26 जानेवारीपासून मुंबई पोलिस दिसणार घोड्यावर !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – जुन्या काळामध्ये म्हणजे अगदी इंग्रजांच्या राजवटीमध्ये पोलीस गस्त घालण्यासाठी घोड्यांचा वापर करायचे. कालांतराने पोलिसांची ही अश्व सवारी बंद करून त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे चारचाकी देण्यात आल्या. मात्र आता एकेकाळी मुंबईची शान असलेले हे अश्वदल आता पुन्हा एकदा मुबईच्या रस्त्यांवरून फिरताना दिसणार आहे.

तब्बल 88 वर्षानंतर मुबंई पोलीस पुन्हा एकदा अश्वदल सक्रिय करणार आहेत. मुंबई पोलीस दलात येत्या 26 जानेवारीपासून अश्वदल पुन्हा कार्यरत केले जाणार आहे. मरोळ येथील पोलीस मैदानावर घोडेस्वाराचे प्रशिक्षण अन्य सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रविवारी दिली. या दलाकडे मोर्चे, आंदोलनाच्या बंदोबस्ताची जबाबदारी देखील सोपविली जाणार आहे. त्याचबरोबर रात्रगस्त व पेट्रोलिंग करण्याचे कामही या दलाकडून करुन घेण्यात येणार आहे.

असे असेल नवीन अश्वदल –
पोलिसांच्या अश्वदलामध्ये 30 घोडे असून प्रत्येकी एक फौजदार व सहाय्यक फौजदार असतील. तर 4 हवालदार व 32 कॉन्स्टेबलचा समावेश असणार आहे. फौजदाराकडून या दलाच्या समन्वयाची जबाबदारी सांभाळली जाणार आहे.

फेसबुक पेज लाईक करा –