9 एप्रिल राशीफळ : ‘या’ 5 राशीवाल्यांना मिळणार सुवर्णसंधी, ग्रह-नक्षत्रांचे संकेत, इतरांसाठी असा आहे शुक्रवार
मेष
आजचा दिवस खुप व्यस्ततेचा आहे. काम जास्त असल्याने कुटुंबासाठी वेळ काढता येणार नाही, यामुळे कुटुंबातील लोक नाराज होऊ शकतात. राजकीय सहकार्य मिळेल. आरोग्याच्या बाबतीत सतर्क राहा. नोकरीत वाणीवर नियंत्रण ठेवा. विरोधक प्रबळ होतील, परंतु ते सायंकाळी आपोअप शांत होतील. रोजगार शोधणार्या जातकांना एखादी खुशखबर मिळेल.
वृष
आजचा दिवस संमिश्र आहे. घरातील लोकांमध्ये आपसात वाद होऊ शकतो, तरीसुद्धा दाम्पत्य जीवन सुखमय राहिल. जोडीदाराला बाहेर फिरायला घेऊन जाऊ शकता, भेटवस्तू खरेदी करू शकता. व्यवसायात जेवढी मेहनत, तेवढे यश आवश्य मिळेल. धन, पद आणि प्रतिष्ठेत वाढ होईल. सासरच्या बाजूकडील एखाद्या व्यक्तीला पैसे द्यावे लागले तर विचार करा, पैसे परत मिळणे अवघड होईल. विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील.
मिथुन
आजचा दिवस निश्चित फलदायक आहे. धाडसात वाढ होईल. कौटुंबिक जीवन सुखमय राहिल, ज्यामध्ये भाग्याची भरपूर साथ मिळेल. मोठ्या कालावधीपासून रखडेलेल्या कामात आज प्रगती होईल. एखादी मौल्यवान वस्तू चोरीस जाण्याची शक्यता आहे, सतर्क राहा. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा, अन्यथा अडचणीत येऊ शकता. जोडीदार एखादी मागणी करू शकतो. सायंकाळ मित्रांसोबत मजामस्तीत आणि खाण्या-पिण्यामध्ये घालवाल. एखादा शत्रु तुमच्या विरुद्ध षडयंत्र रचू शकतो.
कर्क
आजचा दिवस थोड अडचणींचा आहे. एखाद्या कारणामुळे तणावाचा सामना करावा लागू शकतो. आरोग्याच्या बाबतीत सतर्क राहावे लागेल. अन्यथा शारीरीक त्रास वाढू शकतो. व्यवसायात विरोधकांचा पराभव होईल. व्यापार्यांना आज भरपूर लाभ होईल आणि व्यवस्थांच्या योजनांना बळ मिळेल, त्यामुळे बिझनेसची गती वाढवाल. संततीच्या विवाहाची समस्या संपेल. सायंकाळी वडिलांच्या सल्ल्याची आवश्यकता असेल.
सिंह
आजचा दिवस उत्तम फलदायक आहे. उपयोगी वस्तूंमध्ये वाढ होईल आणि भौतिक सुख-सुविधांमध्ये सुद्धा वाढ होईल. कामाच्या ठिकाणी सहकार्यांच्या एखाद्या कारणामुळे तणाव मिळू शकतो, यासाठी अस्वस्थ होऊ नका, सायंकाळी तो संपेल. जर कुणाला पैसे उधार देण्याचा विचार करत असाल तर अजिबात देऊ नका, कारण परत येणे आवघड आहे. वाहनाचा वापर करताना सावधगिरी बाळगा कारण दुर्घटना होण्याची शक्यता आहे. जोडीदाराशी प्रेमाच्या गोष्टी कराल.
कन्या
आजचा दिवस संमिश्र आहे. मोठ्या कालावधीपासून रखडलेल्या कामांबद्दल विचार करू शकता, परंतु हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा आळस सोडाल. कुटुंबात वाद होऊ शकतो, परंतु वाणीवर संयम ठेवा. सासरच्या बाजूकडून भेट मिळू शकते. मन धार्मिक कार्यात लागेल, ज्यामुळे मित्रांची संख्या वाढेल. संततीबाबत गर्व वाटेल.
तुळ
आजचा दिवस उत्तम सुख-समृद्धीचा आहे. पुरुषार्थात वाढ होईल. बेरोजगार व्यक्तींना आज रोजगार मिळण्याची मोठी शक्यता आहे. जर नोकरीत भांडण झाले तर टाळण्याचा प्रयत्न करा आणि रागावर नियंत्रण ठेवावे लागेल, अन्यथा प्रमोशन थांबू शकते. आईची तब्येत थोडी घसरू शकते. तिच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल.
वृश्चिक
आजचा दिवस त्या लोकांसाठी चांगला आहे, जे एखाद्या रोगाने पीडित आहेत, त्यांना आजच्या दिवशी पूर्ण लाभ होण्याची भरपूर शक्यता आहे. अनावश्यक खर्च टाळा. व्यवस्थेत केलेले प्रयत्न यशस्वी होतील. आरोग्यात सुधारणा झाल्याने मन प्रसन्न राहिल. जोडीदारासोबत प्रेमजीवन आनंदी राहील. संततीच्या जबाबदार्या पार पाडाल. विद्यार्थ्यांना परीक्षेत काही समस्यांचा सामना करावा लागेल.
धनु
आजचा दिवस संमिश्र फलदायक आहे. व्यापारातील गुप्त शत्रुंपासून सावध राहण्याची आवश्यकता आहे, अन्यथा ते व्यापारात नुकसान करू शकतात, सावध रहा. नोकरीत सुद्धा प्रमोशन मिळू शकते. सासरच्या बाजूकडून लाभ होईल. सायंकाळी घरी पाहुण्यांचे आगमन होऊ शकते, ज्यामुळे मन प्रसन्न होईल. आर्थिक दृष्टिकोनातून केलेल्या कामात यश मिळेल. नवीन कामात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर दिवस उत्तम आहे.
मकर
आजचा दिवस विशेष ठरणार आहे. रोजगारासाठी केलेल्या प्रयत्नांना यश मिळेल. भेट आणि सन्मान मिळाल्याने सुद्धा लाभ होईल. जर एखाद्या संपत्तीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी सुद्धा दिवस उत्तम आहे. भाग्याची भरपूर साथ मिळेल. कुटुंबात सुख आणि समृद्धी आल्याने प्रसन्नता राहिल. काही प्रिय व्यक्तींशी चर्चा होऊ शकते, ज्यामुळे मन आनंदी होईल. संततीच्या नोकरीसंबंधी प्रवास करावा लागू शकतो, ज्याचा भविष्यात आवश्य लाभ होईल.
कुंभ
आजचा दिवस ठोस परिणामांचा आहे. शासनातील सत्तेकडून सुद्धा सहकार्य मिळताना दिसत आहे. पद आणि प्रतिष्ठेत सुद्धा वाढ होईल, अचानक कुठेतरी अडकलेले पैसे मिळतील, परंतु उत्पन्न आणि खर्च दोन्हीमध्ये संतुलन ठेवावे लागेल, तरच भविष्यात सांभाळू शकता. कोणत्याही प्रकारच्या फालतू खर्चांपासून दूर राहण्याची आवश्यकता आहे. व्यापारासाठी काही प्रवास करू शकता, जो उत्तम राहिल. विद्यार्थ्यांना आज काही नवीन शिकायला मिळेल.
मीन
आजचा दिवस उत्तम आहे. जुनी भांडणे आणि वादापासून मुक्ती मिळेल. स्पर्धा वाढेल. कुणाशीही वादात पडू नका, मित्रांसोबतच्या संबंधात मधुरता येईल. एखादे काम झाल्याने मन आनंदी होईल. सासरच्या पक्षाकडून मान सन्मान मिळेल. व्यापारात काही नवीन करण्याचा विचार करत असाल तर आर्थिक स्थिती मजबूत बनवू शकता. सायंकाळचा वेळ मित्रांसोबत मजा मस्तीत घालवाल.