास करू शकता. भागीदारीत काही काम करणार असाल तर त्यामध्ये अडथळा येऊ शकतो. प्रेमसंबंधात आज आपल्या जोडीदाराला कुटुंबियांशी भेटवू शकता.

कुंभ
आजचा दिवस व्यवस्थित असेल. नोकरीत कामाचा भार जास्त असेल, परंतु मेहनतीने काम करून कामात नाव कमवावे लागेल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल आणि वाणी साम्य ठेवावी लागेल. कामाच्या योजना अगोदरच बनवून ठेवाल, परंतु तरीसुद्धा काही आकस्मात बदल करावे लागतील. भाऊ-बहिणीशी मतभेद होऊ शकतात. गुंतवणुकीचा विचार करत असाल तर ओळखीच्या व्यक्तीकडून मदत मिळू शकते. प्रेमसंबंध सुखमय राहतील. सासरच्या बाजूने मान सन्मान मिळेल.

मीन
आजाचा दिवस ठोस परिणामांचा आहे. विद्यार्थ्यांना भविष्यासाठी नवीन शक्यता प्राप्त होतील. जर एखादा आजार त्रास देत असेल तर त्यामध्ये सुधारणा होईल. संततीच्या विवाहात येत असलेल्या समस्या दूर होतील. सामाजिक ख्याती वाढेल. कौटुंबिक वातावरणात तणाव असू शकतो, परंतु महत्वाच्या विषयावर सर्व एकत्र येतील. व्यवसायात जास्त पैसे लावणे लाभदायक ठरेल. सायंकाळी आई-वडीलांना देवदर्शनासाठी घेवून जाऊ शकता. मित्रांच्या मदतीने दिवसभर उत्पन्नाचे नवीन स्त्रोत समोर येतील. ज्यामुळे मन आनंदी राहील.