अ‍ॅक्ट्रेस ईशा गुप्ताच्या ‘हॉट’ फोटोचा सोशल मीडियावर ‘धुमाकूळ’ !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   ईशा गुप्ता बॉलिवूडमधील बोल्ड अॅक्ट्रेसपैकी एक मानली जाते. ईशा सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते आणि चाहत्यांच्या नेहमीच संपर्कात राहते. ती नेहमीच आपले फोटो सोशलवर शेअर करत असते. अलीकडेच तिनं तिच्या इंस्टावरून सर्व फोटो आणि व्हिडीओ डिलीट केले होते. यानंतर आता तिनं एकच अतिशय बोल्ड फोटो शेअर केला होता ज्यामुळं ती चर्चेत आली होती. यानंतर पुन्हा एकदा तिनं लुकचा जलवा दाखवण्यास सुरुवात केली आहे.

ईशानं तिच्या इंस्टावरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत ईशा प्रचंड हॉट आणि सुंदर दिसत आहे. ईशाच्या या फोटोनं सोशलवर राडा घातला आहे. ईशाच्या लुकबद्दल बोलायचं झालं तर तिनं एम्ब्रॉयडरी केलेला छान ड्रेस घातला आहे. हाही एक बिकिनी लुक आहे असं वाटत आहे.

फोटोत ईशा वन साईड लुक फ्लाँट करताना दिसत आहे. तिची पोज आणि हावभाव खूपच कातिल दिसत आहेत. सध्याच ईशाचा हा फोटो प्रचंड व्हायरल होत आहे.

चाहत्यांनाही तिचा हा बोल्ड लुक खूप आवडला आहे. अनेकांनी कमेंट करत तिच्या ब्युटी आणि हॉटनेसचं कौतुक केलं आहे. चाहत्यांनी कमेंटचा तर नुसता पाऊसच पाडला आहे.

ईशाविषयी थोडक्यात…

ईशा गुप्ताला सोशलवर फोटो शेअर करायला खूप आवडतं. ईशा गुप्ता ही एक भारतीय सिने अभिनेत्री आहे. ईशा 2007 ची मिस इंडिया इंटरनॅशनलची विजेता आहे. यानंतरच ईशानं बॉलिवूडमध्ये पाऊल टाकलं. जन्नत 2 या सिनेमातून तिने डेब्यू केला होता. ईशाचे इंस्टावर 5.1 मिलियन फॉलोवर्स आहेत.

ईशाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर ईशानं 2012 साली जन्नत 2 या सिनेमातून डेब्यू केला होता. याशिवाय तिनं राज 3, बेबी, मैं रहूं या ना रहूं, रुस्तम, कमांडो 2, बादशाहो, पलटन, टोटल धमाल हमशकल्स, वन डे जस्टिस डेलिवर्ड, गोरी तेरा प्यार में यांसारख्या अनेक सिनेमात काम केलं आहे. वन डे सिनेमात ती शेवटची दिसली होती.