26 मे राशिफळ : आज चंद्रग्रहण, ‘या’ 5 राशींसाठी धनप्राप्तीचा योग, इतरांसाठी असा आहे बुधवार

मेष
दिवस उत्तम फलदायक आहे. दुसर्‍यांना मदत करण्याने समाधान मिळेल. रात्री घरात एखाद्या सदस्याची तब्येत बिघडू शकते. परोपकारात दिवस जाईल. कार्यक्षेत्रात परिवर्तन करू शकता. शत्रुंची संख्या वाढेल. सतर्क रहा. वाणी मधुर ठेवा, तरच कार्यक्षेत्रात वातावरण चांगले ठेवू शकता.

वृषभ
सुखद परिणामांचा दिवस आहे. रखडलेल्या कामांसाठी वेळ काढाल. मंगलकार्यात सहकुटुंब सहभागी व्हाल. दुपारी व्यापाराशी संबंधीत शुभवार्ता समजू शकते. संततीच्या शिक्षणातील बाधा दूर करण्यासाठी प्रवास करावा लागेल.

मिथुन
संमिश्र परिणामांचा दिवस आहे. वडीलांच्या आशीर्वादाने बिझनेसमध्ये पुढे जाल. लाभ होईल. घरातील सदस्यांच्या गरजा पूर्ण कराल. सायंकाळी एखाद्या महान पुरुषाच्या दर्शनाने मनोबल वाढेल. नोकरीत परिवर्तनाची इच्छा असेल तर त्यासाठी दिवस उत्तम आहे.

कर्क
दिवस मध्यम फलदायक आहे. अचानक मोठ्या प्रमाणात पैसा मिळेल. कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्या, भावनिक होऊन घेतलेला निर्णय नंतर त्रासदायक ठरू शकतो. व्यवसायातील योजनांना गती मिळेल. पद प्रतिष्ठेत वाढ होईल. गरजू मित्राला मदत कराल.

सिंह
प्रगतीचे नवे मार्ग खुले होतील. संततीसाठी जबाबदारी पार पाडाल. संततीच्या विवाहातील अडथळे दूर होतील. राजकारणात अपेक्षीत यश मिळेल. समर्थन वाढेल. सायंकाळ प्रिय व्यक्तींसोबत घालवाल. आरोग्य नरम-गरम राहील, खाण्या-पिण्याची काळजी घ्या. व्यवसायात चांगल्या संधी मिळतील.

कन्या
आजचा दिवस उत्तम आहे. व्यवसायात नवीन प्रयोग करू शकता. रचनात्मक कामात मन लागेल. घरातील समस्या दूर होईल. व्यवसायात मित्राकडून मदत मिळेल. कुटुंबात मंगलकार्य होऊ शकते. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील अडचणी दूर होतील.

तुळ
शिक्षण क्षेत्रात संधी मिळतील. उत्पन्नाचे नवीन स्त्रात मिळतील. सरकारी नोकरीत वाणीवर नियंत्रण ठेवा, अन्यथा नुकसान होईल. अधिकार्‍याशी वाद होऊ शकतो. रागावर नियंत्रण ठेवा. प्रत्येक कामात जोडीदाराचे सहकार्य मिळेल. भविष्यातील योजनांवर विचार कराल.

वृश्चिक
दिवस आर्थिक दृष्टिकोणातू उत्तम आहे. चारही बाजूंकडून धनलाभ होईल. असे काम करा जे पूर्ण होऊ शकते आणि धनलाभ होईल. दुकान, घर खरेदीसाठी दिवस उत्तम. पैसा, सन्मान, यश, किर्ती वाढेल. सायंकाळी आई-वडीलांची सेवा कराल. विपरीत परिस्थितीत सुद्धा रागावर नियंत्रण ठेवा.

धनु
दिवस व्यस्ततेचा आणि धावपळीचा आहे. घरगुती वस्तूंवर खर्च करू शकता. जवळच्या व्यक्तीला पैसे उधार देताना विचारपूर्व द्या, परत मिळण्याची शक्यता कमी आहे. कोर्ट-कचेरीच्या प्रकरणात यश मिळेल. संसारिक सुखात वाढ होईल. जोडीदाराला भेटवस्तू द्याल. उत्पन्न आणि खर्चात संतुलन ठेवा.

मकर
व्यवसायिक क्षेत्रात अनुकूल परिणाम मिळतील. व्यवसायात परिवर्तनाच्या योजनेतून लाभ होईल. व्यापारात मोठी डील फायनल करू शकता. प्रेम जीवनात नवी उर्जा जाणवेल. कुटुंबात छोट्या पाहुण्याचे आगमन होऊ शकते. भागीदारीच्या व्यवसायात लाभ होईल.

कुंभ
दिवस त्रासदायक आहे. शारीरिक त्रास होऊ शकतो. ताबडतोब डॉक्टरांकडे जा. गुंतवणूक करताना वरिष्ठांचा सल्ला घ्या, अन्यथा नुकसान होईल. सासरच्या बाजूकडील एखाद्या व्यक्तीशी वाद होऊ शकतो. सामाजिक क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल.

मीन
दाम्पत्य जीवन आनंददायक राहील. प्रवासाला जाऊ शकता, परंतु आवडती वस्तू हरवण्याची किंवा चोरी होण्याची भीती आहे. सावध रहा. व्यवसायात प्रगती होईल. संततीला आज शारीरीक त्रास होऊ शकतो, ज्यामुळे अस्वस्थ होऊ शकता. अर्धवट कामे पूर्ण करण्याची संधी मिळेल.