नव ‘दाम्पत्य’ अभिनेत्री पूजा बत्रा आणि नवाब शाहाचं ‘BOLD’ फोटोशूट, पूजाच्या कातिल अदानं केलं ‘घायाळ’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस पूजा बत्रा आणि अ‍ॅक्टर नवाब शाह यांनी दिल्लीत काही जवळच्यांच्या उपस्थितीत लग्न केलं. सोशलवर काही फोटो शेअर करत त्यांनी लग्न झाल्याचं कंफर्म केलं होतं. 14 दिवसांनंतर या कपलने आपला एक हॉट फोटो शेअर केला होता. या फोटोत पूजा बत्रा बेडवर बसलेली दिसत होती तर नवाब शाह तिच्या बाजूला बसला होता.

सध्या पूजा आणि नवाबचे काही हॉट फोटो समोर आले आहेत. कपलच्या बोल्ड फोटोने सोशलचं वातावरण तापवलं आहे. कारण नवाब फोटोमध्ये शर्टलेस दिसत आहे आणि आपली बॉडी फ्लाँट करत आहे. तर पूजाही कमालीची हॉट दिसत आहे. कारण पूजाने लाल रंगाची बिकीनी घातली आहे.

दोघांचाही बोल्ड फोटो सोशलवर आगीसारखा पसरत असताना दिसत आहे. चाहत्यांनी तर या कपलच्या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊसच पाडला आहे. पूजाचा रेड बिकीनीतील आणखी फोटो आहे ज्यात ती समुद्राच्या पाण्यात मस्ती करताना दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा आहे.

 

वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, पूजा बत्रा माजी फेमिना मिस इंडिया इंटरनॅशनल आहे. पूजाने आपल्या करिअरची सुरुवात 1995 मध्ये तमिळ सिनेमातून केली आहे. यानंतर तिने हिंदी सिनेमात पाऊल टाकलं.

पूजाने बत्राने विरासत, नायक, हसीना मान जाएगी, भाई, फर्ज आणि एबीसीडी 2 यांसारख्या अनेक सिनेमात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.नवाबने भाग मिल्खा भाग, डॉन 2, दिलवाले, तसेच सलमान खान सोबत टायगर जिंदा है या सिनेमात काम केले आहे.

 

Visit : Policenama.com