UP : स्काॅर्पिओवर ट्रक पलटून भीषण अपघात, 2 मुलांसह ८ ठार

पोलिसनामा ऑनलाइन – लग्नसमारंभ आटोपून परतत असलेल्या एका स्काॅर्पिओवर मालवाहतूक करणारा ट्रक पलटी झाल्याने ८ जणांचा मृत्यू झाला. तर, दोघांनी उड्या मारुन जीव वाचविला आहे. ही घटना उत्तर प्रदेशच्या कौशांबी येथे घडली. बुधवारी सकाळी मोठा अपघात झाला. दरम्यान, घटनास्थळी जिल्ह्याचे अधिकारी पोहोचले. या घटनेत दोन जण जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कौशिंबीच्या कडाधाम पोलीस ठाणे हद्दीत हा अपघात झाला. देवीगंज येथे लग्न समारंभ होता. हा समारंभ आटोपून एका स्काॅर्पिओमधून सहा-सात महिला आणि मुले घरी जात होती. ही कार देवीगंज चौकात उभी होती. तेव्हा अचानक एक मालवाहू ट्रक कारवर पलटी झाला. त्यामध्ये कार मधील सहा महिला आणि दोन मुलांचा मृत्यू झाला. स्काॅर्पिओमध्ये दहा जण बसलेले होते. कारवर ट्रक कोसळतअसल्याचं पाहून दोन मुलींनी कारमधून उडी मारली आणि आपले प्राण वाचले.

You might also like