‘या’ ‘BOLD’ आयटम गर्लपुढं बॉलिवूड अभिनत्रीदेखील ‘फिक्या’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या आपल्या बोल्डनेस आणि हॉटनेससाठी ओळखल्या जातात. परंतु साऊथमधील अशी एक बोल्ड आणि हॉट अभिनेत्री समोर आली आहे जिच्यापुढं बॉलिवूड सौंदर्यवतीही फिक्या पडतील. सध्या आपल्या बोल्ड आणि सेक्सी फोटोंमुळे तिची सर्वत्र चर्चा सुरू आहे. सर्वात बोल्ड आयटम गर्ल म्हणूनही ती ओळखली जाते. अख्खी साऊथ इंडस्ट्री तिची दिवानी आहे.

साऊथच्या या बोल्ड आयटम गर्लचं नाव आहे मुमैत खान. सध्या आपल्या काही बोल्ड आणि हॉट फोटोंमुळे मुमैत चर्चेत आली आहे. मुमैत डान्ससाठी ओळखली जाते. मुन्नाभाई एमबीबीएसमध्ये मुमैत एका आयटम साँगमध्ये झळकली आहे.

एका ड्रग्ज प्रकरणात मध्यंतरी तिचं नाव समोर आलं होतं. इतकेच नाही तर तिचा अपघातही झाला होता ज्यामुळे ती जवळपास 15 दिवस कोमात होती. परंतु यातून बाहेर पडून तिनं हेजा या तेलगू सिनेमातून वापसी केली होती.

मुमैतच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर, तिचा जन्म 1 सप्टेंबर 1985 रोजी झाला आहे. तिचे वडिल पाकिस्तानी तर आई चेन्नईची राहणारी होती.

मुमैतच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, तिनं तेलगू, हिंदी, तामिळ, कन्नड अशा अनेक सिनेमात काम केलं आहे. झलक दिखलाजा या रिअ‍ॅलिटी शोमध्येही ती झळकली आहे. बिग बॉस तेलगूमध्येही मुमैत दिसली आहे. यावेळी तिचं घरात असणं खूप चर्चेत राहिलं आहे. बॉलिवूडमध्येही तिनं काम केलं आहे.

 

Visit : Policenama.com