5 मे राशीफळ : ‘या’ 5 राशी समस्येवर करतील यशस्वी मात, मिळेल आरोग्यलाभ, इतरांसाठी असा आहे बुधवार

मेष
आजचा दिवस प्रगतीचा आहे. मित्रांसोबत दूरच्या प्रवासाला जाऊ शकता. व्यवसायातील मनासारख्या यशाने आनंद होईल. पण बसल्याजागी लाभ होणार नाही. शेयर बाजारातून लाभ होईल. घरात शांतता राहील. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. अधिकार्‍यांशी वादातून नुकसान होईल. रागावर नियंत्रण ठेवा.

वृषभ
आज संमिश्र परिणाम मिळतील. व्यवसायात नवीन योजनेतून लाभ होऊ शकतो. संततीचा स्वभाव पाहून चिंता वाटू शकते. भविष्यातील खर्चाबाबत चिंतीत व्हाल. यासाठी उत्पन्न आणि खर्च यात संतुलन ठेवा. व्यापारात लाभप्राप्तीसाठी जास्त मेहनत करावी लागेल. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या आजारावर खर्च होईल.

मिथुन
आजचा दिवस संमिश्र आहे. रागामुळे जवळच्या माणसांशी वाद होऊ शकतो. दुपारी नोकरीतील काही प्रश्न सुटतील. थोडा लाभ होईल. सायंकाळी राजकीय धनप्राप्ती होईल. धनलाभ होईल, पण खर्च जास्त असल्याने आर्थिक स्थिती कमजोर होईल. विद्यार्थ्यांना तयारीची संधी मिळेल.

कर्क
आजचा दिवस उत्तम फलदायक आहे. कुणाकडेही लक्ष न देता कामात मग्न रहाल. सामाजिक क्षेत्रात संबंध वाढतील. व्यापारासाठी अचानक प्रवास करावा लागेल. कोणतेही काम हाती घेतल्यावर ते पूर्ण करूनच सोडाल. घरात मंगलकार्याचे नियोजन होईल. सामाजिक संबंध वाढतील. प्रसिद्धी वाढेल.

सिंह
आजचा दिवस संमिश्र आहे. गोंधळाची स्थिती राहील. महत्वाचे काम वरिष्ठ किंवा आईच्या सल्ल्याने करा. तरच यश मिळेल. कार्यक्षेत्रात नवीन संधी मेहनतीने मिळतील. सामाजिक जबाबदारी वाढेल. मित्राच्या मदतीला पुढे याल. तुमच्या दृष्टीकोनामुळे व्यापारात लाभाची संधी हातातून जाईल. पण संतोषी स्वभावामुळे मन दु:खी होणार नाही.

कन्या
आजचा दिवस आनंददायी आहे. स्थिती विरूद्ध असली तरी रागावर नियंत्रण ठेवा. वाणी सौम्य ठेवा. घरात तणाव असेल तर तो संपेल. नोकरीत प्रमोशन मिळू शकते. दिवसभर मजा, मनोरंजनाचा मूड राहील. यासाठी महत्वाच्या कामाकडे सुद्धा दुर्लक्ष कराल. मनात आनंद असेल. आईच्या आरोग्याबाबत दक्ष रहा.

तुळ
आजचा दिवस ठोस परिणामांचा आहे. कार्यक्षेत्रात पद आणि अधिकार वाढतील. प्रवासाचा योग प्रबळ होऊन स्थगित होईल. कुटुंबियांसोबत खरेदीवर खर्च कराल. कामात अपयश आल्याने मन हताश राहील. रागाचे प्रमाण जास्त असेल.

वृश्चिक
आज काहीतरी विशेष करून दाखवण्यात दिवस जाईल. सरकारी संस्थेकडून लाभ होऊ शकतो. एखाद्या चुकीमुळे एखादा आजार होण्याची शक्यता आहे. सायंकाळी संततीकडून अचानक एखादी बातमी समजू शकते. कार्यक्षेत्रात अधिकार्‍यांशी चांगले संबंध राहतील. प्रमोशनची शक्यता आहे. लेखन, कला क्षेत्रात प्रतिभा दर्शवण्याची संधी मिळेल.

धनु
आजचा दिवस संमिश्र आहे. मोठ्या अधिकार्‍याची कृपा होईल. अडकलेले पैसे मिळतील. वडीलांशी वाद होऊ शकतो, पण मनावर घेऊ नका. घाईत कोणतेही काम करू नका, नुकसान होईल. काम बिघडू शकते. सायंकाळी व्यापारात डील फायनल होईल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. सायंकाळी मुलांसोबत मजामस्ती कराल.

मकर
आजचा दिवस संमिश्र परिणामांचा आहे. कार्यक्षेत्रात कामावर लक्ष केंद्रित करा, अन्यथा वरिष्ठांशी वाद होईल. समस्येवर मार्ग काढण्यासाठी कुटुंबाशी चर्चा कराल. दाम्पत्य जीवन चांगले राहील. तेज आणि धाडस वाढेल. संपत्तीचा वाद संपेल.

कुंभ
आजचा दिवस लाभाच्या नवनवीन संधी देईल. व्यापारात पाचही बोटं तूपात असतील. एखाद्या कामात गुंतवणूक केल्यास भरपूर लाभ मिळेल. कुटुंबात वाद होऊ शकतो, वाणीवर नियंत्रण ठेवा. घरासाठी एखादी आवडती वस्तु खरेदी कराल. एखाद्या परिचिताची खुप दिवसांनी भेट होईल.

मीन
आजचा दिवस अनुकूल असल्याने शारीरिक आणि मानसिक आनंद जाणवेल. विद्यार्थ्यांना स्पर्धेत यश मिळेल. कुटुंबात विवाहावर चर्चा होईल. अध्यात्मात रूची वाढेल. सामाजिक क्षेत्रातील योगदानामुळे प्रशंसा होईल. उधारी वसूलीसाठी दिवस चांगला आहे. संततीच्या भविष्यासंबंधी समस्या सोडवण्यासाठी वेळ काढाल.