30 मे राशीफळ : आज मकर राशीत चंद्र, ‘या’ 4 राशींना होणार धनलाभ, इतरांसाठी असा आहे रविवार

मेष
दिवस परोपकाराच्या कामात व्यतीत होईल, यासाठी खर्चही कराल. एखाद्या ज्येष्ठाची मदत कराल. कार्यक्षेत्रात परिवर्तन होईल. सहकार्‍यांचा बिघडलेला मूड व्यवस्थित कराल. जोडीदाराच्या आरोग्यात घसरण होऊ शकते, ज्यामुळे त्रास होईल, खर्च होईल.

वृषभ
कुटुंबासोबत सुखाने वेळ घालवाल. दुपारी व्यापारात चांगली बातमी समजेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. धनलाभाची संधी आहे. आरोग्याच्या बाबतीत सतर्क रहा, प्रवास टाळा. विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या तयारीसाठी शिक्षकांची मदत घ्यावी.

मिथुन
संमिश्र परिणामांचा दिवस आहे. वडील, अधिकार्‍यांच्या कृपेने मौल्यवान वस्तु किंवा संपत्ती मिळू शकते. व्यापाराची चिंता असेल. जास्त प्रयत्न कराल. व्यस्ततेमुळे घरच्यांसाठी वेळ मिळणार नाही. कुटुंबात एखादा विवाह प्रस्ताव मंजूर होईल.

कर्क
दिवस उत्तम फलदायक आहे. व्यापारात धनलाभ होईल. जोडीदारासोबत शॉपिंगला जाऊ शकता. त्यांच्यासाठी खर्च कराल. सायंकाळी आईशी वैचारिक मतभेद होऊ शकतात. त्यांचे ऐकून पुढे जा. विवाहाचे चांगले प्रस्ताव येतील. सासरच्या बाजूकडून आर्थिक लाभ होईल.

सिंह
राजकारणात यश मिळेल. उल्हासाचे वातावरण असेल. संततीच्या जबाबदार्‍या पूर्ण कराल, जोडीदार प्रसन्न दिसेल. सायंकाळचा वेळ कुटुंबासोबत घालवाल. खाण्या-पिण्याच्या बाबतीत सावध रहा, पोटाची समस्या होऊ शकते. रखडलेले काम पूर्ण होईल.

कन्या
दिवस संमिश्र आहे. संपूर्ण दिवस सेवा आणि सत्कार कार्यात जाईल. वृद्धांची सेवा आणि पुण्यकार्यासाठी खर्च कराल. विरोधकांसाठी डोकेदुखी बनाल, ते त्रास देण्याचा प्रयत्न करतील. सरकारी नोकरीत प्रमोशन मिळू शकते. पण अधिकार्‍यांशी चांगले संबंध ठेवा. भागीदारीत व्यापार करण्यासाठी उत्तम दिवस आहे.

तुळ
विद्यार्थ्यांसाठी यश मिळवून देणारा दिवस आहे. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या तब्येतीमुळे धावपळ करावी लागेल, ज्यामुळे तुमच्या आरोग्यावर सुद्धा हवामानाचा परिणाम होऊ शकतो. जोडीदाराचे सहकार्य आणि सान्निध्य मिळेल. व्यापारासाठी प्रवास कराल, लाभ आणि नवीन स्त्रोत मिळतील.

वृश्चिक
आज आर्थिक बाजू मजबूत होऊन तुम्हाला पैसा, सन्मान, यश किर्ती मिळेल. मोठ्या कालावधीपासून रखडलेले काम सुद्धा आज भावाच्या मदतीने पूर्ण होईल, ज्यामुळे मन आनंदी होईल. रात्री मित्रांसोबत मजामस्ती कराल. नोकरीत वाणीवर सयंम ठेवा, अन्यथा प्रमोशन रखडू शकते, सतर्क रहा. शत्रु सुद्ध त्रास देण्याचा प्रयत्न करतील.

धनु
दिवस व्यस्ततेचा आणि धावपळीचा आहे. दैनिक गरजांवर खर्च कराल. सायंकाळी थकवा आणि तणाव जाणवेल. मालमत्तेचे प्रकरण कोर्ट-कचेरीत असेल तर विजय मिळेल. व्यापारात रखडलेली डी आज पूर्ण होईल. संततीच्या विवाहाचा प्रस्ताव मंजूर होईल.

मकर
व्यवसायात मनासारखे लाभ मिळतील. व्यवस्था परिवर्तनाच्या योजनेतून लाभ होईल. आर्थिक स्थिती चांगली होईल. तरीही उत्पन्न आणि खर्चात ताळमेळ ठेवा. अन्यथा भविष्यात त्रास होईल. वाहन जपून वापरा, अचानक खराब होऊन खर्च होईल. सायंकाळ कुटुंबात आनंदात घालवाल.

कुंभ
दिवस संमिश्र परिणामांचा आहे. मालमत्ता खरेदी-विक्रीपूर्वी सर्वबाजू तपासून पहा, अन्यथा भविष्यात त्रास होऊ शकतो. जोडीदाराला शारीरीक त्रास झाल्याने धावपळ करावी लागू शकते. प्रेमजीवनातील तणाव दूर होईल. व्यापारात कुणालाही पैसे उधार देताना विचार करा.

मीन
वैवाहिक जीवन आनंदी राहील. जोडीदाराला घेऊन फिरायला जाऊ शकता. बिझनेस प्रगती पाहून आनंद होईल. विद्यार्थ्यांना मानसिक आणि बौद्धीक भारातून सुटका होईल. तणाव कमी होईल. सायंकाळी फिरताना महत्वाची माहिती मिळेल. आज आई-वडीलांचा आशीर्वाद आवश्यक आहे. संततीच्या भविष्याची चिंता राहील.