6 जानेवारी राशीफळ : कन्या आणि मीन राशीवाल्यांना मिळणार ‘भाग्याची साथ’, कुंभवाल्यांनी गुंतणूक टाळावी

मेष
ग्रहांची स्थिती सांगते की, अनावश्यक चिंता त्रास देईल, ज्यामुळे आरोग्य बिघडू शकते. म्हणूनच ती टाळण्याचा प्रयत्न करा. स्वतःवर आणि आपल्या माणसांवर रागावू नका, राग हा सर्वात मोठा शत्रू आहे. कामात आज निपुण असाल आणि आपले अस्तित्व दर्शवाल. भाग्य प्रबळ असल्याने कामात यश मिळेल आणि कौटुंबिक जीवन देखील आनंदी असेल. वैयक्तिक जीवनही प्रेमाने परिपूर्ण असेल. जोडीदारासह एखाद्या चांगल्या ठिकाणी फिरायला जाण्याची योजना आखाल.

वृषभ
ग्रह स्थिती पाहता खर्चाबाबत थोडी सावधगिरी बाळगा, ते आवाक्याबाहेर जाऊ शकतात. आरोग्य चांगले राहील, परंतु खाण्यापिण्याची अजिबात काळजी घेणार नाही, ज्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. भाग्य पाठीशी असल्याने नोकरीत यश मिळेल. दुर्गम भागातील व्यवसायातून लाभ होईल. कौटुंबिक जीवनाच चढ-उतार राहील. वडिलांची तब्येत खराब होऊ शकते. प्रेमसंबंधासाठी दिवस खूप अनुकूल आहे. दाम्पत्य जीवनात थोडा ताण असेल.

मिथुन
ग्रहांची स्थिती पाहता आजचा आनंदाचा ठरणार आहे. नवीन व्यवसायाबाबत खुप उत्साहित असाल, व्यवसायात नफा होईल. खर्च जास्त असेल, तरीही उत्पन्नामध्ये कोणतीही कपात होणार नाही. पूजेत मन लागेल. वैयक्तिक जीवनात आनंद राहील. जोडीदार देखील रोमँटिक मूडमध्ये असेल. प्रेमसंबंधात प्रिय व्यक्तीशी लग्नाबद्दल बोलू शकता.

कर्क
ग्रह आज पुढे जाण्याची प्रेरणा देतील. प्रवास होईल, मित्रांशी आणि भावंडांशी चांगले संबंध अनुभवाल. त्यांच्याशी गप्पा माराल. उत्पन्न चांगले होईल. कायक्षेत्रातील प्रतिभेला मान मिळेल. वैवाहिक जीवनात आनंद राहील. जोडीदार व्यवसायासाठी विचारू शकतो. जोडीदार खरेदीला जाण्याची जिद्द करू शकतो. प्रेमसंबंधात ताण दिसेल.

सिंह
आजचा दिवस संश्रित आहे. सरस्वती जिभेवरच राहील, म्हणून विचारपूर्वक बोला. चांगले खा आणि चांगले बोला. आज एखाद्याला मदत करण्याची इच्छा मनात जागृत होईल. घरचे वातावरण थोडे त्रासदायक असेल. प्रेमसंबंधात आनंद असेल आणि नातेसंबंधात प्रणय वाढेल. प्रिय व्यक्तीला एखादी वैयक्तिक गोष्ट सांगाल. दाम्पत्य जीवनात जोडीदाराच्या वागण्यामुळे थोडे निराश होऊ शकता. कामाच्या ठिकाणी कोणाशीही वाद टाळा.

कन्या
आज मनापासून खूप आनंदी व्हाल. मजेदार शैलीने इतरांना आनंदित करण्याचा प्रयत्न कराल. कौटुंबिक वातावरण देखील सकारात्मक असेल. जमीन, मालमत्तेशी संबंधित प्रकरणांमध्ये फायदा मिळेल. दुखापत होऊ शकते, म्हणून सावधगिरीने वाहन चालवा. भाग्य चांगले असल्याने अडकलेली कामे मार्गी लागतील. प्रेमसंबंधात आपलेपणा वाढेल. दाम्प्य जीवनात जोडीदाराच्या कर्तृत्वावर आनंदी होण्याची संधी मिळेल.

तुळ
आज जरा विचारपूर्वक वाटचाल करा, शारीरिक आरोग्य कमजोर होऊ शकते. मानसिक ताण थोडा त्रास देऊ शकतो. पायाला दुखापत होऊ शकते. दाम्पत्य जीवनात जोडीदाराचा राग तुम्हा सहन होणार नाही. कौटुंबिक जीवन आनंद आणि शांततेने भरलेले असेल. कुटुंबातील ज्येष्ठांचा आशीर्वाद मिळेल. मित्रांकडून सहकार्य मिळेल. कामासाठी प्रवास करावा लागेल. प्रेमसंबंध सामान्य असतील.

वृश्चिक
वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस चांगला आहे. आत्मविश्वास वाढेल. इच्छा पूर्ण होतील. उत्पन्नात देखील तेजी असेल. आरोग्य मजबूत राहील. परंतु तुमच्याबद्दल काही लोकांना तक्रार असेल की तुम्ही त्यांच्यापासून काही लपवत आहात. कुटुंबात लोकांचे येणे-जाणे राहील, कारण घरी एखादा चांगला कार्यक्रम असू शकतो. कौटुंबिक जीवन चांगले असेल. प्रेमसंबंधात आज बाहेर फिरायला जाऊ शकता.

धनु
ग्रहांची स्थिती दर्शवित आहे की आज तुमचे लक्ष कुटुंब आणि काम दोन्हीकडे बरोबर असेल, कारण तुम्हाला असा ताळमेळ आवडेल. मनात काहीतरी नवीन विकत घेण्याची इच्छा असेल, म्हणून घरासाठी आवश्यक असलेल्या वस्तू किंवा स्वत:साठी एखादा छान ड्रेस खरेदी करू शकता. थोडा खर्च होईल. मनात धार्मिक विचारही येतील. पूजेसाठी मंदिरात जाण्याची संधी मिळेल. दाम्पत्य जीवनात आनंद असेल. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. विरोधकांवर मात कराल. प्रेमसंबंधात आनंदाचा काळ आहे.

मकर
ग्रहांच्या स्थितीवरून असे सूचित होते की आज जोडीदाराबरोबर कुठेतरी बाहेर जाण्याची योजना आहे किंवा त्यांच्याद्वारे एखादी बिझनेस डिल केल्यास फायदा मिळेल. आरोग्य चांगले राहील. थोडा खर्च होईल. खरेदीसाठी कुटुंबातील सदस्यांना घेऊन जाल. जमीन, मालमत्तेशी संबंधित बाबी लक्ष वेधून घेतील, त्यामध्ये यश मिळेल. प्रेमसंबंधासाठी दिवस चांगला आहे, नातेसंबंधात सुसंवाद राहील. आज एखादा नवीन प्लॅन कराल, जो जोडीदाराला खुप आवडेल.

कुंभ
मानसिक ताण तर दूर होईल, पण पैसे गुंतविण्यासाठी योग्य वेळ नाही, नुकसान होऊ शकते, म्हणून सावधगिरी बाळगा. पैशाशी संबंधित प्रकरणात विशेष लक्ष द्या. कौटुंबिक जीवनात चढ-उतार राहील. एखाद्या गोष्टीवरून कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद होऊ शकतात. प्रत्येक आव्हानाचा सामना मोठ्या आत्मविश्वासाने करावा लागेल, ज्यामुळे व्यवसायात चांगले परिणाम मिळतील. आरोग्यात चढ-उतार होईल. म्हणून खाण्यापिण्याकडे लक्ष द्या. प्रेमसंबंधात रोमान्स भरपूर असेल.

मीन
आज व्यवसायातून चांगला फायदा होईल. बुद्धी पूर्ण साथ देईल, म्हणून नोकरीत आज अधिकाराने आणि सामर्थ्याने काम कराल. बॉस तुमच्या कामामुळे प्रभावित होईल. खर्च कमी होईल आणि आर्थिक स्थिती चांगली होईल. कौटुंबिक मालमत्तेत एखादा फायदा होऊ शकतो. मित्रांसमवेतही वेळ घालवाल. त्यांच्याबरोबर कुठेतरी फिरायला जाण्याची संधी मिळेल. प्रेमसंबंधात आनंद राहील.