अभिषेकसोबतचा फोटो शेअर करत ‘भावूक’ झाले ‘बिग बी’ अमिताभ, म्हणाले- ‘हॉस्पिटलचे प्रोटोकॉल खूपच कठिण…’ !

पोलीसनामा ऑनलाइन – लोकांना कोरोनाच्या महामारीबद्दल जागरूक जागरूक करणारे बिग बी अमिताभ बच्चन आता कुटुंबासहित कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. अमिताभ बच्चन कोरोना पॉझिटीव आल्यानंतर अभिषेक बच्चननंही कोरोना टेस्ट केली आणि त्यालाही कोरोना झाल्याचं समोर आलं. सध्या त्यांच्यावर मुंबईतील नानावती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. शुक्रवारी (दि 17 जुलै) रात्री ऐश्वर्या रायलाही हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. बिग बी सोशलवर खूप सक्रिय आहेत. बिग बींनी अलीकडेच कविता शेअर करत डॉक्टर्स आणि नर्सेसना सलाम केला होता. यानंतर आता त्यांनी त्यांच्यासाठी प्रार्थना करणाऱ्या चाहत्यांचे आभार मानले आहेत. त्यांनी सोशलवर एक इमोशनल पोस्ट शेअर केली आहे.

अमिताभ बच्चन यांनी त्यांचाच एक फोटो शेअर करत ट्विट केलं आहे. फोटोत ते अभिषेकसोबत दिसत आहेत. या ट्विटमधून त्यांनी साऱ्यांचे आभार मानले आहेत. बिग बींनी असं म्हटलं आहे की, आनंदाचे क्षण असो वा दु:खाचे जवळचे, शुभेच्छुक चाहते अशा साऱ्यांनी आम्हाला खूप प्रेम दिलं आहे आणि कायमच आमच्यासाठी प्रार्थना केली आहे. तुमच्या सर्वांच्या प्रेम आणि आशिर्वादाबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. सध्याच्या स्थितीत हॉस्पिटलचे प्रोटोकॉल खूप कठिण आहेत.”

याआधीही बिग बींनी असंच एक ट्विट केलं होतं. यातही त्यांनी साऱ्यांचे आभार मानले होते. 11 जुलै 2020 रोजी त्यांना कोरोना झाल्याचं समोर आलं होतं. त्यांनीच सोशल मीडियावरून याबद्दल माहिती दिली होती.

अमिताभ यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच त्यांचा गुलाबो सिताबो ओटीटीवर रिलीज झाला आहे. याच वर्षात अमिताभ बच्चन अनेक सिनेमांमध्ये दिसणार आहेत. यामध्ये ब्रह्मास्त्र, झुंड, चेहरे, अशा अनेक सिनेमांचा समावेश आहे. यापैकी झुंड सिनेमाचा टीजर आधीच रिलीज झाला आहे. नागराज मंजुळे या सिनेमाचं डायरेक्शन करत आहे. नागपूरमध्ये सिनेमाची शुटींग झाली आहे.