‘मशिदी’साठी मिळालेल्या जागेवर तयार केले जाणार शॉपिंग मॉल सारखे हॉस्पिटल , कमी खर्चात होणार किडनी आणि हृदया संबंधित उपचार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अयोध्याच्या धनीपूर गावात सुन्नी वक्फ बोर्डाने 4 एकर जागेवर बनविलेले सुपर स्पेशलिटी चॅरिटी हॉस्पिटल, इंडो-इस्लामिक रिसर्च सेंटर, संग्रहालय आणि कम्युनिटी किचनचा नकाशा तयार केला आहे.

हॉस्पिटलची इमारत आधुनिक शैलीच्या शॉपिंग मॉलप्रमाणे सुंदर असेल. याचे नाव 1857 च्या क्रांतिकारक मौलवी अजीमुल्ला, मौलाना अब्दुल बारी फरंगी महली किंवा हकीम अजमल खान यांच्या नावावर ठेवले जाऊ शकते.

इंडो-इस्लामिक कल्चरल फाऊंडेशनच्या म्हणण्यानुसार, हे चॅरिटी हॉस्पिटल किडनी, हार्ट यासारख्या गंभीर आजारावर अत्यंत कमी किंमतीवर उपचार करेल, जेणेकरून अयोध्या व आसपासच्या लोकांना उपचारासाठी लखनऊ आणि दिल्लीला जावे लागणार नाही. रुग्णालयात 150 ते 200 खाटांची सुविधा असेल. ट्रस्टने मशिदीचा नकाशा तसेच रुग्णालय, संशोधन केंद्र आणि कम्यूनिटी किचन तयार करण्याची जबाबदारी जामिया मिलिया इस्लामिया येथील आर्किटेक्चर विभागाचे अध्यक्ष प्रा. एस.एम. अख्तर यांना दिली. माहितीनुसार, सर्व इमारतींचा नकाशा तयार करण्यात आला आहे, परंतु ट्रस्ट ती उघड करत नाही.

इंडो-इस्लामिक रिसर्च सेंटर आणि म्युझियममध्ये भारताच्या वंशाची झलक पाहायला मिळेल. 1857 च्या क्रांतिकारकांबरोबरच कबीर, रहीम, रसखान, अमीर खुसरो इत्यादी देखील ओळखले जातील. महात्मा गांधी यांचे निकटवर्ती मौलाना अब्दुल बारी फरंगी महाली यांचीही ओळख करून दिली जाईल.