इंदापूरातील कृषी महोत्सवात घोडे बाजार अन् डॉग शो ठरणार आकर्षण, 8 जानेवारीपासुन सुरू

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन (सुधाकर बोराटे) – कृृृषि उत्पन्न बाजार समीती इंदापूर यांचे माध्यमातून इंदापूर येथिल अकलुज रोड लगत असलेले शिवलिला डाळींब मार्केट या ठीकाणी बुधवार दिनांक ०८ जानेवारी ते रविवार दिनांक १२ जानेवारी पर्यंत भव्य कृषि महोत्सव २०२० चे आयोजन करण्यात आले असुन यामध्ये भव्य कृृृषि प्रदर्शन,जनावरे प्रदर्शन, घोडे बाजार व डाॅग शो चे आयोजन करण्यात आले असल्याची माहीती इंदापूर कृृृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती अप्पासाहेब जगदाळे यांनी इंदापूर येथिल कृषि उत्पन्न बाजारसमिती कार्यालयात आयोजात पत्रकार परीषदेत बोलताना दीली.

कृृषि महोत्सव २०२० चे उदघाटन बुधवार दि. ८ जानेवारी रोजी दुपारी दीड वाजता, राज्याचे माजी महसुल मंत्री व भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे हस्ते होणार असुन राज्याचे माजी सहकारंत्री हर्षवर्धन पाटील हे अध्यक्षस्थानी असनार आहेत.तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील हे उपस्थित राहणार आहेत. सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यत कृृृृषि महोत्सव सुरू राहणार असुन पूणे जिल्ह्यात एकमेव इंदापूर या ठीकाणी भरत असलेला घोडे बाजार हा ८ जानेवारी ते २५ जानेवारीपर्यंत सुरू राहणार असल्याची माहीती अप्पासाहेब जगदाळे यांनी दीली.

या कृृषा प्रदर्शनाचे खास आकर्षण ठरणार आहे ते म्हणजे घोड्यांची चाल(रवाल),  नाचकाम स्पर्धा व डाॅग शो. तर एसी सीनेमा थियटर,  जातीवंत जनावरांचे प्रदर्शन, आधुनिक शेतीविषयी तंत्रज्ञान शेतीसाधणे, उपकरणे प्रदर्शन, इंदापूर तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांचा सास्कृृृृतीक कार्यक्रम (नृत्य)स्पर्धा, विविध प्रकारच्या गृहपयोगी वस्तुंचे प्रदर्शन व विक्री, मनोरंजनासाठी डीजणीलँड व पाळणे,  खवय्यांसाठी खाऊ गल्ली, पुरूष व मुलांसाठी निलेश पापत यांचा हसत खेळ चाले व मोनिका करदिंकर यांचा मुलींसाठी फुल टु धमाल व महिलांसाठी  खेळ पैठणीचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.तर बक्षीस वितरण व निरोप समारंभासाठी दि. १२ जानेवारी रोजी दुपारी दीड माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विजयसिंह मोहिते पाटील व हर्षवर्धन पाटील हे उपस्थित राहणार असुन, या महोत्सवास सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन इंदापूर कृृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती अप्पा साहेब जगदाळे, उपसभापती व आमदार यशवंत माने व सर्व संचालक मंडळ यांनी केले आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

मधुमेह असल्यास आहारामध्ये करा ‘या’ ४ पदार्थांचा समावेश
‘हे’ ७ उपाय केल्यास सतत येणारा थकवा जाईल पळून, जाणून घ्या
जेवण पॅक करण्यासाठी ‘फॉईल पेपर’ वापरता ? ‘हे’ ७ दुष्परिणाम जाणून घ्या
मासिक पाळीत स्वच्छता राखण्यासाठी ‘या’ ६ गोष्टी लक्षात ठेवा !
गूळ खाण्याने वाढते वजन, जास्त खाण्याचे ‘हे’ ६ तोटे जाणून घ्या
मातेच्या स्तनपानामुळे बाळांना होतात ‘हे’ ६ फायदे, जाणून घ्या
लवंग खाण्याचे ‘हे’ ६ आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहीत आहेत का ?