IT Corridor हैदराबादमध्ये वसतिगृहात शुकशुकाट, अनेकांवर बेरोजगारीची ‘कुऱ्हाड’

हैदराबाद : पोलीसनामा ऑनलाईन – काेराेनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लाॅकडाऊन जाहिर करण्यात आले. या काळात अनेकांना वर्क फ्राॅम हाेम या संकल्पनेचा फायदा झाला. आयटी क्षेत्रासाठी हे नवे नसले तरीही हैदराबादसारख्या आयटी सिटीमध्ये अजूनही बहुसंख्य कर्मचारी घरातूनच काम करत आहेत. याचा येथील वसतिगृह व्यवसायावर मोठा परिणाम झाला असून अनेकांवर बेरोजगारीचे संकट ओढवले आहे.

हैदराबादमध्ये आयटी काॅरिडाॅर म्हणून ओळखला जाताे. हाेस्टेल संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, सुमारे 3500 वसतिगृहे या भागात असून त्यातून 60 हजार कुटुंबांना अप्रत्यक्षरित्या रोजगार उपलब्ध होत असतो. आयटी क्षेत्रातील जवळपास 4 लाख कर्मचारी वसतिगृहांमध्ये वास्तव्य करतात. अतिशय कमी शुल्कामध्ये साेय या ठिकाणी हाेते. परंतु, वर्क फ्राॅम हाेम या संकल्पनेमुळे कर्मचारी आपल्या घरातूनच आता काम करत असल्याने वसतिगृहांमध्ये शुकशुकाट जाणवत आहे.

आयटी कंपन्यांकडे लागले डाेळे
अनलाॅकनंतर वसतिगृहांना परवानगी मिळाली. दसऱ्यानंतर सुगीचे दिवस येतील, अशी अपेक्षा या क्षेत्राला हाेती. पण, तसे झाले नाही. त्यामुळे वसतिगृहचालकांचे डाेळे आता आयटी कंपन्यांकडे लागले आहे. या कंपन्या कर्मचाऱ्यांना परत बाेलावतील ही अपेक्षा त्यांना आहे.