24 एप्रिल राशीफळ : ‘या’ 3 राशींनी रहावे सावध ! होऊ शकते मोठे नुकसान, इतरांसाठी असा आहे शनिवार

मेष
आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र परिणांचा आहे. मन सरळ, सात्विक काम सोडून परिवर्तनाकडे आकर्षित होईल. संततीबाबत निराशाजनक बातमी समजू शकते. सायंकाळी रखडलेले काम मार्गी लागेल. व्यवसायिक सहकारी तुमचा सल्ला आणि मार्गदर्शन घेतील. सन्मान वाढेल. कौटुंबिक संपत्तीत वाढ होईल. वडीलांच्या आरोग्याबाबत सतर्क रहावे लागेल, त्यांच्या आरोग्यात घसरण होऊ शकते.

वृषभ
आजचा दिवस संमिश्र आहे. राजकीयदृष्ट्या केलेले प्रयत्न यशस्वी होतील. लोकांचे समर्थन मिळेल. शासन आणि सत्तेचा भरपूर लाभ मिळेल. सरकार योजनेचा लाभ मिळेल. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा. आर्थिक स्थिती चांगली होईल. उत्पन्नाचे स्त्रोत वाढतील. अचानक काही काम आल्याने दिनचर्येत बदल होईल. व्यस्तता असूनही प्रेमसंबंधासाठी वेळ काढाल. यामुळे जोडीदार आनंदी दिसेल. शिक्षणातील अडचणी दूर होतील, उच्च शिक्षणाचा मार्ग प्रशस्त होईल.

मिथुन
आजचा दिवस व्यापारात प्रगतीचा आहे. जर कार्यक्षेत्रात अधिकार्‍यांशी वाद सुरू असतील तर त्यामध्ये सुधारणा होईल. संततीला शिक्षणात किंवा स्पर्धेत यश मिळाल्याने आनंद होईल. सायंकाळ कुटुंबातील लहान मुलांसोबत खेळण्यात घालवाल. कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सर्व प्रयत्न कराल. काही खरेदी करू शकता. पण खिशाकडे लक्ष ठेवा. जर एखाद्या प्रवासाला जायचे असेल तर विचारपूर्वक जा कारण एखादी मौल्यवान वस्तू हरवण्याची भिती आहे.

कर्क
आजचा दिवस संमिश्र आहे. सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. कक्षा रूंदावेल. आई-वडीलांच्या सहकार्याने कौटुंबिक उद्योगाच्या समस्या सुटतील, ज्यामुळे लाभ होईल. सायंकाळी प्रिय व्यक्तींच्या भेटीगाठी होतील आणि एखादी शुभवार्ता समजेल. जर एखादी संपत्ती खरेदी करण्याची इच्छा असेल तर दिवस उत्तम आहे. उपजिविकेच्या क्षेत्रात प्रगती होईल. मोठ्या कालावधीपासून काही कामे अडकलेली असतील तर ती आज आवश्य पूर्ण करा.

सिंह
आजचा दिवस संमिश्र परिणामांचा आहे. कार्यक्षेत्रात कामाने लोक प्रभावित होतील. लाभ होईल, परंतु शत्रुसुद्धा उत्पन्न होतील. व्यापार्‍यांना लाभ मिळेल. आर्थिकस्थितीमध्ये सुधारणा होईल आणि पैसा वाढेल. व्यापार्‍यांना जास्त व्यस्तता असेल. यामुळे कुटुंबाकडे कमी लक्ष द्याल. यामुळे जोडीदार नाराज होऊ शकतो. सायंकाळचा वेळ आनंद आणि मनोरंजनात घालवाल. विद्यार्थ्यांना यश मिळेल.

कन्या
आजचा दिवस उत्तम यशदायक आहे. कायद्याच्या संबंधित प्रकरणात विजय मिळू शकतो. प्रॉपर्टीत वाढ होऊ शकते. कार्यक्षेत्रात सुरू असलेल्या प्रयत्नांना यश मिळेल आणि नोकरीत प्रमोशन मिळू शकते. रोजगार व व्यापारात यश मिळेल. सायंकाळी मित्रासमवेत एखाद्या धार्मिकस्थळी जाऊ शकता. सासरच्या बाजूने सन्मान मिळेल. एखादा रोग त्रस्त करत होता तर त्यामध्ये आता आराम मिळेल.

तुळ
आजचा दिवस शांततेचा आहे. घरात शांतता राहील. शुभ समाचार समजल्याने घरातील आनंदात वाढ होईल. कार्यक्षेत्रातील समस्या संपतील. नाती मजबूत होतील. प्रेमसंबंधात नवा उत्साह आणि आशा अनुभवाल. परदेशी संस्थेसोबत भागीदारीसाठी चांगला काळ आहे. रखडलेली कामे पूर्ण होतील. यातून धनप्राप्ती होईल. भरपूर प्रमाणात हातात पैसा येऊ शकतो. भावांच्या मदतीने कार्यक्षेत्रातील समस्या संपतील.

वृश्चिक
आजचा दिवस सामान्य आहे. व्यापारात काही योजना यशस्वी होऊ शकतात, ज्यामुळे लाभ होईल. संततीची प्रगती झाल्याने मन आनंदी होईल. आरोग्यात घसरण होऊ शकते, यासाठी थोडा त्रास झाला तरी ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. सरकारी नोकरीत कामाकडे लक्ष द्यावे लागेल, अन्यथा शत्रु वरिष्ठांचे कान भरतील. सायंकाळी देवदर्शनात व्यस्त रहाल. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. वडीलांचा सल्ला बिझनेससाठी उपयोगी ठरेल.

धनु
आजचा दिवस रोजगाराचा शोध घेणार्‍यांना नवीन संधी देईल. यामुळे भविष्याची चिंता कमी होईल. परदेशात राहणार्‍या नातेवाईकांकडून शुभवार्ता मिळू शकते. सासरच्या पक्षाकडून एखाद्या व्यक्तीने पैसे उधार घेतले असतील तर ते आज परत मिळतील. सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. ऑफिसच्या कामात सुधारणा होईल आणि अधिकार्‍यांशी संबंध मधुर होतील, याचा भविष्यात लाभ होईल. कार्यक्षेत्रात प्रोजेक्ट पूर्ण कराल, जे पाहून विरोधक सुद्धा प्रशंसा करतील, परंतु काही नवीन शत्रु निर्माण होतील.

मकर
आजचा दिवस ठोस परिणामांचा आहे. कौटुंबिक आणि आर्थिक प्रकरणांमध्ये सुरू असलेल्या समस्या सुटतील. व्यापारात आज एखादा मोठा लाभ मिळू शकतो. आई-वडीलांच्या प्रकृतीकडे लक्ष द्या. घरी पाहुण्यांचे आगमन होईल, यामध्ये कुटुंबातील सदस्य व्यस्त राहतील. सायंकाळ कुटुंबासोबत घालवाल. ज्यामुळे मानसिक शांतता लाभेल. सासरच्या बाजूकडून धनलाभ होईल. मोठ्या कालावधीपासून अडकलेले काम आज पूर्ण केल्याने मार्गी लागेल. जोडदार एखादी भेटवस्तू देऊ शकतो. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा होईल.

कुंभ
आजचा दिवस संमिश्र आहे. प्रेमसंबंधात काही मानसिक तणाव असू शकतो. कार्यक्षेत्रात मेहनत आणि धैर्याने सर्व समस्यांमधून मुक्त होऊ शकता. उपजिविकेच्या क्षेत्रात काम करत असलेल्या लोकांना यश मिळेल. बहिण किंवा भावाच्या विवाहाचा प्रस्ताव प्रबळ होईल. संततीला तुमच्या सल्ल्याप्रमाणे काम करताना पाहून आनंद होईल. विपरीत स्थितीत निर्णय घेण्याच्या क्षमतेचा विकास होईल. परंतु रागावर आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल. अन्यथा वाद होऊ शकतो.

मीन
आजचा दिवस उत्तम लाभाचा आहे. दाम्पत्य जीवनात काही अडथळे असतील तर ते संपतील. जोडीदाराला शॉपिंगसाठी घेऊन जाऊ शकता. एखाद्या व्यवसायात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर अजून थोडा काळ वाट पहा. भागीदारी व्यापार केला असेल तर लाभ मिळेल. सायंकाळी धार्मिक क्षेत्राला भेट द्याल. इतर कामांवर खर्च होईल. कार्यक्षेत्रात सहाकार्य आणि समर्थन मिळाल्याने आव्हानांचा सहज सामना कराल. प्रवासासाठी दिवस उत्तम आहे.