दुर्दैवी ! आयकार्डच्या दोरीचा फास बसल्याने 7 वर्षाच्या मुलीचा मृत्यू

हाजीपूर : वृत्तसंस्था – खेळताना गळ्यातील आयकार्डच्या दोरीचा फास बसल्याने तिसरीत शिकणाऱ्या एका सात वर्षाच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृत मुलगी घरात खेळत असताना तिने बेडवर चढून खुंटीला अडकवलेले शाळेचे आयकार्ड गळ्यात घालण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान आयकार्डची दोरी गळ्यात अडकली आणि तिला फास बसला. यामध्ये तिचा मृत्यू झाला. ही घटना होशियारपूर जिल्ह्यातील हाजीपूर गावात रविवारी घडली असून घटना घडली त्यावेळी मुलगी घरात एकटीच होती.

जसमीत असे मृत्यू झालेल्या सात वर्षाच्या मुलीचे नाव आहे. ती तिच्या आजीजवळ रहात होती. तिचे वडील बलविंदरसिंग हे आपल्या कुटुंबासमवेत पठाणकोट येथे राहतात. बलविंदरसिंग हे सुतार काम करत असून त्यांना एक मुलगी आणि एक मुलगा आहे. जसमीतच्या आजीने तिला आपल्याकडे ठेवण्याची इच्छा बलिविंदरसिंग याच्याकडे व्यक्त केली होती. त्यानंतर ती आजीकडेच राहात होती. रविवारी मुलीची आजी कांता सकाळी जनावरांना चारा देण्यासाठी गेली होती.

कडक ऊन असल्यामुळे त्यांनी जसमीतला घरीच ठेवले होते. आजी बाहेर गेल्यानंतर जसमीत बेड वर चढली आणि खुंटीला अडकवलेले आयकार्ड काढण्याचा प्रयत्न केला. खुटी आणि बेड मधील अंतर जास्त असल्याने तिचा तोल गेला. त्याचवेळी आयकार्डची दोरी तिच्या गळ्यात अडकली आणि तिला फास बसला. जेव्हा तिची आजी घरी आली त्यावेळी जसमीत खुंटीला लटकलेल्या अवस्थेत आढळून आली. तिला खाली उतरवून डॉक्टरांना बोलावले मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू झालेला होता.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like