भयंकर ! 5 वर्षापूर्वी नातेवाईकाला मारून भिंतीत गाडला होता मृतदेह, नाट्यमयरित्या झाला खुलासा

सूरत : पोलीसनामा ऑनलाइन  –   गुजरातच्या सूरत शहरात हत्येनंतर घरातच मृतदेह पुरण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही हत्या 5 वर्षापूर्वी झाली होती. याचा खुलासा तेव्हा झाला, जेव्हा या घराचा मालक राजू बिहारी अवैध दारू विकण्याच्या आरोपात जेलमध्ये गेला आणि पॅरोलवर सूटल्यानंतर पुन्हा हजर झाला नाही. त्याच्या शोधात पोलीस गुरूवारी त्याच्या घरी तपास करण्यासाठी पोहचले होते. शंका आल्याने भिंत फोडली असता आत एक मानवी सापळा सापडला.

असे आहे पूर्ण प्रकरण

सूरतच्या पांडेसरा परिसरात राहणार्‍या राजू बिहारीवर अवैध दारू विकण्याचे सुमारे 30 प्रकरणे दाखल आहेत. या प्रकरणात अनेकदा तो जेलमध्ये गेला आहे. सुमारे दिड महिन्यापूर्वी दारूच्या प्रकरणात राजूला भरूचच्या जेलमध्ये टाकण्यात आले होते. नुकताच तो पॅरोलवर बाहेर आला होता. परंतु, वेळेवर हजर झाला नाही. यानंतर पोलीस त्याचा शोध घेण्यासाठी घरी पोहचले. घराची तपासणी करताना पोलिसांची नजर भिंतीवर पडली. शंका आली असता भिंत फोडल्यावर आत मानवी सापळा सापडला. पोलिसांनी सापळा फॉरेन्सिक तपासासाठी पाठवला आहे.

कुटुंबाने नोंदवली होती किशनच्या बेपत्ता होण्याची तक्रार

पोलीस तपासात समजले की, सूरतच्या पांडेसरा परिसरात राहणारा राजू बिहारीच्या घरातून मिळालेला हा सापळा त्याच्या ओळखीचा आणि दूरचा नातेवाईक किशनचा आहे, जो पाच वर्षापूर्वी बेपत्ता झाला होता. मृत किशन सूरतचाच राहणारा आहे आणि कुटुंबाने सुद्धा याच दरम्यान बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. सापळ्याची ओळख याठिकाणी मिळालेल्या काही सामानामुळे झाली आहे. मात्र, राजूने त्यांची हत्या का केली होती, हे आता राजूच्या अटकेनंतरच समजणार आहे.

कुटुंबिय राजूसोबत राहात नाही

आरोपी राजू मुळचा बिहारचा राहाणारा आहे. परंतु, त्याच्यासोबत त्याचे आई-वडिल आणि इतर कुटुंबिय राहात नाहीत.