हाॅस्टेलमधील विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या

सांगली: पोलीसनामा आॅनलाईन

शालेयवयीन किंवा काॅलेजमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्या केल्याच्या अनेक घटना आपण ऐकत, वाचत असतो. अशीच एक घटना सांगलीमध्ये घडली आहे. सांगलीमध्ये हाॅस्टेलला राहणाऱ्या विद्यार्थी युवतीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. अक्षता कोष्टी असं या तरुणीचं नाव असून सांगलीच्या वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या हाॅस्टेलमध्ये ती रहात होती. ती वालचंद काॅलेजमध्ये बी ई सिव्हिलंच शिक्षण घेत होती. तिने हाॅस्टेलमध्येच आज गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तिच्या आत्महत्येचं कारण स्पष्ट झालं नाही. दरम्यान या घटनेमुळे काॅलेजमध्ये खळखळ उडाली आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e3acc243-c7c3-11e8-82e1-1f7a1f878e7c’]

अक्षताने महाविद्यालयाच्या आवारात असलेल्या हाॅस्टेलच्या रुममध्ये आेढणीच्या साहाय्याने पंख्याला लटकून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ती मूळची जत तालुक्यातील डफळापूरची रहिवासी असून वालचंद महाविद्यालयात ती सिव्हिल प्रथम वर्षाचे शिक्षण घेत होती.

अक्षता काॅलेजच्या हाॅस्टेलमध्ये इतर पाच मैत्रिणींसोबत रहात होती. सकाळी तिच्या मैत्रिणी काॅलेजला गेल्या व काही मैत्रिणी पुन्हा रुमवर आल्यानंतर त्यांना अक्षता आेढणीने गळफास घेऊन पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आली. या घटनेनंतर काॅलेज प्रशासनाने त्वरीत विश्रामबाग पोलिसांना माहिती दिली. पोलीस त्वरीत घटनास्थळी हजर झाले आणि त्यांनी पंचनामा केला. अक्षताच्या आत्महत्येचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. दरम्यान या घटनेमुळे महाविद्यालयात एकच खळबळ उडाली आहे.

[amazon_link asins=’B075K83QJK,B06ZZB71TB’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f19eb42f-c7c3-11e8-af9b-bd230a54133b’]