2 जानेवारी राशिफळ : शनिवारी कर्क राशीत असतील शनीदेव, ‘या’ 6 राशींचा होईल फायदा

मेष
आजचा दिवस अनुकूल आहे. प्रेमसंबंध सजवण्याचे आणि सावरण्याचे पूर्ण प्रयत्न कराल. आपला रोमँटिक दृष्टीकोन आणि सर्जनशीलता प्रेम जीवनात उपयोगी येईल. प्रयत्न यशस्वी होईल. विवाहित व्यक्तींचे जीवन आनंदी असेल. जोडीदारासोबत जवळीक राहील. संततीबाबत विचार करून आनंद होईल. कौटुंबिक वातावरण अंतर्गत आनंद आणि सामर्थ्य देईल. कामात चांगले परिणाम मिळतील. कामात यश मिळेल, कारण भाग्य मजबूत असेल.

वृषभ
आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. कुटुंबाच्या जबाबदार्‍या व्यवस्थित पार पाडाल. घरगुती खर्च देखील कराल. याचा परिणाम उत्पन्नावर होईल, पण सुखी व्हाल. कुटुंबात आपुलकी आणि प्रेम दिसेल. कामात दिवस व्यस्ततेने भरलेला असेल. परंतु चांगले परिणाम मिळतील. मेहनतीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. व्यापारी वर्गाला मेहनतीचे फळ मिळेल. प्रेमसंबंधात काहीशा निराशेचा सामना करावा लागू शकतो. आरोग्य अनुकूल राहील. विवाहित लोक जीवनात समाधानी असतील.

मिथुन
आजचा दिवस अनुकूल आहे. कुटुंबासमवेत जास्त वेळ घालवाल. विशेषत: भावंडांसमवेत बसून त्यांचे प्रश्न जाणून घ्याल. तुमचे आपसातील नाते दृढ होईल. नातेवाईक आणि शेजार्‍यांशी संवाद साधण्याची संधी मिळू शकते. आपली एखादी क्रिएटिव्हिटी बाहेर आणाल. उत्पन्नाच्या बाबतीत आजचा दिवस चांगला आहे. खर्चही होईल, पण जास्त होणार नाही. आरोग्य मजबूत होईल. नोकरदार लोकांनी विरोधकांपासून सावध राहावे. व्यवसायासाठी दिवस चांगला आहे.

कर्क
आजचा दिवस चांगले परिणाम घेऊन येईल. कुटुंबासोबत एक अतूट बंध आणि शक्तीची भावना अनुभवाल. कामात चांगले परिणाम मिळतील. कौतुक होईल आणि कामाचा भार वाढेल. बॉस कार्यक्षमतेवर प्रभावित होईल. व्यापारी वर्गाला चांगले परिणाम मिळतील. आरोग्यही चांगले राहील. उत्तम भोजनाचा आनंद घ्याल. घरगुती जीवनात आव्हाने असतील. प्रेमसंबंधात रोमान्स असेल आणि एकमेकांच्या जवळ राहाल.

सिंह
आजचा दिवस अनुकूल आहे. आत्मसन्मान वाढेल, ज्यामुळे कामात यशस्वी व्हाल. कामात उत्कृष्ट परिणाम प्राप्त होतील. कामाचा आनंद घ्याल आणि पुढे जाल. काम पूर्ण कराल. भाग्याची साथ मिळेल. कोणत्याही आव्हानाला घाबरणार नाही आणि मेहनत कराल. विरोधकांवर मात कराल. व्यवसायासाठी दिवस चांगला आहे. कौटुंबिक जीवनात आनंद असेल. जोडीदाराचे मन समजून घ्याल. प्रेमसंबंधात प्रिय व्यक्तीकडून काही समस्या असू शकतात.

कन्या
आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. खर्च वाढेल. मानसिक चिंता वाढतील. आरोग्य देखील बिघडू शकते, म्हणून स्वत:कडे संपूर्ण लक्ष द्या. कामात अशी काही स्थितीचा सामना करावा लागेल की वाटेल, सध्याची नोकरी बदलली पाहिजे. व्यवसायासाठी दिवस चांगला आहे. चांगला नफा मिळू शकतो. सासरच्या लोकांकडून चांगले परिणाम मिळतील. घरगुती जीवनात प्रेम कायम राहील. प्रेमसंबंधात प्रिय व्यक्तींच्या काही समस्या सोडवताना दिसाल.

तुळ
आजचा दिवस चांगला आहे, उत्पन्नही वाढेल. उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न कराल. कौटुंबिक वातावरण समस्याजनक असू शकते. यासाठी गंभीरपणे विचार केला पाहिजे. वैवाहिक जीवनात आनंद मिळेल. प्रेमसंबंधात चांगले परिणाम मिळतील. नोकरीसाठी दिवस चांगला आहे. कामात चांगले परिणाम मिळतील. व्यवसायात मोठे यश मिळेल.

वृश्चिक
आजचा दिवस मध्यम आहे. कामाकडे अधिक लक्ष द्याल. कारण काही काळापासून त्यामध्ये काही उणीवा दिसून येत आहेत, आता त्यावर मात करण्याचा प्रयत्न कराल. त्याचा परिणाम देखील दिसेल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. लोकांचे सहकार्य मिळेल. एखाद्या शेजार्‍याशी वाद होऊ शकतो. वैवाहिक जीवनात प्रेम आणि आनंद कायम राहील. नाते मधुर होईल. प्रेमसंबंधात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. एखाद्या जुन्या मित्राशी मनापासून चर्चा कराल. आरोग्यामध्ये सुधारणा झाल्याने मनही सुखी होईल.

धनु
आजचा दिवस पूर्ण उत्साहाने घालवाल. भविष्याबद्दल काही प्लॅनिंग कराल. घरातील वडीलधार्‍यांचा सल्ला घ्याल. त्यांच्या आशीर्वादाने तुमची काही काम होतील. नोकरीत काही प्रमाणात नैराश्याचा सामना करावा लागू शकतो. व्यवसायासाठी आजचा दिवस चांगला आहे. एखादा नवीन युक्तीचा वापर कराल, ज्यातून फायदा होईल. वैवाहिक जीवन सामान्य राहील. प्रेमसंबंधात काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कौटुंबिक वाद उद्भवू शकतात, म्हणून सावधगिरी बाळगा.

मकर
आज खुप बिझी असाल. अशी अनेक कामे आहेत जी पूर्ण करायची आहेत, पण तुमच्याकडे वेळच नाही, यासाठी प्राधान्यक्रम ठरवावा लागेल. काही आव्हाने मानसिक त्रास देतील. काळजीत राहाल. खर्चात घट होईल, उत्पन्न चांगले होईल. कौटुंबिक आनंद मिळेल. वैवाहिक जीवनात प्रेम राहील. संतती सुखाची प्राप्ती होईल. प्रेमसंबंधात प्रिय व्यक्तीला मनातील गोष्टी सांगण्यात आनंद होईल. कुटुंबातसुखसोयींचा आनंद घ्याल. आरोग्य चांगले राहील. मानसिक ताण दूर करण्यासाठी आपल्या मित्र आणि कुटूंबासमवेत वेळ घालवाल.

कुंभ
आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. खर्च खुप वाढू शकतात, ज्यामुळे थोडा त्रास होईल. उत्पन्न सामान्य राहील. वैवाहिक जीवनात आनंद मिळेल. जोडीदाराची सर्जनशीलता पाहून खूप आनंद होईल. प्रेमसंबंधात काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. मित्राकडून काही मदत मिळू शकते. कामात चांगले परिणाम मिळतील. व्यवसायासाठी दिवस चांगला असेल.

मीन
आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. उत्पन्न खूप चांगले होईल. खर्चही खाली येईल, परंतु तरीही एखाद्या अज्ञात भीतीने ग्रस्त असाल. एखाद्या अनुचित गोष्टीची भीती वाटत राहील. मानसिक चिंता त्रास देऊ शकते. शारीरिक आरोग्य चांगले राहील. कामात चांगले परिणाम मिळतील. पण कामात खुश राहणार नाही. प्रेमसंबंधात प्रिय व्यक्तीची वागणे पाहून नात्याची चिंता वाटेल. घरगुती जीवन सामान्य राहील.