4 जानेवारी राशिफळ : कर्क राशीवाल्यांचे ‘खर्च’ वाढतील, धनु राशीला होईल ‘धनलाभ’, इतरासांठी ‘असा’ आहे सोमवार

मेष
ग्रहांची स्थिती सांगते की, आज तुम्ही आपले प्रेमसंबंध एन्जॉय कराल. प्रिय व्यक्तीशी जवळीक वाढेल आणि आपण त्यांना आपल्या भविष्यातील योजना सांगाल. कामात आर्थिक स्थिती मजबूत होईल. एखादी महत्वकांक्षा पूर्ण होईल, जी आनंद देईल. आज एखाद्या गोष्टीवर ठाम राहून पुढे जाल. वैयक्तिक जीवन सुखी राहील. तुम्हाला राग येऊ शकतो, त्याचा तुमच्यावर परिणाम होऊ शकतो, म्हणून सावधगिरी बाळगा. खाण्यापिण्याकडे लक्ष द्या. आरोग्य कमजोर होऊ शकते.

वृषभ
आज घरगुती कामात जास्त व्यस्त राहाल. कुटुंबासमवेत जास्तीत जास्त वेळ घालवाल, परंतु मानसिक तणावातून मुक्त व्हाल. मनात समाधान आणि आनंदाची भावना असेल. कुटुंबातील सदस्यांसह मंदिरात जाऊ शकता. हलके वाटेल. कामात मेहनत यशस्वी होईल. आरोग्य चांगले राहील. पैशांच्या गुंतवणूकीसाठी दिवस अनुकूल नाही. ते टाळण्याचा प्रयत्न करा. मित्रांसह मजा देखील करू शकता. वैयक्तिक जीवन समाधानी राहील.

मिथुन
ग्रहांची स्थिती सांगते की, आज खूप आत्मविश्वास राहील, यामुळे व्यवसायाला योग्य गती देण्यात यशस्वी व्हाल. चांगला फायदा मिळू शकतो. सरकारकडून एखादा फायदा मिळण्याची शक्यता आहे. आरोग्य चांगले राहील. वैवाहिक जीवनात काहीतरी चांगले करण्याचा प्रयत्न कराल, जोडीदाराच्या आवडीची एखादी डिश बनवू शकता. खर्च होईल.

कर्क
आजचा दिवस चढ-उतारांनी भरलेला आहे. खर्च जास्त होईल. उत्पन्न सामान्य राहील, खर्चाचे ओझे जास्त होणार नाही याची काळजी घ्या. वैवाहिक जीवनात आनंदी व्हाल, जोडीदार पाठींबा देईल. एखादी मदत करण्याचा प्रयत्न देखील करेल. प्रेमसंबंधात अडचणी येतील. प्रिय व्यक्तीशी असलेले नाते बिघडू शकते. हा काळ नातेसंबंधासाठी असुरक्षित आहे. सावधगिरी बाळगा, संबंध तुटू शकतात. आरोग्यात चढ-उतार होईल. कामासाठी दिवस अत्यंत मजबूत आहे. कार्यक्षमतेचा फायदा घ्याल.

सिंह
ग्रह आज तुमच्या बाजूने आहेत. धैर्य वाढेल. दिनमान व्यवसायासाठी खूप अनुकूल आहे. यशस्वी व्हाल. नफा मिळण्याची शक्यता आहे. कामांना गती मिळाल्याने आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. विवाहित लोक जीवनात समाधानी राहतील. जोडीदारासाठी मनापासून काहीतरी करण्याचा प्रयत्न कराल. प्रेमसंबंधासाठी काळ आनंदाचा आहे. प्रिय व्यक्तीशी जवळीक वाढेल. कामात अधिक प्रयत्न करावे लागतील. तरच यश मिळेल. कोणाशीही संबंध बिघडणार नाहीत, याची काळजी घ्या.

कन्या
आज ग्रहांची स्थिती दर्शवते की, गुंतवणूक करण्यासाठी चांगला दिवस आहे, परंतु विचारपूर्वक करा. खर्च होईल. उत्पन्न जास्त होणार नाही, म्हणून सावधगिरी बाळगा. एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या सांगण्यावरून पैसे गुंतवू नका. कामात मेहनत दिसून येईल, चांगले परिणाम मिळतील. वैवाहिक जीवनात आनंद राहील. जोडीदारासोबत जवळीक असल्याचा अनुभव मिळेल. संतती संबंधी एखादी चांगली बातमी आज मिळू शकते. प्रेमसंबंधात खूप आनंदी दिसाल.

तुळ
आजचा दिवस चांगला आहे, कारण उत्पन्न वाढेल. जुन्या इच्छा देखील पूर्ण होतील आणि मोठ्या कालावधीपासून जे काम करण्याचा विचार करत होतात ते आज पूर्ण होऊ शकते. ज्यामुळे आनंदी होईल. आरोग्य चांगले राहील, परंतु खाण्यापिण्याकडे लक्ष द्या. पोटाची समस्या होऊ शकते. वैवाहिक जीवनात थोडा ताण असेल. जोडीदार रागावू शकतो आणि काहीतरी चुकीचे बोलू शकतो. सावधगिरी बाळगा. प्रेमसंबंधात आज खुप क्रिएटिव्ह राहाल आणि प्रिय व्यक्तीसाठी काहीतरी चांगले करण्याचा प्रयत्न कराल.

वृश्चिक
आजचा दिवस चांगला आहे. मनात एखाद्या गोष्टीचा आनंद असेल. कामावर पूर्ण लक्ष द्याल. ज्यामुळे चांगले परिणाम मिळतील. नोकरीत कामावर ठाम राहाल. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. दिवस आर्थिकदृष्ट्या मजबूत आहे. खर्च कमी होईल. विरोधकांवर मात कराल. आळशीपणापासून दूर रहा, यामुळे नुकसान होऊ शकते. वैयक्तिक जीवनात आनंद राहील.

धनु
आजचा दिवस चांगला आहे. भाग्याच्या कृपेने अचानक एखादे बिघडलेले काम पूर्ण होईल, ज्यात धनलाभ होऊ शकतो. यामुळे मोठा आनंद होईल. स्वभावात चढउतार होईल. कधी आनंद तर कधी राग दिसेल. हे टाळण्याचा प्रयत्न करा कारण यामुळे वैवाहिक जीवनात तणाव वाढू शकतो. कौटुंबिक जीवनात आनंद राहील. कुटुंबात एखाद्या मोठ्या फंक्शनची तयारी होऊ शकते. कौटुंबिक जीवन सामान्य असेल. प्रेमसंबंधात अडचणी येऊ शकतात.

मकर
आज थोडी काळजी घ्या, कारण ग्रहांचे गोचर अनुकूल नाही. मानसिक ताण उच्च असेल. जो योग्य दिशेने विचार करण्यास प्रतिबंधित करेल. आज कुठेही पैशांची गुंतवणूक करणे टाळा, कारण यामुळे नुकसान होऊ शकते आणि अनोळखी व्यक्तीच्या सांगण्यावरून कोणालाही पैसे देऊ नका. वैवाहिक जीवनात खूप आनंदी राहाल. जोडीदाराचे प्रेम आपल्याला आवडेल. प्रेमसंबंधात निरंकुशतेची भावना अनुभवाल. प्रिय व्यक्तीला खुप काही करण्याचे अश्वासन द्याल. त्यांना भेटण्यात वेळ घालवाल. खर्च वाढेल. रिअल इस्टेटशी संबंधित यश मिळेल.

file photo

कुंभ
आज ग्रहांची स्थिती साथ देईल, ज्यामुळे खर्च कमी होतील. व्यवसाय यशस्वी होईल आणि चांगला लाभ मिळेल. कामात बॉसशी चांगले जुळेल, ते तुम्हाला एखादी आर्थिक मदत सुद्धा करतील. घरातील वातावरण थोडे अशांत होऊ शकते. वैवाहिक जीवनात आनंद राहील. मनाला शांती मिळेल. प्रेमसंबंधात नात्यात रोमान्स पहायला मिळेल.

मीन
आजचा दिवस मध्यम फलदायक आहे. कोणताही खर्च असा करू नका, जो त्रासदायक ठरेल. उत्पन्न खूप सामान्य असेल. नोकरदार लोकांनी कामाच्या ठिकाणी भांडण टाळावे. कारण स्थिती आपल्यासाठी अनुकूल नाही. वैवाहिक जीवन प्रेमाने परिपूर्ण असेल. प्रेमसंबंधात तणाव असू शकते. प्रिय व्यक्तीला समजविण्याचा प्रयत्न करा. त्यांचा राग शांत करण्याचा प्रयत्न करा. आरोग्य अनुकूल राहील.