आंदोलन करणाऱ्या JNU विद्यार्थ्यांवर पोलिसांचा ‘लाठीचार्ज’, अनेक विद्यार्थी जखमी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीतील जवाहरलाल नेहरू केंद्रीय विद्यापीठ अर्थात जेएनयू पुन्हा एकदा देशभरात चर्चेत आलं आहे. विद्यापीठ प्रशासनानं वसतिगृहाच्या शुल्कामध्ये वाढ करण्यासह गणवेश सक्तीचा प्रस्ताव तयार केला आहे. प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या बदलांविरोधात विद्यार्थी रस्त्यांवर उतरले आहेत. सोमवारी तर विद्यार्थ्यांनी संसदेवरच मोर्चा काढला होता. या मोर्चावर पोलिसांनी लाठीचार्ज
केला. यामध्ये अनेक विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत.

शुल्क दरवाढीविरोधात घोषणा देत आणि हातात निषेधाचे फलक घेऊन शेकडो विद्यार्थ्यांनी विद्यापीठापासून मोर्चाला सुरुवात केली. या मोर्चाच्या पर्श्वभूमीवर संसद भवनाच्या परिसरात आज बाराशे पोलीस तैनात करण्यात आले होते. संसदेबाहेर कालपासून जमावबंदीचा आदेश लागू केला होता. दक्षिण-पश्चिम जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार विद्यापीठाबाहेर दिल्ली पोलिसांच्या वतीने एक फलकही लावण्यात आला होता. नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा देणारा हा फलक होता. मात्र, याला न जुमानता विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला.

विद्यार्थ्यांनी जेएनयू गेटवर लावण्यात आलेले बैरिकेट्स तोडले. त्यानंतर दोन तास चालेल्या संघर्षानंतर विद्यार्थ्यांनी सराय येथील बॅरिकेट्स तोडले. विद्यार्थ्यांचा मोर्चा भीकाजा कामा प्लेस फ्लायओव्हरपर्य़ंत पोहचला. त्यावेळी विद्यार्थी संसेदेच्या दिशेने जात असताना त्यांना सफदरजंग टॉम्ब जवळ आडण्यात आले.
विद्यार्थ्यांनी याच ठिकाणी धरणे आंदोलन सुरु केले.

यावेळी जेएनयूचे माजी अध्यक्ष कन्हैया कुमार यांनी देश ट्रिलीयन इकॉनॉमीच्या दिशेने जात आहे. मात्र एका विद्यापीठासाठी काही करु शकत नाही. टॅक्सच्या पैशांवर नेते मौज मजा करत आहेत. टॅक्सचा पैसा ते उडवत आहेत. मात्र, शिक्षणासाठी आणि उपचारासाठी पैसे मिळत नसल्याची खंत व्यक्त केली. देशातील नेते मौज मजा करतात ते योग्य, नेता संसदेत मोफत जेवण करता तेही योग्य, मग विद्यार्थ्यांनी फीमध्ये सवलत मागीतली तर ते अयोग्य आहे का ? असा सवाल देखील उपस्थित केला.

Visit : Policenama.com