OMG ! एकाच हॉस्पिटलमधील ३६ नर्स ‘प्रेग्नेंट’

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – एका वर्षात, हॉस्पिटलमधील ३६ नर्स गर्भवती झाल्या आहेत. सोशल मीडियावर या नर्सची छायाचित्रेही व्हायरल झाली आहेत. ही घटना अमेरिकेतील मिसुरीच्या कॅन्सस सिटीमध्ये घडली आहे. चिल्ड्रेन मर्सी हॉस्पिटल असे या हॉस्पिटलचे नाव आहे. गरोदर असलेल्या सर्व नर्स अतिदक्षता विभागात कार्यरत आहेत. २० मुलांची प्रसुतिसुद्धा झाली आहे. या वर्षाच्या अखेरीस उर्वरित नर्सची डिलिव्हरी होणार आहे. आतापर्यंत जन्मलेल्या २० मुलांमध्ये फक्त दोनच मुली जन्माला आल्या आहेत.

हॉस्पिटलने सर्व ३६ नर्सचा एकत्रितपणे फोटो शेअर केला आहे. यामध्ये जन्म दिलेल्या आणि गर्भवती महिलांचा समावेश आहे. परंतु, अतिदक्षता विभागात किती नर्स काम करतात हे हॉस्पिटलने नमूद केलेले नाही. हॉस्पिटलमध्ये आजारी आणि पूर्व-प्रौढ मुलांसाठी विशेष युनिटची स्थापना केली आहे.

आरोग्यविषयक वृत्त

 

Loading...
You might also like