12 मे राशीफळ : आज सिंह आणि धनु राशीत होणार धनयोग, इतरांसाठी असा आहे बुधवार

मेष
संमिश्र परिणाम मिळतील. घरातील एखाद्या सदस्याच्या एखाद्या गोष्टीमुळे दुखी होऊ शकता. प्रेयसी किंवा जोडीदार आज असं काही बोलेल, ज्यामुळे मन दुखी होईल. परंतु व्यवसायाच्या प्रगतीमुळे मन आनंदी होईल. नोकरीत थोडे कठोर व्हा. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाचा मार्ग खुला होईल. संततीची प्रगती होईल.

वृषभ
काही निर्णय महत्वाचे ठरतील. घरातील एखाद्या सदस्याच्या भविष्यासंबंधी मोठा निर्णय घ्याल, ज्येष्ठांचा सल्ला घ्या. दाम्पत्य जीवन आनंदी राहील. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. रखडलेली कामे पूर्ण होतील. सामाजिक क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. मित्रांच्या संख्येत वाढ होईल. शेजारी मदतीसाठी पुढे येतील.

मिथुन
दिवस उत्तम फलदायक आहे. नोकरीत प्रमोशन मिळू शकते, अधिकार्‍यांना खुश ठेवा. समाजात मानसन्मान वाढेल. महत्वाच्या कामासाठी खर्च कराल. खरेदीसाठी कुटुंबासोबत बाहेर जाल. परदेशाशी व्यापारात शुभवार्ता समजेल. सायंकाळी आई-वडीलांची सेवा कराल.

कर्क
संमिश्र दिवस आहे. थोडे अस्वस्थ रहाल, कामात मन लागणार नाही. निराश होऊ नका. प्रेमसंबंधात नवीन उर्जा मिळेल. घरात एखाद्या सदस्याची तब्येत बिघडली तर ताबडतोब डॉक्टरांकडे जा. दुपारी एक नवी उर्जा जाणवले. सर्व रखडलेली कामे पूर्ण कराल. विवाहाचे चांगले प्रस्ताव येतील.

सिंह
सन्मान मिळेल. सासरच्या बाजूने सुद्धा सन्मान होईल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. रखडलेले सरकारी काम पूर्ण होईल. संततीच्या भविष्याचा निर्णय घ्याल. संपत्तीत गुंतवणुकीसाठी दिवस उत्तम आहे. विद्यार्थ्यांना गुरुंचा आशीर्वाद मिळेल. सासरकडील व्यक्तीला उधार देणे टाळा.

कन्या
दिवस अनुकूल आहे. मूड चांगला राहील. कर्ज सहजपणे मिळेल. व्यापारासाठी प्रवास करू शकता. संततीच्या विवाहातील अडचणी दूर होतील. चांगल्या संधी मिळतील. नवीन संपत्तीच्या खरेदीसाठी दिवस चांगला. नोकरीतील प्रगती पाहून तुमच्या शत्रुंची जळजळ होईल, परंतु ते काहीही करू शकणार नाहीत.

तुळ
कामासाठी दिवस अनुकूल आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळेल. सासरच्या बाजूने धनलाभ होऊ शकतो. आईशी वाद होऊ शकतो. व्यवसायात कोणताही व्यवहार करताना कागदपत्र तपासा. वडीलांच्या सल्ल्याची गरज भासेल. भाऊ-बहिणीचे सहकार्य मिळेल. जोडीदारासाठी भेटवस्तू खरेदी कराल. मंगलकार्यात सहभागी व्हाल.

वृश्चिक
सांभाळून वाटचाल करा, कारण आज सकाळीपासून तुमचे काम बिघडवण्याचा प्रयत्न होईल. एखादे काम विचाराच्या विरूद्ध होऊ शकते. ज्या व्यक्तीवर विश्वास ठेवत आहात तो फसवू शकतो. परदेशात व्यापार करणार्‍यांना शुभवार्ता समजेल. संततीचे चांगले काम पाहून आनंद होईल. उत्पन्न आणि खर्चात संतुलन ठेवा.

धनु
दिवस अडचणींचा आहे. काही कामे बिघडल्याने निराशा वाढेल. विनाकारण भीतीने मन अशांत राहील. कोणत्याही कामात विचारपूर्वक पैसे गुंतवा. नोकरीत तणाव जाणवेल, रागावर नियंत्रण ठेवणे अशक्य होईल. अधिकारी नाराज होतील. व्यापारात लाभाची संधी मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल.

मकर
संमिश्र परिणामांचा दिवस आहे. माहिती घ्याल ज्यामुळे बौद्धिक क्षमता वाढेल. मोठा लाभ होऊ शकतो. राजकारणात सहभाग घ्याल. भाऊ किंवा बहिणीच्या विवाहातील अडचणी दूर होतील.

कुंभ
प्रगतीचे नवे मार्ग खुले होतील. व्यापारात एखादी डील पूर्ण होईल. आईच्या तब्येतीत घसरण होऊ शकते. कुटुंबात वाद होऊ शकतो. कार्यक्षेत्रात चिंता वाढू शकते. सामाजिक कार्यात भाग घ्याल. पैसे खर्च कराल. कुटुंबातील छोट्यांसोबत मजामस्ती कराल.

मीन
दिवस ठोस फलदायक आहे. संततीला स्पर्धेत सहभागी करण्यासाठी धावपळ कराल. यामुळे सायंकाळी थकवा जाणवेल. पण महत्वाची कामे पूर्ण करावी लागतील, अन्यथा ती अर्धवट राहतील. व्यापारात वरिष्ठांचा सल्ला घ्याल, जो उत्तम ठरेल. सायंकाळी मित्रांसोबत मजामस्ती कराल.