27 फेब्रुवारी राशिफळ : माघ पौर्णिमेला होणार ‘या’ 6 राशींना मोठा फायदा, नोकरी-व्यापाराला येईल वेग

मेष
आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. आज संततीकडून एखादी निराशाजनक बातमी ऐकायला मिळेल. ज्यामुळे मन दुखावले जाईल. आज जीवनात एक नवीन कला शिकावी लागेल, ज्याला कटुतेमध्ये गोडवा आणण्याची कला सुद्धा म्हणतात. असे केले नाही तर मन दु:खी होऊ शकते. कालचे एखादे रखडलेले कामे पूर्ण होईल. आज रात्री कुटुंबासमवेत आनंदाने वेळ घालवाल. विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी अधिक वेगाने करावी लागेल, तरच यश मिळेल. कौटुंबिक व्यवसायात वडील सल्ला देतील, जो लाभदायक ठरेल.

वृषभ
संततीच्या भवितव्याबद्दल काळजीत असाल तर आज दिलासा मिळू शकेल. राजकारणात केलेल्या प्रयत्नांमध्ये यश मिळेल. कौटुंबिक व्यवसायात वडिलांचे पूर्ण सहकार्य मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी मनात काही नवीन कल्पना येतील. रात्री काही नावडत्या लोकांना भेटल्यामुळे अनावश्यक त्रास होऊ शकतो.

मिथुन
आजचा दिवस संमिश्र आहे. एखादी मौल्यवान वस्तू हरविण्याची किंवा चोरी होण्याची भीती राहील. आज संध्याकाळी एखादे रखडलेले काम पूर्ण होऊ शकते, ज्यामुळे मन उत्साही होईल. रात्री कुटुंबातील सदस्यांसह एखाद्या धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित राहू शकता. व्यवसायात जास्त मेहनत करावी लागेल. व्यस्त असूनही प्रेमासाठी वेळ काढाल.

कर्क
आजचा दिवस कार्यक्षेत्रासाठी उत्तम फलदायी आहे. कामाच्या ठिकाणी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायासाठी दिवस शुभ आहे. मेहनतीनुसार फळ मिळेल. संततीची जबाबदारी पार पाडाल. घरातून काम करत असाल तरी दिवस उत्तम राहिल. मान, पद आणि प्रतिष्ठा वाढेल. कदाचित एखाद्या प्रवासाला जाऊ शकता. जो फायदेशीर ठरेल. रात्रीचा वेळ मित्रांसह मजेत घालवाल.

सिंह
आज बोलण्यातील सौम्यता सन्मान मिळवून देईल, ज्यामुळे मन आनंदित होईल. आज जास्त धावपळ होईल, ज्यामुळे नेत्र विकार होण्याची होण्याची शक्यता आहे. शत्रू अडचणीत आणण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करेल, पण तो स्वतःच पराभूत होईल, म्हणून चिंता करण्याची गरज नाही. परंतु, कोणाबद्दलही चुकीचे विचार ठेवू नका. प्रेमसंबंधात एखादी भेटवस्तू मिळू शकते.

कन्या
जर एखादे कायदेशीर वाद सुरू असेल तर दुपारनंतर एक वेगळे वळण मिळू शकते, म्हणजे काम होऊ शकते. व्यवसायात सुरू असलेल्या प्रयत्नांमुळे आज अल्पकालीन यश मिळेल. संतती त्यांच्या भविष्यासाठी प्रयत्न करीत असलेले पाहून मन आनंदी होईल. घरात एखादी शुभ घटना घडू शकते, ज्यामध्ये खर्च देखील होईल आणि मानसुद्धा वाढेल. आईकडूनही प्रेम आणि आशीर्वाद मिळेल.

तुळ
आज आजूबाजूला आनंददायी वातावरण असेल. घरात एखादी पार्टी आयोजित केल्याने कुटुंबातील सदस्यांचा आनंद वाढेल. अनेक दिवसांपासून एखाद्या व्यवहाराची समस्या उद्भवली असेल तर ती आज दूर होईल. हातात पुरेसे पैसे येऊ शकतात, ज्यामुळे मन आनंदित होईल. आज प्रवासाचा प्रबळ योग आहे. प्रेम संबंधांमध्ये सुखद अनुभव जाणवेल.

वृश्चिक
आजचा दिवस आरोग्यासाठी कमजोर आहे. आरोग्याबाबत मुळीच निष्काळजीपण करू नका. कारण वायू, लघवी, रक्त इत्यादींशी संबंधित समस्या त्रास देऊ शकतात, असे झाले तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. काळजी घ्या. नंतर आपल्या आरोग्यात सुधारणा होईल. कुटुंबात संतुलन राखल्यास वेळ आनंदात जाईल. संध्याकाळपर्यंत एखादी शुभ बातमी मिळण्याचा चांगला योग आहे. कार्यक्षेत्रात शत्रू त्रास देण्याचा प्रयत्न करतील, परंतु घाबरण्याचे कारण नाही, ते नुकसान करू शकणार नाहीत.

धनु
सासरच्या बाजूकडूनसुद्धा धनप्राप्तीचे योग आहेत, ज्यामुळे मन आनंदित होईल. व्यवसाय करत असाल तर लाभाचा योग आहे, परंतु लक्षात ठेवा की कुणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवल्यास नुकसान होऊ शकते. सावधगिरी बाळगा. संध्याकाळपासून रात्रीपर्यंत सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेण्याची संधी मिळेल. वैवाहिक जीवनात आनंददायी भावना राहील. कामात महिला मित्राकडून सहकार्य मिळेल.

मकर
आज कोणत्याही वाद-विवादात अडकणे टाळा, कारण नुकसान होऊ शकते. कौटुंबिक आणि आर्थिक बाबतीत यश मिळेल. रोजगाराच्या क्षेत्रात सुरू असलेले प्रयत्न फलदायी ठरतील. व्यवसायात लाभाच्या नवीन संधी मिळतील. कौटुंबिक व्यवसायात यश मिळेल, कार्यक्षेत्रात जास्त मेहनत केल्याने यश मिळण्याचे भरपूर योग आहेत.

कुंभ
एखादी बातमी ऐकून कमी अंतराच्या प्रवासाला जावे लागू शकते, म्हणून सावधगिरी बाळगावी लागेल. कोणत्याही प्रकारच्या भांडणात अडकू नका. बोलण्यातील सौम्यपण मोठ-मोठ्या समस्या एका क्षणात संपवू शकतो. जोडीदाराचे आरोग्य बिघडू शकते. संध्याकाळी अनावश्यक धावपळ होऊ शकते, ज्यामध्ये पैसे देखील खर्च होऊ शकतात. याचा परिणाम आगामी काळात आर्थिक स्थितीवर होऊ शकतो.

मीन
आजचा दिवस मध्यस्थी आणेल. मुलगा किंवा मुलीची चिंता राहील किंवा त्यांच्या कामातच दिवस व्यतीत राहील. वैवाहिक जीवनात वाद सुरू असल्यास तोही आज संपेल. धार्मिक क्षेत्राचा प्रवास आणि पुण्यकार्य केल्याने पैसे खर्च होऊ शकतात, सावधगिरी बाळगा. आज काही खर्च इच्छा नसतानाही करावे लागतील, ज्यामुळे आर्थिक स्थिती कमजोर होऊ शकते, म्हणून सावधगिरी बाळगा.